"It's too early to tell."
“...Though China had been (J. L.) Nehru’s biggest mistake, Kashmir was his greatest failure....”
(‘India: A History'. Revised and Updated, 2010)
खालील सिनेमा पोस्टर पहा.
'हिंदोस्तान'चा युवक नि 'चीन'ची युवति यांचा विवाह झाला - आणि त्या विवाहानें ९००,०००,००० लोकांमध्ये कायमचा स्नेहभाव निर्माण झाला'....[सध्या , गुगल नुसार, ९००,०००,००० (नव्वद कोटी) नव्हे तर २,६८२,०००,००० ( दोनशेअडुसष्ट कोटी)! ]... दुर्दैवाने तो (कायमचा स्नेहभाव) झाला असला तरी फार वर्ष टिकला नाही...
श्री अमीर खान यांचा 'दंगल', २०१६ चीनमध्ये अतिशय लोकप्रिय झालेला आहे असे म्हणतात पण सध्या वेगवेगळ्या कारणांनी दोन देशातील तणाव प्रचंड वाढला आहे...
तो नक्कीच कमी होईल पण त्या पार्श्वभूमीवर वाङ्मयशोभेच्या मे १९४६च्या अंकातील जाहिरात पाहून बरे वाटले....
कै. व्ही शांताराम यांच्या द्रष्टेपणाला या निमित्ताने दाद दिली पाहिजे...१९४५-४६ साली त्यांना हे समजत होत की भारत-चीन स्नेहभाव हा आशियाच्या, जगाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे ते...लक्षात घ्या त्यावेळी राजकीय परिस्थिती आत्तापेक्षा अतिशय वेगळी होती. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते, चीन मध्ये यादवी युद्ध सुरु होते आणि भारत अजून स्वतंत्र व्हायचा होता.
दुसरी एक गोष्ट - एक 'साधा' मराठी माणूस (डॉक्टर कोटणीस) शांतता नोबेल पुरस्काराच्या योग्यतेच काम करून गेला आहे.
या कहाणी सारखीच आणखी एक प्रेमकहाणी तयार होते आहे असे बऱ्याच काळ, बऱ्याच जणांना वाटत होते ....
पण तसे अजिबात घडले नाही , त्याऐवजी युद्ध झाल... जे एका अर्थाने अजून संपलेले नाही....