मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

Friedrich Nietzsche: “Everybody wants the same, everybody is the same: whoever feels different goes voluntarily into a madhouse.”

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे:
"... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

John Gray: "Unlike Schopenhauer, who lamented the human lot, Leopardi believed that the best response to life is laughter. What fascinated Schopenhauer, along with many later writers, was Leopardi’s insistence that illusion is necessary to human happiness."

Justin E.H. Smith: “One should of course take seriously serious efforts to improve society. But when these efforts fail, in whole or in part, it is only humor that offers redemption. So far, human expectations have always been strained, and have always come, give or take a bit, to nothing. In this respect reality itself has the form of a joke, and humor the force of truth.”

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Wednesday, January 03, 2018

माझ्या आईच्या पोर्ट्रेटवर बसलेली माशी...To Be a Man and Mortal...

Today January 3 2018 is my mother's 12th death anniversary

जी कुलकर्णी, ऑर्फियस (१९७३), पिंगळावेळ, १९७७ :

"... उलट असे पहा, प्रत्येक सुंदर वस्तू संपणार  किंवा तू स्वतः नाहीसा होणार  हे जाणवताच  तू जास्त उत्कटपणाने, हावरेपणाने तिचा भोग घ्यायला हवास , तुझा प्रवास अगदी तात्पुरता  आहे  आणि या वाटेने  पुन्हा कधी येण्याची  तुला संधी  मिळणार नाही हे एकदा हाडात रुजले , की एखादे  रानफुल देखील  स्वतःच्या   गूढ , अव्दितीय  सौन्दर्याने तुला भारून टाकील ..."

Priam the king of Troy:

"Only we humans can know, endowed as we are with mortality, but also with consciousness, what it is to be aware each day of the fading in us of freshness and youth; the falling away, as the muscles grow slack in our arms, the thigh grows hollow and the sight dims, of whatever manly vigor we were once endowed with. Well, all that happens. It is what it means to be a man and mortal."Artist: Unknown

हॉफेर-बाईंच्या पागोट्यावरील माशी पहा...त्या उत्कृष्टपणे चितारलेल्या माशीबद्दल असं म्हटल जात: "The superbly detailed black fly that crawls across this woman’s white headdress is both a proof of the unknown German artist’s skill and a sinister suggestion of mortality and decay."

on the right, my mother c1957

उजवीकडचा माझ्या आईचा फोटो, त्यावेळच्या एका  प्रसिद्ध (आणि महागड्या), लक्ष्मी रोड, पुणे येथील , फोटो स्टुडिओत काढला आहे. माझ्या वडिलांनी त्यांना अजिबात न परवडणारे पैसे त्यासाठी खर्च केले होते. आईला केसात फुल घालून यायला फोटोग्राफरनी सुचवले होते. ते दोघे त्यावेळी, प्रेमविवाहानंतर नुकतेच, जवळजवळ कफल्लक होते.  तिच्या गळ्यातले मणिमंगळसूत्र पहा. तेवढा एकच दागिना तिच्याकडे होता.

त्या फोटोचे खूप कौतुक आजपर्यंत मी बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे. मी ऐकल आहे की फोटोस्टुडिओत काही आठवडे  तो 'display' वर सुद्धा होता.

डावीकडील १४७० सालचे, सुन्न करणारे, 'पोर्ट्रेट ऑफ ए वूमन ऑफ दि हॉफेर फॅमिली' चित्र २०१७मध्ये पाहिल्यावर वाटले,  मी ती आईच्या फोटोतील माशी आई जाईपर्यंत जणू पहातच नव्हतो...