Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Thursday, June 06, 2019
रशियन-भाषेचे-तुकाराम: पुश्किन@220....Pushkin Did For the Russian Language What Tukaram Did For Marathi
Wednesday, June 05, 2019
पहिल्यांदा प्लासी, आता निरो...Marathi Political Analyst Simplifies and Distorts History
आता तोरसेकर रोमचे बादशाह निरो यांच्या बद्दल जून ४ २०१९ रोजी लिहतात :
"... त्यामुळे रोम जळत असताना फ़िडल वाजवत बसलेल्या निरो नामक सम्राटाचे स्मरण झाले. मुळात निरोने रोम जळत असताना वाद्य वाजवत बसण्यात काहीही गैर नव्हते. कारण तो मनोरुग्ण होता आणि त्याला साधासरळ विचारही करता येत नव्हता. पण याने दिलेली वतने व अनुदाने याच्यावरच ज्यांची गुजराण किंवा चैनमौज चाललेली होती, त्यांना साम्राज्य किंवा देश याची कुठलीही फ़िकीर नव्हती. साम्राज्य वाचवण्यासाठी कोणी खमक्या हुशार राजा त्या जागी आणला तर नक्कीच ते राज्य वाचवणे शक्य होते. पण असा कर्तबगार राजा असल्या फ़ुकट्या बुद्धीमंतांची आधी हाकालपट्टी करण्याची खात्री होती. त्यापेक्षा मनोरुग्ण सम्राट त्यांना कौतुकाचा वाटत होता. यापेक्षा आजच्या कॉग्रेस पक्षाची वा त्याच्या भगतगणांची कहाणी किंचीतही वेगळी नाही...."
हे वाचून मी Barry Strauss यांच्या 'Ten Caesars: Roman Emperors From Augustus to Constantine' , २०१९ या पुस्तकाकडे वळलो.
त्या दहा सीझर मध्ये निरो आहेत. Strauss म्हणतात:
'Nero's Death', 1888 by Vasily Smirnov
Monday, June 03, 2019
सीमारेषा अस्पष्ट आहे, अंधूक आहे: व्हिस्टलर, व्हॅन गो , द ग गोडसे ....A Reality More Real Than Reality
(पृष्ठ : सव्वीस, 'जी.एं.ची निवडक पत्रे: खंड १', १९९५)
(प्रा म. द. हातकणंगकलेकरांनी जी.ए.न वरती एक लेख लिहला होता, त्याचे शीर्षक : धारवाडचे धुके)
एप्रिल २०१९च्या दि न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स मधला Boyd Tonkin यांचा "From Writer to Painter: Van Gogh’s London Pilgrimage" लेख वाचायला सुरुवात केली आणि खालील चित्र समोर आले:
गोडसे व्हिस्टलरांच्या व्यक्तिमत्वावर व कलेवर फार खुष होते, हे आपल्याला पदोपदी जाणवते....
एका ठिकाणी (पृष्ठ ४०) गोडसे व्हिस्टलर लेखात लिहतात :
वरील वर्णन बऱ्याच प्रमाणात खालील चित्राला लागू आहे.
Nocturne in Blue and Gold: Old Battersea Bridge, १८७२- ७५
सौजन्य : विकिपीडिया
Saturday, June 01, 2019
मला आता राज कपूर , नर्गिस म्हटल्यावर त्यांचा कोणता सिनेमा आठवत नाही तर ...Nargis@90
Today June 1 2019 is 90th birth anniversary of Nargis
वरील दृश्य सिनेमातील नाही, भारतीय सिनेमातील बरीच मंडळी ussr ला भेट द्यायला गेली होती त्यावेळी काढलेल्या विडिओतील आहे.
नर्गिस यांच्या नजरेतून प्रेम नुस्त वाहतय... सगळ्या व्हिडिओ भर ह्या प्रेमाचे प्रत्यंतर मिळत राहते... आपल्याला अर्थातच माहित आहे की ते प्रेम कसे doomed होते ते आणि त्यामुळे त्या सगळ्याला करुणेची झालर आहे
मला आता राज कपूर , नर्गिस म्हटल्यावर त्यांचा कोणता सिनेमा आठवत नाही तर हा सामान्य दर्जाचा पण authentic विडिओ आठ्वतो.






