मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

Friedrich Nietzsche: “Everybody wants the same, everybody is the same: whoever feels different goes voluntarily into a madhouse.”

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे:
"... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

John Gray: "Unlike Schopenhauer, who lamented the human lot, Leopardi believed that the best response to life is laughter. What fascinated Schopenhauer, along with many later writers, was Leopardi’s insistence that illusion is necessary to human happiness."

Justin E.H. Smith: “One should of course take seriously serious efforts to improve society. But when these efforts fail, in whole or in part, it is only humor that offers redemption. So far, human expectations have always been strained, and have always come, give or take a bit, to nothing. In this respect reality itself has the form of a joke, and humor the force of truth.”

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Wednesday, April 04, 2018

डॉ॰ मार्टिन लूथर किंग, जूनियर आणि पु ल देशपांडे यांचे तुझें आहे तुजपाशीं....He Should Sweep Streets Even As Michelangelo Painted....

#MartinLutherKingJr.   #पुलदेशपांडेजन्मशताब्दीवर्ष 

डॉ॰ मार्टिन लूथर किंग, जूनियर वारले त्याला आज एप्रिल ४ २०१८ला ५०वर्ष पूर्ण होतायत.... ते वारले त्यावेळी मी ७ वर्षाचा होतो....माझ्या संपूर्ण शालेय अभ्यासक्रमात मला त्यांचे नाव वाचल्याचे आठवत नाही.... मला कदाचित विस्मरण होत असेल पण मला त्यावेळच्या खूप गोष्टी आठवतात.... पण त्यांच्याबद्दल वर्गात चर्चा कधी झाल्याचे आठवत  नाही. 

मराठीत त्यांच्यावर एखादी सुंदर कविता किंवा लेख वाचल्याचे सुद्धा आठवत नाही.. . 

त्यामानाने त्यांचे समकालीन प्रे जॉन केनेडींवर पुष्कळ चर्चा, फोटो, व पु काळे सारख्यांनी त्यांचे केलेले कौतुक वगैरे आठवते....

१९५४साली श्री. किंग म्हणाले होते :
 "If a man is called to be a streetsweeper, he should sweep streets even as Michelangelo painted, or Beethoven composed music, or Shakespeare wrote poetry. He should sweep streets so well that all heaven and earth will pause to say, here lived a great streetsweeper that did his job well."

आता पु लंनी लिहलेला नाटकातील खालील संवाद वाचा: 
",,,उषा: तुम्हांला सगळ्याचाच मझा वाटतो.

काकाजी: पाहिलं नीट म्हणजे बराबर मझा दिसतो. इंदूर स्टेशनात एकदा एक भंगी दोन लंब्या झाडू घेऊन कचरा काढीत होता. उषा, अरे ऐश्या झाडू फिरवीत होता, की तुझ्या सतीशला बॅट देखील फिरवता येणार नाही तशी."
('तुझें आहे तुजपाशीं', १९५७)

पहिली गोष्ट म्हणजे, महात्मा गांधी, विनोबा, आणि कालांतरानंतर बाबा आमटे यांना मानणाऱ्या पुलंना स्वच्छता कामगारांबद्दल आदर वाटणे, त्यांच्या कामाचे महत्व वाटणे, त्यांच्या सारख्या विकसित आणि प्रगल्भ सौन्दर्यदृष्टीला त्यातील सौन्दर्य दिसणे यात काहीच विशेष नाही.

दुसरी गोष्ट, भारतीय संस्कृतीत एखाद्याला कामात समाधान वाटणे, त्यात देव शोधणे हे सुद्धा काही संतांचे साहित्य वाचले असेल तर धक्का देणारे  नाही. उदा:
संत जनाबाई:
"झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥"


पण आपल्या रोजच्या कामात कलानंद शोधणे? हे जपान सारख्या पौर्वात्य संस्कृतीत नवीन नसेल पण भारतीय संस्कृतीत नवीन आहे.


"When the spring arrives
And I sit outside, working,
I am never bored.
With a chisel in hand
I can raise flowers from stones." 
(A Japanese Haiku quoted by the late N J Nanporia in his article on Japan in The Times of India dated around 1980)

तेंव्हा किंगनी सांगितले आणि इंदूर स्टेशन वरील सफाई कामगारांनी ते जणू ऐकले आणि पुलंनी ते पहिले. म्हणून मला वाटते पुलंनी त्या संवादाची  स्फूर्ती किंग यांच्या वक्तव्यातून घेतली असेल.

आणि याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही कारण पुलं चे कमी गाजलेले / खपलेले साहित्य वाचून आणि त्यांचे इतर उपक्रम पाहून अस वाटत की त्यांच वाचन चौफेर होत.

उदा: रवींद्रनाथ टागोराच्या महानतेची योग्य ओळख मराठी वाचकाला करून देतात, टी एस इलियट यांची कविता किती सहजपणे आणि किती योग्यठिकाणी ते quote करतात, जीएंना 'पिंगळावेळ' वाचून पत्र लिहतात, नवकवितेची प्रचंड हसवणारी विडंबन करतात (ज्यासाठी ती कविता पहिल्यांदा पचवायला लागते), 'त्याचे व्यवच्छेदक लक्षण' सारखा निबंध लिहतात, मर्ढेकरांची कविता सार्वजनिकपणे वाचून मर्ढेकर पुन्हा चर्चेत आणतात, जॉर्ज बर्नाड शॉ यांचे नाटक जणू त्यांनी मूळात मराठीत लिहल्यासारखे निर्मितात, हेमिंग्वे यांच्या कादंबरीचा (जरा कमअस्सल) अनुवाद करतात  वगैरे....
मला, हा वरील, पुलंचा नाटकातला संवाद भयानक आवडला होता..... त्याचे थोडे क्रेडिट किंग ना द्यायला हवे!

Artist: Alan Dunn, The New Yorker, July 31 1971