भारताने सोबतच्या जाहिरातीत (वाङ्मय शोभा ऑक्टोबर १९५८) दाखवल्याप्रमाणे मेट्रिक पद्धत ऑक्टोबर १९५८ साली स्वीकारली.
मी १९६५ साली मिरजेच्या भारत भूषण या मराठी शाळेत पाहिलीत गेलो आणि पुढील दोन-तीन वर्षांत आमच्या कडून मेट्रिक पद्धत घोटून घेतली गेली , मी स्वतः मैल, फूट, इंच, यार्ड, फर्लांग वगैरे शब्द तुरळक प्रमाणात तो पर्यंत आणि नंतरही वापरले होते/ आहेत (आजही आपण फूट, इंच वापरतोच)...
आम्हाला घोकायचे गाणे होते मिली-सेंटी-डेसी -मीटर- डेका- हेकटो -किलोमीटर ...अंकगणितात पण हे सगळे यायचे...
पण मी त्यातील डेसी, डेका अंतरासाठी, वजनासाठी, आकारमानासाठी ना कधी वापरले आहे , ना वापरल्याचे ऐकले आहे!