मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Tuesday, May 28, 2019

कवायती सैन्य, बाजारबुणगे आणि बुलशिट...Misplaced Passion For Plassey

 मे २५ २०१९ रोजी भारताच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी कुठला मंत्र दिला असेल तर ज्या एकजुटीने भारतीय १८५७चे युद्ध लढले ते spirit समाजात पुन्हा निर्माण करण्याचा ... त्यांच्या भाषणात १८५७चा उल्लेख २-३ वेळा आला... आणि योगायोगाने ज्या भारतीयाने १८५७चे युद्ध सर्वात जास्त भारतीयांपर्यंत आपल्या गाजलेल्या पुस्तकातून पोचवले त्या वीर सावरकरांचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला....

१८५७चे स्वातंत्र्य युद्ध या ब्लॉग वर पूर्वी आले आहे पण आज वाटले या निमित्ताने काही दिवसापूर्वी लिहलेली १७५७ प्लासीच्या लढाईवर लिहलेली फेसबुक पोस्ट ह्या ब्लॉग वर आणू.
 श्री. भाऊ तोरसेकर यांनी श्री सुनील तांबे यांच्या पोस्ट ('प्लासी ते सांगली') चा आधार घेत सप्टेंबर २० २०१८ रोजी ही पोस्ट लिहली होती: "बाजारबुणगे आणि रा. स्व. संघ".

मी ती एप्रिल २४ २०१९ रोजी वाचली. किती अनैतिहासिक ती आहे हे पाहून खूप आश्चर्य वाटले. 

श्री. तोरसेकर म्हणतात : "बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्पट होतं. नबाबाचा वझीर, मीर जाफर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला फितूर झाला. ५० हजार सैनिकांची फौज घेऊन तो ब्रिटीश सैन्याला येऊन मिळाला. ब्रिटीशांच्या कवायती फौजेपुढे नबाबाच्या सैनिकांची दाणादाण उडाली....
ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे मोजके, पण कवायती सैन्य आणि सिराज उद दौलाची बाजारबुणग्यांची विस्कळीत बेशिस्त फ़ौज, यांच्यातली ही लढाई आहे. शिस्त असलेले कार्यकर्ते व त्यांची कायमस्वरूपी उभी असलेली खडी फ़ौज, कुठल्याही चौपट पाचपट मोठ्या संख्येच्या जमावाला पांगवू शकत असते....
... शिस्तीची फ़ौज त्यात कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली असते. ब्रिटीशांची फ़ौज आणि नबाब सिराज उद दौलाच्या सैन्यामध्ये हा नेमका फ़रक होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आज भारतीय राजकारणात होत आहे."

हे असल ऐतिहासिक गोष्टीच सुलभीकरण (simplification) मला मुळात आवडत नाही. प्रत्येक मोठी ऐतिहासिक घटना गुंतागुंतीची असते आणि त्याचा मान आपण ठेवला पाहिजे.

मागील काही वर्षातील इंग्रजांच्या भारतातील राजवटीबद्दल सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे, जोन विल्सन यांचे "India Conquered: Britain's Raj and the Chaos of Empire", २०१६, ज्याचा उल्लेख मी पूर्वी केला आहे.

डॉ विल्सन यांच्या पुस्तकात प्लासीच्या लढाईवर एक प्रकरण आहे ("Passion at Plassey"), ते जरूर वाचा, मी त्यातील फक्त थोडा अंश देतो आहे.

"Since 1757 historians have tended to play down the importance of ‘the Battle of Plassey’, as it became known. They have suggested it was the lucky result of political negotiations, ‘the successful culmination of an intrigue’ as Percival Spear put it, rather than a real fight. Such judgement depends on an unrealistic idea of what determines the outcome of normal wars. There was nothing particularly unusual about the fact that Plassey was shaped by forces off the field. Until mass mechanized warfare, most battles were determined by who didn’t fight rather than the capacity of those who did. Siraj lost because his forces reflected his own limited capacity to assert authority over the constituent parts of Bengali society. Defeat was a consequence of the breakdown of political authority caused by the social upheaval that followed the invasion of Nader Shah. In June 1757, the East India Company was better able to hold a fighting force together than its enemies. The important point, though, is that the real British ability to lead a small body of men on the battlefield did not give them the capacity to command the submission of the province’s twenty million people afterwards. Plassey did not found an empire. It merely ensured that political chaos endured in Bengal far longer than it would have done otherwise."

कुठून काढले श्री. तोरसेकर यांनी कवायती सैन्य आणि बाजारबुणगे? एक शब्द सुद्धा तसा जोन विल्सन यांनी लिहला नाहीये. किती गुंतागुंतीची कारणे पराभवासाठी विल्सन देतात ते पहा. उदा: नादिर शहाच्या आक्रमणामुळे ब्रिटिशांचा फायदा झाला होता...

१७५७ ची लढाई भारत हरला. त्यानंतरच्या वर्षांत त्याहूनही दोन जास्त महत्वाच्या गोष्टी भारत हरला :  १७६१ ची पानिपत लढाई आणि १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध. मग ते हरलेले पण असलेच "बाजारबुणगे" होते काय? १७६१ साली थोडेफार कवायती सैन्य कोणाकडे होते तर मराठ्यांकडे. ती लढाई हरल्याची कारणे अनेक व गुंतागुंतीची. (त्र्यं शं शेजवलकर, 'पानिपत १७६१', १९६१) आणि १८५७चे युद्ध भारत जिंकू शकला असता. It was a close call.  (William Dalrymple, "The Last Mughal', 2006).

प्लासीच्या लढाईचे भवितव्य ठरले ते कवायती सैन्यामुळे आणि बाजारबुणग्यांमुळे नव्हे तर लाचखोरीने, बनावट दस्तऐवजाने, विश्वासघाताने....त्या संबंधातील गेल्या फक्त काही वर्षातील थोडी अवतरणे देतो:

K. P. Fabian: "It is fairly evident that if Robert Clive had not won the Battle of Plassey by bribing, Joseph-Francois Dupleix, the Governor General of French India, might have captured India."

म्हणजे क्लाईव्हने लाचखोरीने प्लासीची लढाई जिंकली होती.

William Dalrymple: "... After the Battle of Plassey in 1757, a victory that owed more to treachery, forged contracts, bankers and bribes than military prowess, he transferred to the East India Company treasury no less than £2.5m seized from the defeated rulers of Bengal – in today’s currency, around £23m for Clive and £250m for the company..."

म्हणजे बनावट कागदपत्रे, विश्वासघात , लाचखोरी आणि बँकर्स यांच्यामुळे इंग्रजांना जास्तकरून विजय मिळाला.

George Trefgarne:  “...the East India Company was the first recognisable multinational and claims that Plassey is a classic example of a large corporation becoming too un-wieldy and being hijacked by greedy, egomaniacal executives....” 


Richard Cavendish: “The confrontation came on a cloudy morning north of the village of Plassey on the bank of the Hughli river. Clive’s army was drawn up in three divisions, as was the Nawab’s army of perhaps 40,000 men with its war-elephants and more than 50 cannon. One division was commanded by Mir Jafar. After an opening cannonade, a crash of thunder at noon heralded a torrential downpour of rain that lasted half an hour. The British artillerymen quickly covered their cannon and ammunition with tarpaulins, but the enemy failed to do the same and their artillery was put out of action, so that when the Nawab’s army moved forward, assuming that Clive’s cannon were also out of action, it was met with a withering storm of fire. The enemy withdrew and Siraj, who distrusted his generals and had already been warned of impending defeat by his astrologer (who had possibly been bribed), lost his nerve when Mir Jafar advised retreat. When Clive’s army attacked again, Siraj fled on a fast camel. His demoralized army followed suit and when the British entered the enemy camp at about 5pm, they found it abandoned.”

कुठेही कवायती सैन्य, बाजारबुणगे यांचा उल्लेख नाही. 


(मध्ययुगीन युद्धांमध्ये बैलगाड्यांचा वापर logistics साठी भरपूर होत असे, त्यामुळे शीर्षकातील बुलशिट अर्थपूर्ण आहे!)

Clive meeting with Mir Jafar after the Battle of Plassey, 1762

oil on canvas 

Artist: Francis Hayman (1708- 1776)


No comments: