मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Thursday, June 10, 2021

'अष्टदर्शने' पुस्तकात डेव्हीड ह्यूम यांचा समावेश यासाठी नसावा? ...Why Vinda Karandikar Probably Didn't Choose David Hume

 विंदा करंदीकर यांच्या ज्ञानपीठ विजेत्या 'अष्टदर्शने' पुस्तकात डेव्हीड ह्यूम यांचा समावेश नसल्याबद्दल मी पूर्वी ( फेब्रुवारी १ २०११, मार्च २१ २०१०, डिसेंबर ११ २००९)  नापसंती व्यक्त केली होती.  

पण Julian Baggini यांचा मे ५ २०२१ चा प्रॉस्पेक्ट मधील लेख वाचून ती टोच कमी झाली. 

"... How did one of the greatest philosophers who ever lived get so much wrong? David Hume certainly deserves his place in the philosophers’ pantheon, but when it comes to politics, he erred time and again. The 18th-century giant of the Scottish Enlightenment was sceptical of democracy and—despite his reputation as “the great infidel”—in favour of an established church. He was iffy on the equality of women and notoriously racist. He took part in a pointless military raid on France without publicly questioning its legitimacy.

In unravelling the Hume paradox, what we find is that the very qualities that made Hume such a brilliant philosopher also made him a flawed political thinker. There are implications here for contemporary academic philosophy—whose much-vaunted “transferable critical skills” turn out not to transfer so well after all. Styles of thinking that work brilliantly in some domains fail miserably in others: indeed, some of our biggest mistakes arise when we transfer a way of thinking apt for one domain to another where it just doesn’t fit. There are consequences, too, for day-to-day and working life: Hume shows that the smartest person in the room isn’t necessarily the smartest choice for the job. And then there are general implications for the way in which a healthy intellectual scepticism, the essential precondition for rational enquiry in science and much else, can easily become a fatalistic cynicism about the prospects for building a better society...."


 सौजन्य/ कलाकार: अविनाश गोवारीकर, कमल शेडगे

Sunday, June 06, 2021

भारतीय लोककथांची एक महत्वाची दूत ...Folk Literature Recommended by Durgabai Bhagwat

 दुर्गाबाई भागवत जानेवारी १९६३ मध्ये लिहतात : 

"... भारतीय लोककथांच्या पहिल्या पाच संग्रहातले हे एक पुस्तक आहे.  मेरी फ्रियरचे Old Deccan Days, मेव्ह स्टोक्सचे Indian Fairy Tales, नटेश शास्त्री यांचे South Indian Tales, लाल बिहारी डे यांचे Tales of the Bengal, आणि फ्लोरा स्टीलचे Tales of the Punjab ही ती पाच पुस्तके. 

लोकसाहित्याच्या अभ्यासकाला या पाची संग्रहांची माहिती असणे आवश्यक आहे एवढेच नव्हे, तर ते संग्रहही जवळ असणे अगत्याचे आहे..." ('भारतीय लोककथांची एक अग्रदूत : फ्लोरा ऍनी स्टील', भावसंचित, २०१५)

ही १८६८ ते १८९४ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेली पाचही पुस्तके  प्रोजेक्ट गुटेनबर्ग ह्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. (इतरत्रही उपलब्ध आहेत.)

 Tales of the Punjab told by the people, 1894 by Flora Annie Webster Steel

Old Deccan Days; or, Hindoo Fairy Legends Current in Southern India, 1868 by Mary Frere

Indian Fairy Tales, 1879 by Maive Stokes

Tales of the Sun; or, Folklore of Southern India, 1890 by Lucas Cleeve & Pandit Natesa Sastri

Folk-Tales of Bengal (1883, illustrations by Warwick Goble dated 1912) by Lal Behari Day


  artist: Warwick Goble for Folk-Tales of Bengal by Lal Behari Day

Friday, June 04, 2021

गोपाळ गणेश आगरकर यांनी अनुवादासाठी हॅम्लेट का निवडले?...Not Utilitarianism But Because of 19th Century...Agarkar and Hamlet

 माझी ह्या ब्लॉग वरची ऑक्टोबर २२ २०१३ची पोस्ट पहा. 

अशोक शहाणे त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकात लिहतात:  "...टिळकांनी तुरुंगात 'गीतारहस्य' लिहल. अन नेहमी ठाम बोलणार्या आगरकरांनी मात्र 'हॅम्लेट'चं रुपांतर केल. 'विकारविलसिताबद्दल मात्र महाराष्ट्र आगरकरांच्या ऋणात राहील ". 

'विकारविलसित' अथवा शेक्सपीअरकृत हॉम्लेट नाटकाचे भाषांतर ' १८८३ साली प्रसिद्ध झाले. 

ह ना आपटे आगरकरांनी तो अनुवाद का केला या बद्दल सांगतात :  "...त्याची (शेक्सपीअरची) नाटके म्हणजे, विकारविलसितकारांच्या मताप्रमाणे केवळ मनोरंजनार्थ नाहीत, तर ती त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाचून त्यांचा अभ्यास केला असता आपणास जीर्णारण्याप्रमाणे भासणार्या जगात उपयोगी पडणारी वर्तणूक शिकवणारी आहेत.…" ('निवडक हरि नारायण आपटे', संपादक - विद्याधर पुंडलीक

त्याचे एक महत्वाचे कारण काय असावे याचा थोडा अंदाज मला एप्रिल २०२१ मध्ये एमा स्मिथ यांचे 'This Is Shakespeare' हे पुस्तक पाहताना आला : "... For the nineteenth century, Hamlet was identified as Shakespeare’s greatest tragedy, as clever, modishly alienated men saw themselves reflected in its cerebral and isolated protagonist. But as the twentieth century unleashed its mad cruelties at Passchendaele, Auschwitz and Hiroshima, King Lear insinuated itself in the cultural imagination instead...."

clever, modishly alienated men गोपाळ गणेश आगरकर (१८५६- १८९५) स्वतःला नक्कीच  saw themselves reflected in its cerebral and isolated protagonist...

हे कारण असू शकते!  त्यांचे १८८२ चे 'डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस' पुस्तक पहा .. आगरकर रुपी हॅम्लेट दिसतो तेथे!

 


  कलाकार : Milton Glaser

Tuesday, June 01, 2021

जीएंच्या स्वामी आणि आर के नारायण यांच्या गाईड मधले साम्य...Swamis of R K Narayan and G A Kulkarni

Michael Gorra: 

“…and in the end The Guide shows how Raju comes to fulfill his given role. He may enter upon his fast unwillingly, his life as a swami may have started as a kind of imposture, and yet the mask does begin to fit him, or he to fit the mask. His character grows into the plot that’s been written for it, performing the dharma from which the maya of his affair with Rosie, his attachment to the things of this world, had distracted him. We can read it on his brow, and when he tells Velan his story, he discovers that it makes no difference to the esteem in which the villager holds him…”

गाईड, १९६५ सिनेमा (माझ्या मते भारताच्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील १९४९-१९६५ शेवटचा सिनेमा) शैलेंद्र यांच्या या गाण्याबरोबर सुरु होतो :

"वहाँ कौन है तेरा मुसाफिर !!जाएगा कहाँ!!
दम ले ले घड़ी भर..ये छइयाँ पाएगा कहाँ!!
वहाँ कौन है तेरा...
बीत गए दिन प्यार के पल-छीन..सपना बनी ये रातें
भूल गए वो तू भी भुला दे..प्यार की वो मुलाकातें!
सब दूर आंधेरा..मुसाफिर जाएगा कहाँ...
कोई भी तेरी राह ने देखे..नैन बिछाए न कोई!
दर्द से तेरे कोई ना तड़पा..आँख किसी की ना रोई!
कहे किसको तू मेरा..मुसाफिर जाएगा कहाँ...
तूने तो सबको राह बताई..तू अपनी मंज़िल क्यूँ भूला!
सुलझा के राजा औरों की उलझन..क्यूँ कच्चे धागों में झूला!!
क्यूँ नाचे सपेरा..मुसाफिर जाएगा कहाँ...
कहते हैं ज्ञानी दुनिया है फानी..पानी पे लिखी लिखाई!
है सबकी देखी है सबकी जानी...हाथ किसी के ना आनी!!
कुछ तेरा ना मेरा..मुसाफिर जाएगा कहाँ..."
 
'स्वामी', १९७३ मध्ये सुद्धा असेच विचार (व्यक्त आणि अव्यक्त) स्वामी आणि महंताच्या मनात दिसतात. 
 
नारायण यांचा स्वामी मोठ्या घोळक्यात अडकला आहे तर जीएंचा एकांतवासात. 'स्वामी' मध्ये महंत आणि त्याच्या संस्थेला स्वामीला डांबून त्याच्या नावाने कारभार करायचा असतो, 'गाईड' मध्ये त्यांना स्वामीजीने पाऊस पडायला हवाय. 
 
दोघेही स्वामी अडकलेले आहेत , आता सुटका मृत्यूनेच... 
 
 courtesy: Penguin Classics
 

Friday, May 28, 2021

शृंगारिक नागकेशर...Sensuous Cobra Saffron and Perhaps Clay of Karnataka

 दुर्गाबाई भागवतांचा 'फुलभेट' हा 'प्रासंगिका' १९७५-२००३ मधील लेख मला नुसता आवडतो नाही तर तो मला अतिशय शृंगारिक वाटतो. 

नागकेशराचे (Mesua ferrea) फुल मी काही फार वेळा पहिले नसेल. त्याचा वास सुद्धा मला आठवत नाहीये. त्या फुलावर हा लेख आहे. 

त्यात दुर्गाबाई  एका साठ  वर्षाहून जास्त वय असणाऱ्या बेळगावमधील सौ. तमण्णाचार्य, ज्यांच्या घरी त्यावेळी त्या गेल्या होत्या,  यांचे वर्णन थोडक्यात करतात :

"१९३६ चे वर्ष असावे ... तमण्णाचार्यांची पत्नी साठीपलीकडे पोचली असूनही अत्यंत सुंदर होती. केस फक्त पिकले होते. पण त्या रुपेरी केसांची शोभाही अपूर्व होती. रंग सतेज गुलाबी; चेहरा अतिशय रेखीव, बांधा सुडौल, बाई अत्यंत नीटनेटकी. लुगडे चापूनचोपून नेसलेली. दागिन्यांनी मढलेली. केसांत नेहमी गजरा. नाकात चमकी. आपल्या रूपाची जाणीव क्षणभरही न विसरणारी  व्यक्ती मला अजून दुसरी दिसलीच नाही..." (पृष्ठ ३३)

मला तर लहानपणचा 'चांदोबा' आणि त्यातील एकाहून एक सौष्ठवपूर्ण स्रीया आठवल्या. 


 लोक कबूल करोत अथवा नाही, चांदोबाच्या लोकप्रियतेचे ते एक महत्वाचे कारण होते. पुढे महाबली वेताळ आणि अमर चित्र कथांमध्ये सुद्धा हा अँगल होताच. 

आणखी एक गोष्ट. 

जी. ए. कुलकर्णी: "...मी मॅट्रिकला असताना एकदा शिरसी नावाच्या गावी गेलो होतो. तेथे माझ्या दुपटीहून थोडी जास्त वयाची स्त्री दिसली होती. ती सुंदर होती असे म्हणणे understatement होईल. ती देदीप्यमान होती. तिने लग्न मात्र एका काळ्या सामान्य माणसाशी केले. तो अत्यंत बुद्धिमान होता व विशेष म्हणजे त्याला sense of humour फार आकर्षक होता. तो कुठेही गेला, तर 'मी रमाचा नवरा' अशी ओळख करून देत असे व मग मोठ्याने हसून ''असे सांगितल्याने ओळख पटते. रमालाच ओळखणारे लोक जास्त!" हा प्रेमविवाह होता आणि तो विवाह दोघांनाही अतिशय सुखाचा झाला याचे लोकांना आश्चर्य वाटे... रमा नवऱ्याआधी वारली. नंतर त्याचे जीवन हबकल्यासारखेच  झाले. त्याने नोकरी सोडली. थोडा पैसा होता  खरा, पण तोही त्याने वापरला नाही. बंगळूरला त्याच्या भावाचा कसला तरी छोटा कारखाना होता.  तेथे तो दिवसभर बसून असे म्हणे. आज रमा नाही, की विष्णुदास (हे त्याचे नाव) नाही. पण इतक्या वर्षानंतर ती आठवण झाली, की मोसमाबाहेर जाईची वेल उमलल्यासारखी वाटते. 'रमा' हे नाव आकर्षक नसावेच, पण त्याबद्दलची ही आठवण मात्र ओलसर सुगंधी आहे... "
(पृष्ठ १८९-१९०, 'जी एं. ची निवडक पत्रे', खंड १, १९९५)

मराठीतील दोन आघाडीचे आणि महत्वाचे लेखक (एक स्त्री आणि एक पुरुष) दोन  भिन्न कर्नाटकातील स्त्रियांचे कसे उत्कट पणे  वर्णन करतात हे पाहण्यासारखे आहे!