G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

Shel Silverstein : “Talked my head off Worked my tail off Cried my eyes out Walked my feet off Sang my heart out So you see, There’s really not much left of me.” ~

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

Werner Herzog: “We are surrounded by worn-out, banal, useless and exhausted images, limping and dragging themselves behind the rest of our cultural evolution.”

John Gray: "Unlike Schopenhauer, who lamented the human lot, Leopardi believed that the best response to life is laughter. What fascinated Schopenhauer, along with many later writers, was Leopardi’s insistence that illusion is necessary to human happiness."

Justin E.H. Smith: “One should of course take seriously serious efforts to improve society. But when these efforts fail, in whole or in part, it is only humor that offers redemption. So far, human expectations have always been strained, and have always come, give or take a bit, to nothing. In this respect reality itself has the form of a joke, and humor the force of truth.”

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Monday, May 22, 2017

Wednesday, May 17, 2017

दखवितिल ते मांसल लिंग...जनी बांडे...James 'Lesbian' Bond

Today May 17 2017 is International Day Against Homophobia, Transphobia, and Biphobia
 

बा सी मर्ढेकर:
"...दखवितिल ते भोंक रिकामें
जिथें असावें मांसल लिंग. 
..." (#५६, कांहीं कविता, १९५९/१९७७)

(टीप: हो, 'दखवितिल' , 'दाखवितील' नव्हे! वाट्टेल तसे मर्ढेकरांना उधृत करतात लोक, वर्तमानपत्रात सुद्धा)
 
जुलै २५ २०१६ रोजी दी गार्डियन मध्ये लेख होता: "....it's time for a lesbian Bond."...आणि मला आठवला कै . रमेश मंत्री आणि कै वसंत सरवटेंची निर्मिती 'जनू बांडे'....ज्याचा आता व्हायला पाहिजे 'जनी बांडे'.


ओळखा पाहू  वरील चित्रातील तीन पैकी कोण आहे जनी बांडे ते?


courtesy: the artist(s) and Penguin Books


Sunday, May 14, 2017

अस्तिक अस्तिक काळभैरव...Reading Stories With a Difference: Mother's Day

Today May 14 2017 is Mother's DayArtist: P C Vey, The New Yorker

Our  mother indeed did that....she made us believe that she would protect us from everything...and more, she DID protect us from everything....the night would often start with her reciting of the shloka: "अस्तिक अस्तिक काळभैरव..."

Wednesday, May 10, 2017

...पोळुं दे आंतून तीतें...Grief-berg Hits C V Joshi, R K Narayan, Mark Twain

बा सी मर्ढेकर:
"... 
घेउं दे आघात तीतें
इंद्रिय-द्वारां जगाचे;

पोळुं दे आंतून तीतें
गा अतींद्रियार्थं आंचें. 
..."
(#१, 'आणखी कांही कविता', १९५९/१९७७)

कै. जी ए कुलकर्णींचा पत्र व्यवहार वाचल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात रहाते ती  म्हणजे त्यांनी अनुभवलेले अतिशय जवळच्या लोकांचे अनेक अकाली मृत्यू. जी एंच 'भाग्य' म्हणजे त्यांना त्यांच्या पत्नी वा मुलांचा मृत्यू पाहावा लागला नाही कारण ते जन्मभर अविवाहित राहिले. पण ज्या साहित्यिकांनी संसार केले त्यांचे काय? खालील पोस्ट  मध्ये तीन उदाहरण आहेत: दोन देशी, एक विदेशी.

२०१७साली 'चिं.वि.: साहित्यातले अन् आठवणीतले' हे २०१३ साली प्रकाशित झालेले पुस्तक वाचायला सुरवात केली.

चिं.विंचे (C V Joshi) स्वतःचे लेख सोडून इतर बरेच लेख ('चिं.वि.: साहित्यातले') सामान्य दर्जाचे आहेत, जयंत नारळीकरांची (Jayant Narlikar) प्रस्तावना बरी आहे पण चिं.विंच्या नातेवाईकांनी लिहलेले लेख ('चिं.वि.: आठवणीतले') आयुष्याबद्दल खूप काही सांगून जातात आणि म्हणून ते लेख व दोन कृष्णधवल  फोटो मला आवडले.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे - चिं. विं (१८९२-१९६३) आणि त्यांच्या पत्नींच्या (सरस्वती)  (१९००- १९६६) जीवनावर पडलेली अपत्य मृत्यूंची गडद छाया. पुस्तक वाचून असे कळते कि त्यांना (बहुदा) एकूण तीन मुली आणि चार मुलगे झाले. त्यातील एक मुलगी आणि चारी मुलगे वारले. ही सगळी मुलं जन्मताच मृत्यू न पडता थोडी थोडी मोठी होऊन गेली. एक मुलगा- परशुराम- तर मॅट्रिक होऊन वयाच्या (बहुदा) पंधराव्या वर्षी, मे ४ १९४० रोजी, टायफॉइडने वारला. सगळ्यांनी आठवणींचे मोठे संचीत आईवडिलांसाठी तयार केले.

त्याकाळी मध्यमवर्गीय घरांतून मृत्यूचे थैमान होते हे खरे पण त्यांचे आर्थिंक आणि सामाजिक स्थान पाहता चिं विंचे कुटुंब खूप यात इतरांपेक्षा कितीतरी जास्त होरपळून निघाले.

मी या ब्लॉग वर आर के नारायण (R K Narayan) १९०६-२००१ आणि चिं. विंची तुलना सप्टेंबर १६ २००९रोजी  केली होती. 

काय योगायोग (जो मला त्यावेळी माहित नव्हता) पहा- आर के नारायण यांचे आयुष्य सुद्धा त्यांच्या पत्नीच्या (खालच्या उजवीकडच्या फोटोत डावीकडच्या) टायफॉइडने झालेल्या अकाली मृत्यूने (१९३९) होरपळून निघाले होते. नारायण त्यांच्या, जवळ जवळ संपूर्ण आत्मचरित्रात्मक, 'दी इंग्लिश टीचर', १९४५ मध्ये त्या मृत्यबद्दल म्हणतात: “There are no more surprises and shocks in life, so that I watch the flame without agitation. For me the greatest reality is this and nothing else…Nothing else will worry or interest me in life hereafter.” 

courtesy: current copyrightholders to the images

चिं. विंच्या लेखनात मृत्यू १९४०नंतर अनेक वेळा आले पण ते कधी नारायण यांच्या सारखे त्या बद्दल लिहताना दिसत नाहीत. पण त्यांची वास्तवातील स्थिती फार वेगळी नव्हती याची पुस्तकातील आठवणी वाचून खात्री पटते.

पण विशेष म्हणजे या दोन्ही महान लेखकांची प्रतिभा वा बहुप्रसवता या टायफॉइडच्या उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या धक्क्याने आटल्याचे दिसत नाही. नारायण यांची सर्वोत्तम पुस्तके त्यानंतर आली. चिं. विंच्या लेखनाचा दर्जा सुद्धा किंचितही कमी  झाल्याच जाणवत नाही. दोघांच्या लेखनावर आधारित लोकप्रिय चित्रपट निघाले, लोकप्रिय टीव्ही सीरिअल निघाल्या, दोघांची जवळ जवळ सर्व पुस्तके आज २०१७साली बाजारात मिळतात.

परशुराम चिं जोशीने वडिलांना शय्येवरून दोनदा  सांगितले होते की त्याने गोविंद आपटेकडून (मित्र?) हॉकी स्टिक विकत घेण्यासाठी सहा आणे उधार घेतले आहेत आणि त्याचे ते पैसे परत द्यावेत. नोव्हेंबर २४ १९५८ रोजी चिं.विंनी ते पैसे परत केले. त्यासाठी त्यांनी जे (उत्कृष्ट हस्ताक्षरात) पत्र लिहले ते हे :

 सौजन्य : चिं.विं जोशींचे कुटुंबीय 

त्या पत्रातील एक ओळ पहा: "या पत्राचें उत्तर पाठवू नको."

चिं.विंना त्या विषयाला पूर्णविराम द्यायचाय. परशुरामला दिलेला शब्द ठेवायचाय. परशुराम तर आयुष्यातून जाणारच नाहीये पण गोविंद आपटेंनी पैसे घेऊन टाकले तर किमान परशुरामची ती 'मेंदू बदडणारी' हॉकी स्टीक तरी जायची आशा आहे. 

त्यांच्या पत्नी अपत्य शोकाबद्दल काय म्हणायच्या ते पहा: "... अग, दिवस इतरांचा असतो त्यांच्या समोर काय आपण आपले दुःख सांगत बसायचे, रात्र तर माझी असते, तेव्हा रोज रात्री मी माझ्या मुलांची आठवण काढते..."


डब्ल्यू.  डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार चिं.विंवर झाले. त्यात सर्वात महत्वाचे नाव म्हणजे : मार्क ट्वेन (१८३५-१९१०) कारण ट्वेनयांचा प्रभाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांवरांकडून सुद्धा चिं.विं पर्यंत पोचला असणार.

ट्वेनयांच्या जीवनातील शोक पहा... ते लिहतात:


 “…I lost Susy thirteen years ago; I lost her mother—her incomparable mother!—five and a half years ago; Clara has gone away to live in Europe; and now I have lost Jean. How poor I am, who was once so rich! Seven months ago Mr. Roger died—one of the best friends I ever had, and the nearest perfect, as man and gentleman, I have yet met among my race; within the last six weeks Gilder has passed away, and Laffan—old, old friends of mine. Jean lies yonder, I sit here; we are strangers under our own roof; we kissed hands good-by at this door last night—and it was forever, we never suspecting it. She lies there, and I sit here—writing, busying myself, to keep my heart from breaking. How dazzlingly the sunshine is flooding the hills around! It is like a mockery.
Seventy-four years ago twenty-four days ago. Seventy-four years old yesterday. Who can estimate my age today?
I have looked upon her again. I wonder I can bear it. She looks just as her mother looked when she lay dead in that Florentine villa so long ago. The sweet placidity of death! it is more beautiful than sleep….” ("Jean is dead!', 1909)

Susy, Clara, Jean- ट्वेनयांच्या मुली.  

सुझी  (१८७२-१८९६)- स्पायनल मेनन्जायटिसने वारल्या -  चिं. विंच्या सगळ्यात धाकट्या मुलीला - विद्युल्लता - हाच रोग झाला होता. ती वाचली पण मेंदूवर आयुष्यभर परिणाम झाला.

जीन (१८८०-१९०९)- फेफरे (seizure) येऊन घरातील बाथटब मध्ये बुडून वारल्या.

Saturday, May 06, 2017

पाहावा तो पावच पाव भाजून घेत होता/ तापल्या तव्यावर...Karl Marx Will Soon be 200

 Today May 6 2017 is the beginning of 200th birth anniversary year of Karl Marx (1818-1883).
आजपासून कार्ल मार्क्स यांचा व्दिशताब्दी जयंती महोत्सव सुरु होतोय.
 

पुढच्या एका वर्षाला मार्क्स यांचा रंग या ब्लॉगला नक्कीच लागणार आहे कारण  जरी त्यांच्या 'जाळा'वरती  अनेक लोकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे- बऱ्याच वेळा विषारी- पाव भाजून , दुसऱ्याला खाऊ घातले असले तरी तो काही मार्क्स यांचा दोष नाही. मला त्यांच्या सारख्या आदर्शवादी लोकांच्या आणि, त्याहून जास्त, त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याबाबत फार मोठे कुतूहल वाटत आले आहे.

John Gray:
"What Marx said about communism is wrong and dangerous. His analysis of capitalism, however, is on many points up-to-date. Marx recognized the revolutionary power of capitalist economies – they create wealth, richness, innovation. But they also create uncertainty, and they tend to destroy the middle class."

रा भा पाटणकर:
"... केवळ अनुभवाधिष्ठित ज्ञानावर विसंबायचे ठरविले तर असे लक्षात येते की, आपल्याला इंग्रज-भारतीय संबंधांच्या आर्थिक बाजूकडे विशेष लक्ष द्यायला हवे; म्हणून फुको किंवा सैद यांच्यापेक्षा मार्क्‍स हा जास्त चांगला मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे..."

जी ए कुलकर्णी:
 "...तेव्हा अखेर प्रत्येकाला जाता जाता स्वतःचेच 'तत्वज्ञान' बनवत जगण्याखेरीज काही मार्ग दिसत नाही., कारण धर्माचे मूळ स्वरूप सदैव वैयक्तिकच राहणार. Institutionalized religion म्हणजे एक fraud आहे, किंवा स्काऊट, रोटरी, लायन चळवळीपेक्षा तिला महत्व नाही. ज्यावेळी धर्मच अपुरा पडू लागला तेव्हा काही जणांना Marxism सारखे secular तत्वज्ञान समाधान देऊ शकले. पण त्याबाबतही मी अगदी असाध्य कोडगा ठरतो. त्याच्याइतके अनाकर्षक, वैराण, हमाली तत्वज्ञान मला कुठे आढळले नाही...मार्क्सवादी माणसाचे चित्र काढायचे झाल्यास ठोकळ्यावर ठोकळे ठेवलेली आकृती काढली की पुरे..." 
(पृष्ठ १७९, 'जी एंची निवडक पत्रे', खंड १, १९९५)


Peter Watson: 
“...Nationalism was catastrophic in many  ways, but it also had its positive side. This was nowhere more evident than in regard to the  great flowering of German intellectual life in the nineteenth century which, whether or not it was caused by unification of the country, and by the great feeling of nationalism that accompanied the unification, certainly occurred at exactly the same time.  Sigmund Freud, Max Planck, Ernst Mach, Hermann Helmholtz, Marx, Weber, Nietzsche, Ibsen, Strindberg, von Hofmannsthal, Rudolf Clausius, Wilhelm Rontgen, Eduard  von Hartmann, . . . all these were German or German-speaking...” 

The following brilliant poem by Sadanand Rege (सदानंद रेगे) sums up what happened to Marx and Marxism eventually...

"पाहावा तो पावच पाव भाजून घेत होता
 तापल्या तव्यावर..."courtesy: the current copyright holders to the late Shri. Rege's work

Monday, May 01, 2017

महाराष्ट्र शिल्पी कलावंत निर्यात करत होता, आयात नव्हे!...Contribution of Maharashtra to Mahabalipuram

आज मे १ २०१७, महाराष्ट्र दिवस , महाराष्ट्र दिन 


One stone is a stone.
Two stones is a feature.
Three stones is a wall.
Four stones is a building.
Five stones is a palace.
(Six stones is a palace built by aliens.)
—Archaeological axiom
 
ऑक्टोबर २ २००७ ला मी 'Did Natives Create The Bountiful Art You See In Maharashtra?' ह्या विषयावर लिहले होते. 

मी लिहले कसले,  कै. द ग गोडशांचच म्हणण मला जमल तस लिहल! गोडशांचा २१ पानी मूळ लेख 'छंद' नियतकालिकाच्या (आता केंव्हाच मृत) मे-जून १९५५च्या अंकात आला होता. तोच लेख, 'शिल्पी महाराष्ट्र', त्यांच्या 'समन्दे तलाश', १९८१ मध्ये समाविष्ट आहे. 

गोडशांच्या पाच सर्वोत्कृष्ट लेखात त्याचा समावेश करता येईल. महाराष्ट्रातील शाळांमध्ये तो लेख शिकवला गेला पाहिजे मुलांना समजण्यासाठीकी महाराष्ट्राला केवढी वैभवशाली सांस्कृतिक परंपरा आहे. आणि त्या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला राजाश्रयाच्या बरोबरीने लोकाश्रय होता. सामान्य लोकांनी आपले पैसे खर्च करून जगविख्यात कलानिर्मिती केली.

Frontline’ published 25-part series on Indian art starting with the issue Aug. 11-24, 2007 “Eternal India”.  One of the articles was “Grandeur in caves”. The article covers “vast rock-cut temples and viharas dot the hills of western and eastern India”.

“In western India, the 2nd century B.C. ushered in one of the greatest periods of the art of India and the entire art of Buddhism. Over a period of about 1,000 years, more than 1,200 caves were hewn out of the mountains of the Western Ghats, not very far from the coast of present-day Maharashtra. They were profusely sculpted and painted in the Buddhist traditions. Leaving behind the cares and confusions of the material world, the devotee came to these splendid havens of contemplation…”

हे फ्रंटलाइन मध्ये वाचण्यापेक्षा गोडशांच्या लेखात वाचण्यात एक वेगळीच मस्ती आहे. आणि गोडशांचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ही सगळी कला महाराष्ट्रीय कारागिरांनी तयार केली आहे.   

खाली त्या लेखातील एक छोटा अंश वाचा:


थोडक्यात  म्हणजे फ्रंटलाईन म्हणत त्याप्रमाणे १,००० वर्षे, एका मोठ्या भूप्रदेशात, उच्च दर्जाची, खडकातील,  १,२०० लेणी-गुहा पाडण्यासाठी समाजामध्ये त्या कलेची मूळ खोलवर रुजायला लागतात. समाजान त्यावर प्रचंड पैसा खर्च करायला लागतो, श्रमदान करायला लागत. वरच्या परिच्छेदात उल्लेखल्या प्रमाणे पिढ्यान पिढ्या कॉम्प्लेक्स स्कील्स डेव्हलप व्हायला लागतात. परंपरा तयार व्हायला लागती. तात्पुरती उधार उसनवारी करून ते होत नसत.

इतिहासकार जॉन के ७व्या शतकातील महाराष्ट्राबद्दल काय म्हणतात पहा.


John Keay, ‘India: A History’, 1999:
“...In the course of his wanderings round India, Hsuan Tsang traversed an area of the western Deccan which he calls ‘Mo-ho-la-ch’a’. The translation of proper names from Chinese back into Sanskrit often stretches credulity, but in this case there is little room for doubt: by ‘Mo-ho-la-ch’a’ Hsuan Tsang meant Maharashtra. This was the land either side of the Western Ghats, once the patrimony of the trading Shatavahanas whose cave temples pocked its rocky outcrops, then of the Vakatakas who so loyally served the Guptas, and nowadays more or less the modern state of Maharashtra centred on Bombay. Hsuan Tsang found the soil rich and fertile, which in parts it is; the people were honest but implacable, and they included ‘a band of champions’ who, when both they and their elephants were fired up on alcohol, proved irresistible in battle. ‘No enemy can stand before them,’ wrote the visitor, wherefore their king was able to ‘treat his neighbours with contempt’.
The name of this contemptuous sovereign was given as ‘Pu-lo-ki-she’, otherwise Pulakesin II,...”
दुसरा पुलकेशी ( राज्य इ स ६१०-६४२) यांनी डेक्कन वर (त्यात सध्याच्या महाराष्ट्राचा मोठा भाग आला) राज्य  केले. पहिला नरसिंहवर्मन ( राज्य इ स ६३०-६६८) यांनी त्यांचा पराभव करून वध केला. ही माहिती का देतोय?

महाबलीपुरम मला फार आवडते. बंगालचा उपसागर तिथल्या लेण्यांचे सौन्दर्य कमालीचे वाढवतो. शिवाय तमिळ विनोदबुद्धीचा तिथे झालेला अविष्कार.  फ्रंटलाईन मार्च २९ २०१७ मध्ये श्री शशांक शेखर सिन्हा यांचा माम्मलापुरम (Mamallapuram) वर लेख आहे. त्यामधील हे  उल्लेख पहा:
"The Pallava caves are simpler than the Ajanta or Ellora caves. The historian Upinder Singh says that they have massive pillars that are square at the bottom and the top and chamfered into octagonal shapes in between. The cave facades are generally plain. She points out that the columns at Mamallapuram are comparatively slender with multifaceted shafts (sometimes fluted or round), cushion-shaped capitals and seated lions at the base. Some caves, such as the Adivaraha cave, have a tank in front of them."
 
"...The art historian Percy Brown traces the Pallava mandapas to similar rock-cut caves in Ajanta and Ellora. He says that Narsimhavarman I may have brought the sculptors and artisans to Mamallapuram and Kancheepuram as “spoils of war” following his victory over the Chalukya King Pulakesin II..."

म्हणजे कदाचित महाराष्ट्रीय कलाकारांनी माम्मलापुरमच्या निर्मितीत मोठे योगदान दिले आहे.  आणि काय सांगाव त्यातील काहीजण नंतर पल्लवांच्या सेनेबरोबर कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशियाला सुद्धा पोचले असतील. म्हणजे महाराष्ट्र शिल्पी कलावंत एक्स्पोर्ट करत होता, इम्पोर्ट नव्हे तसेच तंजावरच्या मराठी राजांच्या आधी जवळ जवळ १,००० वर्षे मराठी भाषकांनी खोल दक्षिणेतील संस्कृती संवर्धनाला मदत केली आहे!

हे वाचून गोडशांना खूप आनंद झाला असता पण आश्चर्य वाटल नसत!

फोटो सौजन्य: श्री शशांक शेखर सिन्हा, फ्रंटलाईन

Thursday, April 27, 2017

देवा रे देवा...एअरलिंगळी चावली....Scorpion On Board and In Heart

(टीप : एअरलाईन मधील इंगळी = एअरलिंगळी)

सध्या विमान प्रवास खूप चर्चेत आहेत. 

एका प्रवासाआधी प्रवाशाने एअरलाईन स्टाफला बेदम मारले, दुसऱ्या प्रवासाआधी एअरलाईन स्टाफने प्रवाशाला. 

"a passenger was viciously dragged off of a flight, suffering a concussion, broken bones and lost teeth"
 
ज्यावेळी 'United Airlines Passenger Stung by a Scorpion' अशी बातमी वाचली त्यावेळी आठवले संत एकनाथ आणि त्यांची रचना:

"...अग, .. विंचू चावला
देवा रे देवा.. विंचू चावला
आता काय मी करू.. विंचू चावला


काय मी करू विंचु चावला..."


एकनाथांच्या उरलेल्या ओळीतून सगळ्यांना बरच काही शिकण्यासारखे आहे.

"...या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा

तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
सत्त्वगुण लावा अंगारा, अन्विंचू इंगळी उतरे झरझरा...."

 

Artist: Patrick Chappatte (1967-), The New York Times

Sunday, April 23, 2017

मी बिस्वम्भर रॉय नाही पण... Satyajit Ray Died 25 Years Ago Today

आज एप्रिल २३ २०१७, सत्यजित रे यांचा २५वा स्मृतिदिन


Philip French:
"...Beside my working desk as I write is an autographed photograph of Ray and his friend Akira Kurosawa walking a couple of feet apart and deep in thought in front of the Taj Mahal. It was taken in the mid-70s during a trip to Agra from a film festival in New Delhi, on which I had the privilege to accompany them. It is a constant reminder to me of the heights to which cinema, the great new art of the 20th century, can aspire, and why writing serious criticism can be an honourable undertaking."

एप्रिल १९९२च्या शेवटी, रोजच किमान १२ तास लोड शेडींग असलेल (लोकांच्या घरी इनव्हर्टरच्या बरोबरीने छोटे डिझेल जनरेटर असत!),  कलकत्ता आम्ही सोडल. रे वारल्यानंतर मी अंजुला म्हणालो आता कलकत्ता सोडायच दुःख कमी होईल कारण इथ आता  रे नाहीत. त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी 'नंदन' मध्ये ठेवल होत. मी तेथुन दोन-तीन वेळा तरी चालत गेलो पण आत काही गेलो नाही.

त्यांच घर माझ्या ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर होत. बऱ्याचवेळा मी त्यांच्या घरावरून (बिशप लेफ्रॉय रोड , जे आता पर्यटक आकर्षण झालय म्हणे) चालत गेलो आहे,  विचार करत की अत्ता रे आत असतील का, काय करत असतील!

ते गेल्यावरच्या आठवड्यात अंजु न आणि मी त्यांचे जवळ जवळ सगळे सिनेमा दूरदर्शन वर पहिल्यांदा पहिले. त्यांच्या एवढ्या मोठया कलाकाराच जाण अपेक्षेप्रमाणे कडू-गोड ठरल ...सत्यजित रे कसले गेले? सिनेमा दाखवत बसले...

रें चे कितीतरी उल्लेख ह्या ब्लॉग वर आले आहेत. उदा इथे: "Is She J E Millais's "Mariana" or Ray's "Charulata"?"

 मला सगळ्यात जास्त आवडलेला रें चा सिनेमा, 'चारुलता'हून सुद्धा काकणभर जास्त: जलसाघर, १९५८ (Jalsaghar).

जशी मराठी मध्यमवर्गाला साधारण सन २०००  नंतर आर्थिक सूज येत गेली (प्रामुख्याने मोठ्या शहरातील एक्सपोनेनशियली वाढत गेलेल्या घराच्या किमती, आय.टी., ग्लोबलायझेशनचा चढता आलेख, तगडा डॉलर मुळे) तसा हा सिनेमा मला जास्त आवडत आलाय.

एखाद्या विषयाचा खोल अभ्यास/ वाचन  नसताना त्याबाबत हिरीरीने व्यक्त  होणारे, कुठल्याही गोष्टीकडे जरासुद्धा दीर्घ/ऐतिहासिक दृष्टिकोनातून  न पाहणारे, एकाच नजरेतून जगातील प्रत्येक गोष्ट घटना पाहणारे, ज्याअर्थी आपण (किंवा आपली मुले) आर्थिक किंवा इतर बाबतीत इतके यशस्वी आहोत म्हणजे आपल्याला वाटते ते वैश्विक सत्यच असणार असे समजणारे, बोलण्याचे विषय पैसा-दिसणे-जीम-फिटनेस- वार्षिकव्हेकेशन  इतकेच असलेले नवश्रीमंत माहीम गांगुली सर्व क्षेत्रात  वाढत गेले, आणि त्यातील  काही कधीकधी जवळचे नातेवाईक सुद्धा निघाले!

मी बिस्वम्भर रॉय नाही पण मला त्यांची वेदना समजते- त्यांच्या पत्नी आणि पुत्र शोकाइतकीच ती क्लेशकारक आहे, त्यांचे 'तुफानी' नाहीसे होणे समजते....

 बिस्वम्भर रॉय आणि तूफान : आनंदी दिवसां मध्ये  

पण मला रे सर्वात जास्त आवडतात त्यांच्या लिखाणातील अशा सचोटी मुळे : 
 "… The one thing I am very much interested in is a loner – one person. Quite often in my stories you will see just one person ; he hasn't married, he doesn't have any children, he lives with his own preoccupations … I have personally realised what loneliness is during most of my life. … And often I feel, if I were asked ‘Who is your friend?' I would not be able to name anyone … I am quite alone. Quite alone and I have become used to it. At no time have I regretted the fact that I am alone, or that I lack friends.…”

“The fact that the man doesn’t know what is happening really, doesn’t know the process of history, makes him a figure of pathos. He’s pathetic, like a dinosaur that doesn’t realise why it’s being wiped out.”


 स्वतः रेंनी डिसाईन केलेले जलसाघरचे पोस्टर ... इतके देखणे (उदा: फॉन्ट) आणि बोलके (उदा: दुभंग) पोस्टर मी पहिले नसेन