मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

Friedrich Nietzsche: “Everybody wants the same, everybody is the same: whoever feels different goes voluntarily into a madhouse.”

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे:
"... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

John Gray: "Unlike Schopenhauer, who lamented the human lot, Leopardi believed that the best response to life is laughter. What fascinated Schopenhauer, along with many later writers, was Leopardi’s insistence that illusion is necessary to human happiness."

Justin E.H. Smith: “One should of course take seriously serious efforts to improve society. But when these efforts fail, in whole or in part, it is only humor that offers redemption. So far, human expectations have always been strained, and have always come, give or take a bit, to nothing. In this respect reality itself has the form of a joke, and humor the force of truth.”

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Sunday, December 31, 2017

फेसबुकावरील स्मारके -२....Memorials on Facebook-II

ह्या शतकाच्या जवळजवळ प्रारंभी पासून मी मराठी साहित्याला/इतिहासाला  प्रचंड मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशनची तातडीची गरज आहे हे सांगत आहे... ह्या ब्लॉग वर त्या स्वरूपाचे लेखन जागोजागी आहे....

मराठीतील कित्येक दिवंगत लेखक, मासिके, वर्तमानपत्रे- ते टिकायचे असतील तर-  इंटरनेट वर उपलब्ध होणे आवश्यक आहे...

'वाङ्मय शोभा'च्या पाठोपाठ माणूस , सत्यकथा, मौज, ललित (?) यांचे सर्व अंक उपलब्ध होणार असे ऐकून आहे ... हे अत्यंत स्वागतार्ह आहे....

पण त्यातील प्रत्येक गोष्ट searchable पाहिजे ... उदा: बुकगंगा वरचे 'वाङ्मय शोभा' चे अंक searchable नाहीयेत .... त्यामुळे गुगल सर्च मध्ये 'वाङ्मय शोभा' मधील result केंव्हाच येत नाही... आवडो न आवडो, विकिपीडिया आणि गुगल जे विसरत, ते हळूहळू सगळे विसरतात!

मराठी वर्तमानपत्रे, काही मासिके  याबाबत बोटचेपी भूमिका घेत आहेत कारण त्यातील बरेच जण ब्लॉग, विकिपीडिया, फेसबुक, व्हाट्सएप, इंटरनेट मंडळे यांना आपला प्रतिस्पर्धी मानायला लागले आहेत (आणि ते बऱ्याच प्रमाणात खर आहे!).  त्यामुळे ते त्यांचा बऱ्याचदा  उल्लेख सुद्धा करत नाहीत. (इंग्रजी मधील प्रसिद्ध वर्तमानपत्रे, छापलेली मासिके  मात्र त्यांचा उल्लेख आता जास्त करायला लागले आहेत.)

मराठी वर्तमानपत्रांचे भविष्य काय याबद्दल मला काहीही अंदाज नाही पण सध्या त्यांचा एक महत्वाचा उपयोग म्हणजे फेसबुक आणि व्हाट्सएपला फीड किंवा  विकिपीडिया बदला साठी संदर्भ म्हणून आहे. म्हणजे बरीच लोक वर्तमानपत्रे सोशल मीडिया वरती छायाचित्राच्या स्वरूपात फक्त पाहतात.

मराठी वर्तमानपत्रांकडून,  मराठी लोकांच्या सर्व प्रकारच्या इतिहासाचे जतन करण्या बाबत thought-leadership ची अपेक्षा मी तरी करत नाही.

मराठीभाषेला डिजिटायझेशनच्या चळवळीची जास्त गरज आहे कारण सध्या त्यात लिहणारे बरेच जण 'wheel reinvent' केलेल्या आवेशाने लिहीत असतात. १९-२०व्या शतकात मराठीत विविध विषयावरती प्रचंड लेखन झाले आहे. त्यातले बरेच पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध सुद्धा झालेले नाही. ज्या लेखनाची पुस्तके झाली ती बाजारपेठेतून केंव्हाच नाहीशी झाली आहेत आणि त्यांचे पुनर्मुद्रण व्हायची शक्यता शून्य आहे.  (बरीच लोक मला- मी प्रसिद्ध केलेल्या फेसबुक पेजवर- हे पुस्तक कुठे मिळेल असे विचारत असतात. ) लिखित शब्दांची ही अवस्था तर  चित्रांची काय वर्णावी ?  सध्या मराठीत फक्त  'committed' किंवा  'उपोयोगी' किंवा  'डाव्या'  लेखनाचा/ कलांचा  उदोउदो करण्याची फॅशन आहे. उदा: महात्मा फुले (१८२७-१८९०) यांचे बहुतांशी लेखन उत्तम स्वरूपात उपलब्ध आहे पण त्यांच्या बहुतेक समकालीनांची परिस्थिती बिकट आहे.

पण हे बदलू शकत. पुढच्या पिढ्यांना सर्व प्रकारच्या लेखनात इंटरेस्ट वाटू शकतो. त्यांच्या विचाराच्या कक्षा फार मोठ्या प्रमाणात रुंदावू शकतात. वर्तमानाचे बरे वाईटचे निकष पूर्वीच्या प्रत्येक गोष्टीला लावण्याची घाणेरडी सवय त्यांना नसू शकते. आपण काहीतरी लिहण्या किंवा बोलण्याआधी इतिहासात अस कोणी लिहिल किंवा बोललय का अशी अभ्यासू सवय त्यांना  असू शकते. अशावेळी डिजिटल presence फार उपयोगी पडू शकतो.

Starting August 15 2007, over the past decade and more, I have created a few pages on English Wikipedia:
Vasant Sarwate, T S Shejwalkar, M V Dhond, D G Godse, Y D Phadke, S D Phadnis, Sadanand Rege, Natyachhatakar Diwakar, C V Joshi

 I have created a few Facebook pages too. Here, I have listed them in alphabetic order showing likes in December last year and this year.

 

Facebook page Address Likes as of Dec 29 2016 Likes as of Dec 25 2017 %Change in 1 year
1 B S Mardhekar& Co बा. सी. मर्ढेकर आणि कंपनी https://www.facebook.com/myBaSeeMardhekar/?ref=bookmarks 909 1138 25.2%
2 D G Godse, A Search शोध द. ग. गोडसेंचा https://www.facebook.com/MastaniDaGaGodse/?ref=bookmarks 356 524 47.2%
3 Dinanath Dalal (In Marathi: दीनानाथ दलाल) https://www.facebook.com/artistdinanathdalal/?ref=bookmarks 2329 2509 7.7%
4 Durga Bhagwat An Appreciation दुर्गा भागवत एक आस्वाद https://www.facebook.com/durgabhagwatappreciation/?ref=bookmarks 1341 1602 19.5%
5 G A Kulkarni, An Appreciation जी ए कुलकर्णी, एक आस्वाद https://www.facebook.com/myGAKulkarni/?ref=bookmarks 874 1183 35.4%
6 Gopal Dutt Kulkarni गोपाळ दत्त कुलकर्णी https://www.facebook.com/gopalduttkulkarni/?ref=bookmarks 3 39 1200.0%
7 Govindrao Tembe गोविंदराव टेंबे https://www.facebook.com/GovindraoTembe/?ref=bookmarks 639 860 34.6%
8 My Sadanand Rege माझे सदानंद रेगे https://www.facebook.com/mySadanandRege/?ref=bookmarks 431 582 35.0%
9 Natyachhatakar Diwakar नाट्यछटाकार दिवाकर https://www.facebook.com/NatyachhatakarDiwakar/?ref=bookmarks 78 155 98.7%
10 R D Karve, Who? र. धों. कर्वे, कोण? https://www.facebook.com/rdkarve/?ref=bookmarks 813 1071 31.7%
11 Ram Ganesh Gadkari राम गणेश गडकरी https://www.facebook.com/RamGaneshGadkari/?ref=bookmarks 1612 1842 14.3%
12 Remembering C V Joshi चिं वि जोशींच स्मरण https://www.facebook.com/ChinViJoshi/?ref=bookmarks 44 164 272.7%
13 Setu Madhavrao Pagdi, A View सेतु माधवराव पगडी, मला दिसलेले https://www.facebook.com/mySetuMadhavraoPagdi/?ref=bookmarks 963 1252 30.0%
14 Shripad Krushna Kolhatkar, The Greatest श्रीपाद कृष्ण कोल्हटकर https://www.facebook.com/ShripadKrushnaKolhatkar/?ref=bookmarks 502 685 36.5%
15 T S Shejwalkar, Lest We Forget त्र्यं. शं. शेजवलकर, विसरलो का? https://www.facebook.com/HistorianShejwalkar/?ref=bookmarks 307 526 71.3%
16 The Art of Vasant Sarwate वसंत सरवटे यांची कला https://www.facebook.com/vasantsarwateappreciation/?ref=bookmarks 893 1078 20.7%
17 Two Brothers in Tandem-R K - Narayan & Laxman https://www.facebook.com/Two-Brothers-in-Tandem-R-K-Narayan-Laxman-283141975063419/?ref=bookmarks 24 37 54.2%
18 Vilas Sarang, a literary critic विलास सारंग, टीकाकार https://www.facebook.com/vilassarangcritic/?ref=bookmarks 305 485 59.0%
19 Vishwanath Kashinath Rajwade विश्वनाथ काशिनाथ राजवाडे https://www.facebook.com/VishwanathKashinathRajwade/?ref=bookmarks 1155 1412 22.3%
20 Who was M V Dhond? कोण बर हे म. वा. धोंड? https://www.facebook.com/MaVaDhond/?ref=bookmarks 14 116 728.6%
21 य दि फडके, एक वाटाड्या Y D Phadke, A Guide https://www.facebook.com/yadiphadkeaguide/?ref=bookmarks 7 204 2814.3%

Total Likes for pages 13599 17464 28.4%