मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Saturday, December 29, 2018

फेसबुक आणि विकिपीडिया वरील स्मारके -३....Memorials on Facebook and Wikipedia-III

ह्या शतकाच्या जवळजवळ प्रारंभी पासून मी मराठी साहित्याला/ सर्व इतिहासाला  प्रचंड मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशनची तातडीची गरज आहे हे सांगत आहे... ह्या ब्लॉग वर त्या स्वरूपाचे लेखन जागोजागी आहे....

मराठीतील कित्येक दिवंगत आणि जिवंत लेखक, मासिके, वर्तमानपत्रे, विचार, चित्रे टिकायचे असतील तर  इंटरनेट वर उपलब्ध होणे आवश्यक आहे...'वाङ्मय शोभा', 'माणूस' च्या पाठोपाठ  सत्यकथा, मौज, ललित यांचे सर्व अंक उपलब्ध होणार असे ऐकून आहे ... हे अत्यंत स्वागतार्ह आहे....

पण त्यातील प्रत्येक गोष्ट searchable पाहिजे ... उदा: बुकगंगा वरचे 'वाङ्मय शोभा' चे अंक searchable नाहीयेत .... त्यामुळे गुगल सर्च मध्ये 'वाङ्मय शोभा' मधील result केंव्हाच येत नाही... आवडो न आवडो, विकिपीडिया आणि गुगल जे विसरत, ते हळूहळू सगळे विसरतात!

मराठी वर्तमानपत्रे, काही मासिके  याबाबत बोटचेपी भूमिका घेत आहेत कारण त्यातील बरेच जण ब्लॉग, विकिपीडिया, फेसबुक, व्हाट्सएप यांना आपला प्रतिस्पर्धी मानायला लागले आहेत.  त्यामुळे ते त्यांचा बऱ्याचदा  उल्लेख सुद्धा करत नाहीत. (इंग्रजी मधील प्रसिद्ध वर्तमानपत्रे, छापलेली मासिके  मात्र त्यांचा उल्लेख आता जास्त करायला लागले आहेत.)

मराठी वर्तमानपत्रांचे भविष्य काय याबद्दल मला काहीही अंदाज नाही पण सध्या त्यांचा एक महत्वाचा उपयोग म्हणजे फेसबुक आणि व्हाट्सएपला फीड किंवा  विकिपीडिया बदला साठी संदर्भ म्हणून आहे. म्हणजे बरीच लोक वर्तमानपत्रे फक्त सोशल मीडिया वरती छायाचित्राच्या स्वरूपात  पाहतात.

मराठी वर्तमानपत्रांकडून,  मराठी लोकांच्या सर्व प्रकारच्या इतिहासाचे जतन करण्या बाबत thought-leadership ची अपेक्षा मी तरी करत नाही. वर्तमानपत्र हा एक व्यवसाय आहे आणि तो त्याप्रमाणे चालवला जातो.

मराठीभाषेला डिजिटायझेशनच्या चळवळीची जास्त गरज आहे कारण सध्या त्यात लिहणारे बरेच जण 'wheel reinvent' केल्याच्या आवेशाने लिहीत असतात. १९-२०व्या शतकात मराठीत विविध विषयावरती प्रचंड लेखन झाले आहे. त्यातले बरेच पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध सुद्धा झालेले नाही. ज्या लेखनाची पुस्तके झाली ती बहुसंख्येने बाजारपेठेतून केंव्हाच नाहीशी झाली आहेत आणि त्यांचे पुनर्मुद्रण व्हायची शक्यता शून्य आहे.

बरीच लोक मला- मी प्रसिद्ध केलेल्या फेसबुक पेजवर- हे पुस्तक कुठे मिळेल असे विचारत असतात. ज्यावेगाने पृथ्वीवरून जीवजाती extinct होत आहेत त्या वेगाने मराठी पुस्तके बाजारातून नाहीशी होत आहेत.... bookganga.com वर कित्येक लेखक सर्च करून पहा.

लिखित शब्दांची ही अवस्था तर  चित्रांची काय वर्णावी - त्यांच्या बद्दल तर आधीच उत्साह कमी?

सध्या मराठीत फक्त  'utilitarian' किंवा  'उपयोगी',  किंवा  'सुधारणावादी'  लेखनाचा, कलांचा  उदोउदो करण्याची फॅशन आहे आणि भूतकाळातील फक्त त्याच प्रकारचे लेखन टिकवल्याचा प्रयत्न केला जातो. उदा: महात्मा फुले (१८२७-१८९०) यांचे बहुतांशी लेखन उत्तम स्वरूपात उपलब्ध आहे पण त्यांच्या बहुतेक समकालीनांची परिस्थिती बिकट आहे.

पण हे बदलू शकत.

पुढच्या पिढ्यांना सर्व प्रकारच्या लेखनात इंटरेस्ट वाटू शकतो. त्यांच्या विचाराच्या कक्षा फार मोठ्या प्रमाणात रुंदावू शकतात. मराठी माध्यमांचे सध्याचे बरे-वाईटा चे निकष, उदा : सध्याचा political correctness पूर्वीच्या प्रत्येक गोष्टीला लावण्याची घाणेरडी सवय त्यांना नसू शकते. आपण काहीतरी लिहण्या किंवा बोलण्याआधी इतिहासात अस कोणी लिहिल किंवा बोललय का हे तपासण्याची अभ्यासू सवय त्यांना  असू शकते. अशावेळी डिजिटल presence फार उपयोगी पडू शकतो.

Starting August 15 2007, over the past decade and more, I have created a few pages on English Wikipedia: 

Vasant Sarwate, T S Shejwalkar, M V Dhond, D G Godse, Y D Phadke, S D Phadnis, Sadanand Rege, Natyachhatakar Diwakar

 I have created a few Facebook pages too. Here, I have listed them in alphabetic order showing their number of 'Likes' and/or 'Followers' over the past two years.


Facebook page Address Likes as of Dec 29 2016 Likes as of Dec 25 2017 Followers  as of Dec 9 2018 %Change in 1 year
B S Mardhekar& Co बा. सी. मर्ढेकर आणि कंपनी https://www.facebook.com/myBaSeeMardhekar/?ref=bookmarks 909 1138 1193 4.8%
D G Godse, A Search शोध द. ग. गोडसेंचा https://www.facebook.com/MastaniDaGaGodse/?ref=bookmarks 356 524 561 7.1%
Dinanath Dalal (In Marathi: दीनानाथ दलाल) https://www.facebook.com/artistdinanathdalal/?ref=bookmarks 2329 2509 2692 7.3%
Durga Bhagwat An Appreciation दुर्गा भागवत एक आस्वाद https://www.facebook.com/durgabhagwatappreciation/?ref=bookmarks 1341 1602 1739 8.6%
G A Kulkarni, An Appreciation जी ए कुलकर्णी, एक आस्वाद https://www.facebook.com/myGAKulkarni/?ref=bookmarks 874 1183 1302 10.1%
Gopal Dutt Kulkarni गोपाळ दत्त कुलकर्णी https://www.facebook.com/gopalduttkulkarni/?ref=bookmarks 3 39 41 5.1%
Govindrao Tembe गोविंदराव टेंबे https://www.facebook.com/GovindraoTembe/?ref=bookmarks 639 860 861 0.1%
My Sadanand Rege माझे सदानंद रेगे https://www.facebook.com/mySadanandRege/?ref=bookmarks 431 582 607 4.3%
Natyachhatakar Diwakar नाट्यछटाकार दिवाकर https://www.facebook.com/NatyachhatakarDiwakar/?ref=bookmarks 78 155 172 11.0%
R D Karve, Who? र. धों. कर्वे, कोण? https://www.facebook.com/rdkarve/?ref=bookmarks 813 1071 1078 0.7%
Ram Ganesh Gadkari राम गणेश गडकरी https://www.facebook.com/RamGaneshGadkari/?ref=bookmarks 1612 1842 1870 1.5%
Remembering C V Joshi चिं वि जोशींच स्मरण https://www.facebook.com/ChinViJoshi/?ref=bookmarks 44 164 178 8.5%
Setu Madhavrao Pagdi, A View सेतु माधवराव पगडी, मला दिसलेले https://www.facebook.com/mySetuMadhavraoPagdi/?ref=bookmarks 963 1252 1383 10.5%
Shripad Krushna Kolhatkar, The Greatest श्रीपाद कृष्ण कोल्हटकर https://www.facebook.com/ShripadKrushnaKolhatkar/?ref=bookmarks 502 685 708 3.4%
T S Shejwalkar, Lest We Forget त्र्यं. शं. शेजवलकर, विसरलो का? https://www.facebook.com/HistorianShejwalkar/?ref=bookmarks 307 526 598 13.7%
The Art of Vasant Sarwate वसंत सरवटे यांची कला https://www.facebook.com/vasantsarwateappreciation/?ref=bookmarks 893 1078 1093 1.4%
Two Brothers in Tandem-R K - Narayan & Laxman https://www.facebook.com/Two-Brothers-in-Tandem-R-K-Narayan-Laxman-283141975063419/?ref=bookmarks 24 37 40 8.1%
Vilas Sarang, a literary critic विलास सारंग, टीकाकार https://www.facebook.com/vilassarangcritic/?ref=bookmarks 305 485 543 12.0%
Vishwanath Kashinath Rajwade विश्वनाथ काशिनाथ राजवाडे https://www.facebook.com/VishwanathKashinathRajwade/?ref=bookmarks 1155 1412 1462 3.5%
Who was M V Dhond? कोण बर हे म. वा. धोंड? https://www.facebook.com/MaVaDhond/?ref=bookmarks 14 116 159 37.1%
य दि फडके, एक वाटाड्या Y D Phadke, A Guide https://www.facebook.com/yadiphadkeaguide/?ref=bookmarks 7 204 262 28.4%
Total Likes/ Followers for pages 13599 17464 18542 6.2%

The image of the data above is below: