"...गांधीहत्येनंतर ब्राह्मणांना मारहाण झाली. घरेही जाळण्यात आली. पण त्यावेळीही आम्हाला जराही उपद्रव पोहोचला नव्हता. पण आता वाढत्या जातीच्या वाढत्या हिंस्त्र दुराभिमानाच्या काळी मात्र प्रत्येक जात-जमात स्वतः काही न करता हिंसाचार मुकाटपणे स्वीकारायला शिकू पहाते आहे. त्यामुळे हिंसक कृत्यांचा विपरीत परिणामही आम्ही 'आमच नशीब' नि 'नित्याचच झाल' असे म्हणून मिळेल तेवढे सुख मिळेल तसे पदरी पाडून घेतो. आणि हिंसेचे दार बंद करू धजत नाही."
नरहर कुरुंदकर, 'शिवरात्र', साधना प्रकाशन, १९७०:
मी मिरजेला १९६१-१९८१ काळात राहिलो. १९८५ साली आम्ही मिरज कायमचे सोडले. .
मिरजेत गांधीवधानंतरच्या, १९४८ फेब्रुवारी, झालेल्या घटना नेहमी थोड्या वयाने मोठ्या लोकांकडून ऐकू येत. अगदी आमच्या समोरच राहणाऱ्या हिंदु कुटुंबातील एक व्यक्ती जाळपोळ आणि लूट (arson and looting) करणाऱ्या जमावाच्या अग्रस्थानी कशी होती हे सांगितल जात असे. ती व्यक्ती आम्ही नेहमी पहात असू (आणि थोडी भीती सुद्धा वाटत असे).
त्यानंतर गांधीवधानंतरचे ब्राह्मणांवरचे हल्ले अनेक ठिकाणी वाचनात आले, प्रामुख्याने भालजी पेंढारकरांचे आत्मचरित्र, वगैरे....काही जळलेली, अजूनपर्यंत खुणा सांगणारी, ठिकाण पण पहिली आहेत.
य दि फडक्यांनी या विषयाबाबत लिहल आहे. सगळ्यात लक्षात राहिलय दुर्गा भागवंताच्या चरित्रकार प्रतिभा रानडे यांचा लेख. त्यावेळी त्या कोल्हापुरात होत्या. आसाम मध्ये रहात असताना आम्ही जी उल्फा उग्रवाद्यांची भीती कित्येक महिने अखंड अनुभवली ती श्रीमती रानड्यांनी, काही दिवस का होईना, कोल्हापुरातच, आपल्या घरात राहून अनुभवली.
हाच प्रकार इंदिरा गांधी हत्येनंतर शिखांबाबत झाला. अमेरिकेत डॉ॰ मार्टिन लूथर किंग, जूनियर यांची हत्या झाल्यावर बऱ्याच ठिकाणी हिंसाचार झाला.
म. गांधींचा वध हा त्यांच्या देशवासीयाने गोळ्या मारून केला. आपल्या परमप्रिय लाडक्या नेत्याच्या असा हिंसक मृत्यू झाल्यानंतर त्याचा राग एखाद्या जाती / जमाती वरती अत्यंत क्रूरपणे काढण हे भारतात या वधानंतरच सुरु झाल का? हे भारतात किती वेळा झालय? हे भारतात कुठून आल?
१९४८ पर्यंत, १९व्या आणि २०व्या शतकात अनेक राजांच्या, राष्ट्राध्यक्षांच्या, उमरावांच्या, नोकरशहांच्या, राष्ट्रीय नेत्यांच्या, प्रमुखांच्या हत्या जगात झाल्या होत्या. पण त्या लांबलचक यादीत म. गांधी इतका लोकप्रिय नेता फक्त एकच असावा: प्रे. एब्राहम लिंकन. दोन्ही नेते राष्ट्रपिता.
खालील परिच्छेद वाचा.
लिंकन यांच्या मृत्यनंतर अमेरिकेतील दाक्षिणात्यांच्या विरुद्ध मोठा हिंसाचार होवू शकला असता, पण केवळ नशिबाने झाला नाही. ह्यामुळे मला अस वाटत की ही हिंसाचाराची कल्पना भारतात अमेरिकेतून आली. (अर्थात हे ही ध्यानात ठेवले पाहिजे की २०व्या शतकातील इतर घटना - रशियन ऑक्टोबर क्रांती, दोन महायुद्धे आणि रक्तरंजीत भारताची फाळणी- पण याला कुठेतरी जबाबदार होत्या.)
No comments:
Post a Comment