मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Friday, February 02, 2018

स्मशानांवरही 'हाऊस फुल्ल' चे फलक झळकू लागले...1918 Flu Pandemic @100


#1918flupandemicat100

'The first victim diagnosed with the new strain of flu' was, Wikipedia informs, on Monday, March 11, 1918'. The pandemic went on to kill 3 to 5% of world population. As many as 17 million died in India, about 5% of India's population at the time.

W. H. Auden:

"...Unendowed with wealth or pity,
Little birds with scarlet legs,
Sitting on their speckled eggs,
Eye each flu-infected city..."
 
चिंतामण गणेश कोल्हटकर (श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या नाटकाचा प्रयोग बसवताना ,  पावसाळा  १९१८, मुक्काम मुंबई): "... पूर्णांशाच्या फलप्राप्तीसाठी नव्या नाटकाचा प्रयोग करण्याच्या तयारीत आम्ही गुंतलो असता परमेश्वरी योजनेची नव्या प्रयोगाची सिद्धता होऊन चुकली होती. तीही एक यशस्वी दुःखांतिकाच होती. त्या नव्या नाटकाचे नाव होते 'इन्पल्युएंझा. त्याचे तंत्र अगदी नवीन होते. या परमेश्वरी दुःखान्तिकेची लोकप्रियता इतकी पराकोटीला पोहोचली, की स्मशानांवरही 'हाऊस फुल्ल' चे फलक झळकू लागले. प्रतिदिनी बाराशे-तेराशे माणूस मृत्युमुखी पडू लागले. नवागतांना जागा देण्यासाठी अर्धेमुर्धे दहन झालेले देह ढोसून समुद्रात लोटून द्यावे लागत. हल्लकल्लोळ उडाला. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले..."
(पृष्ठ: १३३, 'बहुरूपी', १९५७)

सेतु माधवराव पगडी: ".... १९१८ची इन्फ्लुएंझा साथ मला चांगलीच आठवते. स्मशानाकडे जाणारी वाट आमच्या घरावरून असे. रोज पाच पंचवीस तरी प्रेते घरावरून जात. आम्ही मुले घाबरून जात असू... "
(पृष्ठ २८, 'जीवनसेतु', १९६९)"

Gravin Francis, London Review of Books, January 25 2018:
"... Although there was no effective treatment for the virus, aspirin was taken by the tonne (its German manufacturer, Bayer, was suspected of spreading flu through its pills); aspirin poisoning possibly killed some who would otherwise have survived. Across the world communities adapted traditional remedies: in China, public sweat baths, opium and herbal extracts; in India, hill tribes moulded figures out of flour and water, and waved them over the sick...
...The virus is currently held in a high-security facility in Atlanta, Georgia. In 2016, around 1.7 million people died from tuberculosis, around a million from HIV/Aids, and around half a million from malaria. Computer modelling suggests that if the 1918 H1N1 virus were to break out of the facility in Atlanta it would cause around thirty million deaths."
 
माझ्या लहानपणा पासून फ्लू हा  शब्द किरकोळ थंडीतापाला वापरला जातो पण मी ही पोस्ट लिहू शकलो कारण माझे दोन्हीकडचे आज्जी आजोबा १९१८च्या फ्लू मध्ये बळी पडले नाहीत! एकतृतीयांशाहून जास्त भारतीयांना त्याची लागण झाली होती आणि,  विकिपीडियाच्या म्हणण्या प्रमाणे, १.७ कोटी लोक त्यात बळी पडले.  आज तशी भयंकर लागण झाली तर भारताच्या लोकसंख्येच्या ५% , म्हणजे साधारण ६.६ कोटी लोक दगावू शकतात!

Shashi Tharoor:
"... During the Spanish Influenza epidemic of 1918, 125 million cases of ‘flu were recorded (more than a third of the population), and India’s fatality rate was higher than any Western country’s: 12.5 million people died. As the American statesman (and three-time Democratic presidential candidate) William Jennings Bryan pointed out, many Britons were referring to the deaths caused by plague as ‘a providential remedy for overpopulation’. It was ironic, said Bryan, that British rule was sought to be justified on the grounds that ‘it keeps the people from killing each other, and the plague praised because it removes those whom the Government has saved from slaughter!’.
Arguably, epidemics existed before colonialism as well, and cannot be said to have been caused or worsened by colonial policy; so they are not comparable, for the purposes of my argument, with famines. But their persistence, and the tragically high human toll they exacted remain a severe indictment of the indifference to Indian suffering of those who ran the British Raj. This is all the more true because ‘marked improvements in public health’ are often cited by defenders of British rule in India. There is not a great deal of evidence for this claim, which rests largely on the introduction of quinine as an anti-malarial drug (though its principal use was in the tonics with which the British in jungle outposts drowned and justified their gin), public programmes of vaccination against smallpox (so inadequate that it was only well after Independence that a free India eradicated this scourge from the country) and improvements in water supplies (done so ineffectually, in fact, that cholera and other waterborne diseases persisted throughout the Raj). It is also telling that there were no great hospitals established by the Raj anywhere in the country: strikingly, every one of the major modern medical establishments of British India was established by the generosity of Indian benefactors, even if, for understandable reasons, these Indian donors often named their hospitals after British colonial grandees...."
 ('An Era of Darkness: The British Empire in India', 2016)

ज्या सांगली जिल्ह्यात मी बालपण घालवले , त्यात कॉलेज , नदीवरचा पूल 'साहेबाच्या' नावान आहे पण कुठल हॉस्पिटल नाही. ज्या हॉस्पिटलचे आम्ही कुटुंबीय कृतज्ञ आहोत, ज्यात लक्ष्मीबाई टिळकांनी नोकरी करायचा प्रयत्न केला, ते कनेडीयन/ अमेरिकन मिशनराच्या (वानलेस) नावाने आहे.


Artist: Peter C Vey, The New Yorker, January 2018

Tuesday, January 30, 2018

लिंकनवध आणि महाराष्ट्रातील म. गांधीवधा नंतरच्या घटना....Deaths of A. Lincoln and Mahatma Gandhi

आज जानेवारी ३० २०१८ रोजी म. गांधी हत्येला ७०वर्षे पूर्ण होत आहेत. 

दुर्गा भागवत, 'अक्ष्रर', दिवाळी अंक १९९१, 'भावसंचित', २०१५:
"...गांधीहत्येनंतर ब्राह्मणांना मारहाण झाली. घरेही जाळण्यात आली. पण त्यावेळीही आम्हाला जराही उपद्रव पोहोचला नव्हता. पण आता वाढत्या जातीच्या वाढत्या हिंस्त्र दुराभिमानाच्या काळी मात्र प्रत्येक जात-जमात स्वतः काही न करता हिंसाचार मुकाटपणे स्वीकारायला शिकू पहाते आहे. त्यामुळे हिंसक कृत्यांचा विपरीत परिणामही आम्ही 'आमच नशीब' नि 'नित्याचच झाल' असे म्हणून मिळेल तेवढे सुख मिळेल तसे पदरी पाडून घेतो. आणि हिंसेचे दार बंद करू धजत नाही."

नरहर कुरुंदकर, 'शिवरात्र', साधना प्रकाशन, १९७०:


(कृतज्ञता : कुरुंदकरांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स)

मी मिरजेला १९६१-१९८१ काळात राहिलो. १९८५ साली आम्ही मिरज कायमचे सोडले. .

मिरजेत गांधीवधानंतरच्या, १९४८ फेब्रुवारी,  झालेल्या घटना नेहमी थोड्या वयाने मोठ्या लोकांकडून ऐकू येत. अगदी आमच्या समोरच राहणाऱ्या हिंदु कुटुंबातील एक व्यक्ती जाळपोळ आणि लूट (arson and looting) करणाऱ्या जमावाच्या अग्रस्थानी कशी होती हे सांगितल जात असे. ती व्यक्ती आम्ही नेहमी पहात असू  (आणि थोडी भीती सुद्धा वाटत असे).

त्यानंतर गांधीवधानंतरचे ब्राह्मणांवरचे हल्ले अनेक ठिकाणी वाचनात आले, प्रामुख्याने भालजी पेंढारकरांचे आत्मचरित्र, वगैरे....काही जळलेली, अजूनपर्यंत खुणा सांगणारी, ठिकाण पण पहिली आहेत.

य दि फडक्यांनी या विषयाबाबत लिहल आहे. सगळ्यात लक्षात राहिलय दुर्गा भागवंताच्या चरित्रकार प्रतिभा रानडे यांचा लेख. त्यावेळी त्या कोल्हापुरात होत्या. आसाम मध्ये रहात असताना आम्ही जी उल्फा उग्रवाद्यांची   भीती कित्येक महिने अखंड अनुभवली ती श्रीमती रानड्यांनी, काही दिवस का होईना, कोल्हापुरातच, आपल्या घरात राहून अनुभवली.

हाच प्रकार इंदिरा गांधी हत्येनंतर शिखांबाबत झाला. अमेरिकेत डॉ॰ मार्टिन लूथर किंग, जूनियर यांची हत्या झाल्यावर बऱ्याच ठिकाणी हिंसाचार झाला. 

म. गांधींचा वध हा त्यांच्या देशवासीयाने गोळ्या मारून केला. आपल्या परमप्रिय लाडक्या नेत्याच्या असा हिंसक मृत्यू झाल्यानंतर त्याचा राग एखाद्या जाती / जमाती वरती अत्यंत क्रूरपणे काढण हे भारतात या वधानंतरच सुरु झाल का? हे भारतात किती वेळा झालय? हे भारतात कुठून आल?

१९४८ पर्यंत, १९व्या आणि २०व्या शतकात अनेक राजांच्या, राष्ट्राध्यक्षांच्या, उमरावांच्या, नोकरशहांच्या, राष्ट्रीय नेत्यांच्या, प्रमुखांच्या  हत्या जगात झाल्या होत्या. पण त्या लांबलचक यादीत म. गांधी इतका लोकप्रिय नेता फक्त एकच असावा: प्रे. एब्राहम लिंकन. दोन्ही नेते राष्ट्रपिता.

खालील परिच्छेद वाचा.

लिंकन यांच्या मृत्यनंतर अमेरिकेतील दाक्षिणात्यांच्या विरुद्ध मोठा हिंसाचार होवू शकला असता, पण केवळ नशिबाने झाला नाही. ह्यामुळे मला अस वाटत की ही हिंसाचाराची कल्पना भारतात अमेरिकेतून आली. (अर्थात हे ही ध्यानात ठेवले पाहिजे की २०व्या शतकातील इतर घटना - रशियन ऑक्टोबर क्रांती, दोन महायुद्धे आणि रक्तरंजीत भारताची फाळणी- पण याला कुठेतरी जबाबदार होत्या.)


Richard White, ‘The Republic for Which It Stands: The United States during Reconstruction and the Gilded Age, 1865-1896 ‘, 2017:
“...On Good Friday, April 14, 1865, John Wilkes Booth shot Abraham Lincoln in Ford’s Theatre in Washington, D.C. Lincoln died the next day. For a country inclined to see the war as God’s judgment on the national sin of slavery, the shooting on the day the Christian savior died was deeply symbolic. William Dean Howells was then a young journalist and aspiring novelist. He had written a campaign biography of Lincoln and been rewarded with the post of consul in Venice. Lincoln’s death, he thought, fell “upon every American like a personal calamity.” It blackened the national future, “but thank God they cannot assassinate a whole Republic: the People is immortal.”1
The People might be immortal, but who counted as “the People” was open to question. Not everyone mourned. Many Southerners, at least privately, rejoiced, and so did some Northern Copperheads, though public celebration was dangerous. That there would be vengeance was certain, but whether it would extend beyond the assassins was unclear. Calls for the extermination of the traitors were common, and most Southerners fell within the net of treason. Gen. Carl Schurz thought the Confederates should be grateful that most of their troops had already surrendered because if the Union army were still on the march the slaughter would have rivaled that of Attila the Hun. Mary Butler in Pennsylvania called for “death to all traitors,” and she included among them her cousin and suitor Frank. But calls for vengeance quickly narrowed first to the Southern leadership and then to the assassins themselves.
With rage focused on Booth and his fellow conspirators, real and imagined, the nation gave way to grief. “A Nation in Tears” read the Chicago Tribune’s headline on April 17. The trial and execution of Booth’s accused co-conspirators would be far less than fair, but despite the nation’s fury, there was little violence against Confederate sympathizers....”


Abraham Lincoln’s home in Springfield, Illinois, draped in mourning. Library of Congress,

Saturday, January 27, 2018

...पण टारझन दाढी केव्हापासून करायला लागला?...Tarzan Movies @100

#TarzanMoviesAt100 

१०० वर्षांपूर्वी , २७ जानेवारी १९१८ रोजी, पहिला टारझन सिनेमा- टारझन ऑफ दि एप्स- प्रदर्शित झाला. 

आयुष्यात सिनेमा आवडायला सुरवात झाली त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे जॉनी वेसमुल्लर (Johnny Weissmuller) यांचे टारझन सिनेमा....

' Tarzan of the Apes' is considered the most faithful to the novel of all the film adaptations.



Artist: Joe Dator, The New Yorker, 2014

Tuesday, January 23, 2018

मराठी सिनेमात रावण केंव्हाच handsome dude झाला....ACK's Ravana is NOW a Handsome Dude


सौजन्य : अमर चित्र कथा

'दी हिंदू' मध्ये डिसेंबर १६ २०१७रोजी श्री प्रीती डेव्हिड यांचा हा लेख पहिला: "And now, a dapper Ravana: Amar Chitra Katha undergoesmakeover". 

 "...And if you pick up a comic today, you will notice that Ravana is now a handsome dude, Rama has a six-pack, and the Vanara army has both fair and dark characters...."

 ....रावण आत्ता handsome dude झाला? 

मराठी सिनेमात तर हे केंव्हाच झालं होत... 'रम्य ही स्वर्गाहून लंका'... ह्या अप्रतिम गाण्यातील (चित्रपट: स्वयंवर झाले सीतेचे १९६४) कै चंद्रकांत मांडरे  यांचे व्यक्तिमत्व पहा. यापेक्षा कोणी dude handsome असूच शकत नाही...

 सौजन्य: कॉपीराईट होल्डर्स , Ultra 

तीच गोष्ट कै. बाबूराव पेंढारकरांच्या किचकाची,  गाणं - 'धुंद मधुमती रात रे' चित्रपट : 'किचकवध', १९५९

सौजन्य: कॉपीराईट होल्डर्स , राजश्री मराठी

Sunday, January 21, 2018

Trash Cans During The French Revolution: Was Louis XVI Blonde or Ginger?

#LouisXVI #FrenchRevolution225

#MessOfGuillotining

Today January 21 2018 is 225th anniversary of guillotining of Louis XVI
Wikipedia:

“The execution of Louis XVI, by means of the guillotine, took place on 21 January 1793 at the Place de la Révolution ("Revolution Square", formerly Place Louis XV, and renamed Place de la Concorde in 1795) in Paris. It was a major event of the French Revolution.”


Artist: Mike Williams, The Spectator, UK, September 2016