courtesy: AJC and the artist
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Sunday, October 23, 2016
Dell or Samsung?: Osama bin Laden's Dilemma!
courtesy: AJC and the artist
Wednesday, October 19, 2016
मराठीत लिहलेल्या जागतिक इतिहासासाठी मानदंड कोणता? 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'...Books on Hitler
Richard J. Evans:
“...But the number of broad, general, large-scale histories of Nazi Germany that have been written for a general audience can be counted on the fingers of one hand. The first of these, and by far the most successful, was William L. Shirer’s The Rise and Fall of the Third Reich, published in 1960. Shirer’s book has probably sold millions of copies in the four decades or more since its appearance. It has never gone out of print and remains the first port of call for many people who want a readable general history of Nazi Germany. There are good reasons for the book’s success. Shirer was an American journalist who reported from Nazi Germany until the United States entered the war in December, 1941, and he had a journalist’s eye for the telling detail and the illuminating incident. His book is full of human interest, with many arresting quotations from the actors in the drama, and it is written with all the flair and style of a seasoned reporter’s despatches from the front. Yet it was universally panned by professional historians. The emigré German scholar Klaus Epstein spoke for many when he pointed out that Shirer’s book presented an ‘unbelievably crude’ account of German history, making it all seem to lead up inevitably to the Nazi seizure of power. It had ’glaring gaps’ in its coverage. It concentrated far too much on high politics, foreign policy and military events, and even in 1960 it was ‘in no way abreast of current scholarship dealing with the Nazi period’. Getting on for half a century later, this comment is even more justified than it was in Epstein’s day. For all its virtues, therefore, Shirer’s book cannot really deliver a history of Nazi Germany that meets the demands of the early twenty-first-century reader...”
माधव रा. कंटक:
"...' विश्वशांतीची समस्या', संजीवनी', 'कल्पांत' यांसारखे आधुनिक काळातील जागतिक समस्यांवरील लेख लिहले ते फक्त शेजवलकरांनीच... " ('पानिपत १९६१', ले: त्र्यं. शं. शेजवलकर, १९६१/१९९८)
मराठी लेखक वि ग कानिटकर ऑगस्ट २०१६ मध्ये वारले.
मी त्यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही आणि विकतही घेतलेले नाही (विकत घेतलेली नेहमी वाचतोच असे नाही!). पण लहानपणा पासून मी त्यांचे नाव वाचत आलो आहे - 'माणूस' मधून, त्यांच्या पुस्तकांच्या केलेल्या जाहिरातींमधून...
त्यांचे एकच पुस्तक, ते गेले त्यादिवशी मला आठवले: "नाझी भस्मासुराचा उदयास्त", १९६६...हे पुस्तक (या पुढे 'नाभउ') अनुवादित नाही...'दी हिंदू'च्या मते श्री. विल्यम शिरर (William L. Shirer) यांच्या 'दी राईज अँड फॉल दी थर्ड राईख', १९६० ('The Rise and Fall of the Third Reich') वर ते 'मॉडेल' केल आहे. सध्या 'नाभउ'ची २६वी आवृत्ती बाजारात आहे. दी हिंदू च्या मते ते ४५वेळा पुनर्मुद्रित केल गेल आहे.
लोकसत्ताने त्यांच्यावर मृत्युलेख लिहला.
या संबंधी मनात आलेले काही विचार खाली व्यक्त करत आहे.
एडॉल्फ हिटलर ही मानवी इतिहासातील महत्वाची व्यक्ती होती/ आहे. जगातील सर्व लिखित भाषेत त्यांच्यावर लेखन झाले असेल. त्यांच्यावरील पुस्तकांची संख्या हजारो (लाखो?) आहे.
श्री. व्होल्कर उलरिश (Volker Ullrich) हे हिटलरचे चरित्र जर्मनमध्ये लिहीत आहेत. 'Hitler: Ascent, 1889-1939' या नावाने पहिला खंड २०१३ साली प्रसिद्ध झाला आणि खूप गाजला.
उलरिश आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत (जमल्यास ती संपूर्ण प्रस्तावना मुळातून वाचा) आतापर्यंत हिटलरवर लिहल्या गेलेल्या पुस्तकांबद्दल काय म्हणतात ते पहा:
कै. कानिटकरांचे पुस्तक- 'नाभउ'- वर उद्धृत केलेल्या पहिल्या दोन पुस्तकांनंतर आले आणि श्री. फेस्ट व श्री. केरशॉ यांच्या पुस्तकांआधी.
सरकारी नोकरी सांभाळत लेखन करणाऱ्या, कै. कानिटकरांकडे असे काय वेगळे कौशल्य होते, हिटलर किंवा तत्कालीन युरप संबंधातील अशी काय माहिती होती, असा काय वेगळा दृष्टिकोन होता की, ज्याला इंग्लिश वाचता येते अशा मराठी वाचकाने, त्या पाच जगदविख्यात पुस्तकांव्यतिरिक्त त्यांचे पुस्तक वाचावे? ते केवळ मराठीत आहे म्हणून?
आणि जास्त महत्वाचा प्रश्न असा की: मराठीत ती वरील पाच पुस्तके- जशी आहेत तशी- का अनुवादित झाली नाहीत, होत नाहीत? मराठी वाचक अशा जागतिक दर्जाच्या ज्ञानापासून किती वर्षे वंचित राहणार आणि मराठीतील चर्चा सुद्धा मराठीत छापल्या गेलेल्या ज्ञानापुरत्याच मर्यादित राहणार का? ज्यावेळी लोकसत्ता म्हणते की 'सरळ सोप्या मराठीत, कंटाळवाणी प्राध्यापकी पंडिती शैली टाळून' म्हणजे 'मराठीत' एवढाच त्याचा अर्थ आहे का? का लोकसत्ताच्या मते त्या पाच पुस्तकांची शैली 'कंटाळवाणी प्राध्यापकी पंडिती' आहे? आणि 'कंटाळवाणी प्राध्यापकी पंडिती' शैली टाळून लिहलेला इतिहास खूप कमअस्सल असेल तर? एक इतिहास म्हणून 'नाभउ'च्या दर्जाबद्दल लिहले गेले आहे का? का 'लोकसत्ता', कै. श्री .ग. माजगावकर आणि 'माणूस' यांच्या बद्दलचा आदर आणि 'नाभउ'ची लोकप्रियता यामुळे असे कोणतेही प्रश्न विचारायला इच्छुक नाही?
'सकाळ'ला वर दिलेल्या कानिटकरांच्या मुलाखतीत मला खालील भाग जास्त रोचक वाटला:
"...1870 ते 1920 या पन्नास वर्षांच्या कालखंडात अनेक कर्तबगार मंडळी होऊन गेली. साहित्यिक हरिभाऊ आपटे, रावसाहेब कानिटकर, सर्कसवाले छत्रे, भास्करबुवा बखले या नामवंत मंडळींच्या आयुष्यातील काही प्रसंगावरून मी या कथा लिहिल्या. उदाहरणच द्यायचं झालं तर हरिभाऊ आपटे आणि रावसाहेब कानिटकर यांच्यात "गीतांजली'च्या अनुवादावरून जे मतभेद झाले व त्यांचे संबंध दुरावले, त्याबद्दल मी माझ्या कल्पनाशक्तीने लिहिले; मात्र सत्याचा अपलाप न करता लिहिले. मराठी साहित्यात हा वेगळा प्रकार होता. त्याची जेवढी दखल घेतली जायला हवी होती, तेवढी घेतली गेली नाही...."
हे कानिटकर मला वाचावेसे वाटतात. आपल्या जवळच्या इतिहासाकडे कल्पकतेने पाहणारे. दुर्बीण नाही तर भिंग घेऊन बसलेले!


