गोडसे व्हिस्टलरांच्या व्यक्तिमत्वावर व कलेवर फार खुष होते, हे आपल्याला पदोपदी जाणवते. पुस्तकाचे शीर्षकच म्हणजे व्हिस्टलरांचे बोध चिन्ह आहे. नांगी असलेले फुलपाखरू= a stylized butterfly possessing a long stinger for a tail.
गोडशांचे मस्तानी प्रेम आणि व्हिस्टलर प्रेम या अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याला अनेक आंग, अगदी फ्रॉइडीअन (Freudian) सुद्धा, आहेत असे मला वाटते.
एका ठिकाणी (पृष्ठ ४०) गोडसे व्हिस्टलर लेखात लिहतात :
या अतिशय हृदय वर्णनात मात्र गोडसेंचा गोंधळ उडाला आहे! त्यांनी त्यांच्या मनपटलावर व्हिस्टलरची दोन चित्रे एकत्र केली आहेत.
वरील वर्णन बऱ्याच प्रमाणात खालील चित्राला लागू आहे.
'Nocturne in Blue and Gold: Old Battersea Bridge'
या चित्राचे नाव आहे 'नॉक्टर्न इन ब्लू अँड गोल्ड: जुना बॅटरसी ब्रिज'. मात्र या चित्रात मला तरी 'चांदण्यातील मखमली नीलिमा' कुठं दिसत नाहीय आणि ... आणि नसणारच कारण 'नॉक्टर्न इन ब्लू अँड सिल्वर...अथवा बॅटरसी ब्रिज' हे समीकरणच चुकीचे आहे. बरोबर समीकरण आहेत 'नॉक्टर्न इन ब्लू अँड गोल्ड... अथवा जुना बॅटरसी ब्रिज' आणि 'नॉक्टर्न इन ब्लू अँड सिल्वर...अथवा चेल्सी'!
सौजन्य : विकिपीडिया
मराठी ललित (nonfiction) लेखनांमधून अशा बऱ्याच चुका (factual errors) सापडत असतात. ३ एप्रिल २०१६ ची त्यावरील एक नोंद (When There Were No Wikipedia and Google...and Now That They Are Here...) पहा.