"The lively three-striped palm squirrels can often be seen scampering along green patches, pathways and hostels at @iitmadras. Enjoy a pleasant walk with them!"
Photo Credit: IIT Madras Heritage Centre
फोटोत हे लिहले नाहीये की ह्या खारी किती विध्वंसक असू शकायच्या!
1982 साली मी मिरजेहून माझ्या ब्रह्मपुत्रा होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत परतलो होतो. सोबत माझ्या आईने करून दिलेला माझा त्याकाळातील अतिप्रिय पातळ पोह्यांचा चिवडा होता. तो मी भिंतीतील कप्प्यात सर्वात वरती ठेवला होता. चिवडा त्यावेळी मिळणाऱ्या सर्फच्या मोठया पेट बरणीत होता. मी त्या चिवड्याकडे एखाद्या मांजरासारखे पहात असे. मला तो जमेल तेवढा पुरवून खायचा होता...
आणि एक दिवस घात झाला. मी खोलीचे मागचे दार बंद करायला विसरलो- पहिल्यांदाच आणि एकदाच. त्यातून खार आत आली. तिने बरणीचे वरचे जाड आणि टणक झाकण कुरतडले आणि सर्व चिवडा खाऊन पसार झाली....
मी परत आल्यावर ते पाहून रडकुंडीला आलो होतो, आजही इतक्या वर्षांनंतर त्याची चुटपुट आहे...
"दाणे दाणे" पें लिखा है खानेवाले का नाम... (आईच्या चिवड्यात खूप तळून घातलेले दाणे असत)