Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Monday, May 20, 2019
नोहा आणि नोहाच्या देवाचा भेदाभेद ...Twitter Is Unclean!
Friday, May 17, 2019
Why Not Catch-18?...Something Happened!
Sunday, May 12, 2019
Straw Dogs and Coco The Jolly Dog
Wednesday, May 08, 2019
सूर्यफुलांच्या शय्येवर / निजलो एका वेश्येला घेऊन...How Van Gogh Lost Both The Ears!
मी
व्हॅन गॉव्...
मी
सूर्यफुलांच्या शय्येवर
निजलो एका वेश्येला घेऊन
अन् दिला तिला
माझाच एक कान कापून ...
ई S S S S
अखेर हिरव्यां सांवल्यांचा डोहांत
आत्महत्या केली मी
तिची मी
उन्हाची
पिवळीजर्द... विवस्त्र किंकाळी ऐकून
....
(ऑक्टोबर २८ १९५५, पृष्ठ ७४, 'अक्षरवेल', १९५७/ १९८६)
कलाकार: हॅरी ब्लिस
काय घडले होते २३ डिसेंबर १८८८ ला:
"सूर्यफुलांच्या शय्येवर
निजलो एका वेश्येला घेऊन
अन् दिला तिला
माझाच एक कान कापून ..." हे असं काही बहुदा घडल नाही! अर्थात, १९५५ साली रेगेंना ही सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती नसेल.....
एक घटना, दोन व्यंगचित्रे!
Saturday, May 04, 2019
वाङ्मय शोभा १९३९-२०१९...Vangmay Shobha@80
ज्यात मराठीतील अनेक गाजलेल्या लेखकांनी (उदा: चिं वि जोशी, जी. ए कुलकर्णी) , कवींनी (उदा: सदानंद रेगे) , चित्रकारांनी (उदा: दलाल, मुळगावकर, गोडसे, सहस्रबुद्धे, सरवटे, फडणीस, श्याम जोशी) आपले कार्य प्रसिद्ध झालेले पहिले ते वाङ्मय शोभा ह्या महिन्यात ८० वर्षांचे झाले असते....
कलाकार : पद्मा सहस्त्रबुद्धे, वाङ्मय शोभा, मे १९६३
चित्रात अनेक पूर्वीच्या अंकांची मुखपृष्ठे दिसत आहेत. त्यातील दुसऱ्या रांगेतील सगळ्यात उजवीकडचे उत्कृष्ट मुखपृष्ठ पद्मा सहस्रबुद्धे यांचेच आहे.
Thursday, May 02, 2019
Mona Lisa Draws Leonardo da Vinci
Wednesday, May 01, 2019
Monday, April 29, 2019
राधे , तुझा सैल अम्बाडा !....१९४८ सालचा सैल अंबाडा आणि संस्कृती रक्षक....Marathi Culture Vultures Circa 1948
या पोस्ट मधील इमेज मोठी करून जरूर वाचा.
१> त्यामधील डावीकडची मनमोहन यांची कविता तुफान लोकप्रिय झाली होती.
२> सप्टेंबर १९४८मध्ये ही कविता असलेल्या वाङ्मयशोभाच्या १०,००० प्रती काढण्यात आल्या होत्या!(भारताची लोकसंख्या १९४७ साली ३३ कोटी होती, आज २०१९ साली १३४ कोटी. म्हणजे आज ४१,००० प्रती काढल्या सारखे आहे. त्याशिवाय त्यावेळी प्रौढ साक्षरता खूप कमी होती. आणि circulation libraries खूप होत्या त्यामुळे एक अंक अनेक लोकांपर्यंत पोचायचा. थोडक्यात, हा सप्टेंबर १९४८ चा अंक फार मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचला असेल. )
३> ही कविता संस्कृती रक्षकांना अश्लील वाटली होती!
ही कविता जर अश्लील असेल तर मर्ढेकर कसे पचणार होते या रक्षकांना? अशा प्रकारच्या रक्षकांमुळे २०व्या शतकातील सर्वश्रेष्ठ मराठी कवीचे जीवन कमी झाले.
(एका प्रश्न मनात येतो - साहित्यावर सेन्सॉर बोर्ड सुद्धा एके दिवशी येईल असे उपरोधाने लिहून झाल्यावर पुढे मर्ढेकरांवर अश्लीलतेचा खटला झाला तेंव्हा वाङ्मय शोभेने मर्ढेकरांची बाजू लावून धरली होती का? का र धों कर्व्यांसारखे ते मर्ढेकरांच्या अनाकलनीय अशा विरोधात होते?)
कलाकार: रघुवीर मुळगावकर , वाङ्मय शोभा, नोव्हेंबर १९४८









