द न्यू यॉर्कर ने "The Great Influenza", २००४ चे लेखक John M. Barry यांची मुलाखत घेतली आहे .
काही वर्षांपूर्वी मला दोन प्रश्न भेडसावत होते -
१> भारताने १९१८ साली या संकटाचा मुकाबला कसा केला ज्यामध्ये भारतीय उपखंडातील साधारण १.७ ते १.८ कोटी लोक मृत्यमुखी पडली. महाराष्ट्रात मुंबई , पुणे खूप बाधित शहरे होती.
साबरमती आश्रमात देशाचे नेतृत्व लवकरच करणाऱ्या महात्मा गांधींना सुद्धा लागण झाली होती. ते इतरांच्या सल्ल्यानुसार वागत त्यातून मुक्त झाले.
२. तरीसुद्धा हा आजार मराठी साहित्यात क्वचितच येतो, का?
त्यासाठी मी बॅरी यांचे पुस्तक २००६ साली विकत घेतले आणि त्या विषयात संशोधन करणाऱ्या श्रीमती म्रिदूला रामण्णा यांच्याशी संपर्क केला.
पहिल्या प्रश्नाचे उत्तर श्री रामण्णा यांच्या लेखात मिळाले पण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेले नाही.
मी मागे पहिले महायुद्ध मराठी साहित्यात का नाही या बद्दल सुद्धा आश्चर्य व्यक्त केले होते. त्याचे एक उत्तर कदाचित असे की त्यावेळी प्रसिद्ध झालेले मराठी साहित्य बहुतांशी ब्राह्मण लिहीत असत आणि ब्रिटिशांनी ब्राह्मणांचा त्यांच्या सैन्यातील प्रवेश कमी केला होता, किंबहुना थांबवला होता. त्यामुळे ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या असंख्य भारतीय सैनिकांत मराठी ब्राह्मण अतिशय कमी होते.... वगैरे.
पण युद्धानंतर आलेल्या फ्लु ने तर असा भेदभाव नक्कीच केला नसेल.
पण मी अलीकडे वाचले की तो फ्लू तत्कालीन इंग्लिश साहित्यात सुद्धा कमी आहे.
"Despite its vast toll, the pandemic was never a big theme in American literature—an absence the historian Alfred Crosby calls “puzzling.” But a few leading writers who lived through it created accounts that remain vivid in ways a medical journal can never be. Thomas Wolfe witnessed the suffering at his mother’s boardinghouse..."
कृतज्ञता : श्रीमती म्रिदूला रामण्णा, त्यांनी स्वत: मला त्यांचा लेख पाठवला , त्याचे पहिले पान