मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Thursday, October 05, 2017

आम्हाला कायमचे अमेरिकेत नेवून सोडा... Show us Ayodhya, Take us to America

राहुल गांधी, लोकसत्ता, सप्टेंबर २३ २०१७:
"...काँग्रेसची चळवळ हीएनआरआयअर्थात अनिवासी भारतीयांनी उभी केली. महात्मा गांधी अनिवासी भारतीय होते, पंडित जवाहरलाल नेहरू इंग्लंडहून परतले होते, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल हे देखील अनिवासी भारतीयच होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे..." (by the way: विनायक दामोदर सावरकर सुद्धा ह्या व्याख्येने एनआरआय होते.)

वरील अवतरण वाचून त्यासंबंधाने हे आठवले.

खालील कार्टून 'वाङ्मय शोभा' मासिकाच्या ऑगस्ट १९४९ मधले आहे. दुर्दैवाने कलाकाराचे नाव समजत नाहीय.



कार्टून बघून मला गंमत एकाच गोष्टीची वाटली की १९४९ साली 'परदेशी जाणे / भारतात परत येणे' वगैरे विषय 'सकाळ' मध्ये चर्चिले जात आणि वाङ्मय शोभा सारखे आघाडीचे मासिक त्याला पुनर्प्रसिध्दी देत असे!

६८वर्षात सकाळ आणि आपण किती बदललो हे सांगायला नकोच!

आता माकड हा शब्द अपमानास्पद रित्या वापरायचा ठरवलाच तर, भारतात न राहिलेले उच्चशिक्षित लोक  भारतात राहिलेल्या उच्चशिक्षित लोकांना माकड म्हणतील...  ६८ वर्षात भारत कायमचा सोडणे, अयोध्येला गेल्यावर गायब होणे याला इतकी प्रतिष्ठा येईल असे कोणाच्या स्वप्नात सुद्धा आले नसते.

आज वरील कार्टूनची कॅप्शन बदलली पाहिजे .... 'आम्हाला अमेरिका दाखवा' नाही.... 'आम्हाला कायमचे अमेरिकेत नेवून सोडा'!



अरुण कोलटकर त्यांच्या 'द्रोण', २००२-२००४ मध्ये लंका विजयानंतरच्या पार्टीचे वर्णन करतात. त्यात एक पाण्याचे  तळ आहे जे ट्रान्सफॉर्मर सारखे माकडाला माणूस आणि माणसाला माकड करते.

पण जशी पार्टी संपत येते तस काही माकड विचार करायला लागतात की आपल्याला आता पुन्हा माकड व्हायचय की नाही.... त्यावेळी वानरांच्यात चर्चा सुरु होतात...त्या मला आवडल्या:

"एक वृद्ध कपी म्हणाला:

आज तुम्ही त्यांचं
अंधानुकरण करू पाहताय प्रत्येक बाबतीत,

पण कौटुंबिक जीवनाचे आपले आदर्श,
आणि त्यांचे,
सर्वस्वी वेगळे आहेत..."

 "त्यांच्या भावजीवनाला
उथळपणाचा शाप
मिळाल्याशिवाय कसा राहील?

मग भले ते राज्य
करीनात का समुद्रवलयांकित पृथ्वीवर
किंवा आणखी कशावर,

मला तर त्यांची कीवच वाटते,
किंबहुना कुठल्याही वानराला

"



सध्या अमेरिकेत फॉल हंगाम सुरु आहे. 
Kim Philby, ‘My Silent War’, 1968:

“...My FBI friends saw me through the landing formalties and bedded me down in a hotel with a view of Central Park. Next day at Pennsylvania Station, I boarded the train for Washington. The sumach was still in flower and gave me a foretaste of the famous fall, one of the few glories of America which Americans have never exaggerated because exaggeration is impossible....”