मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Showing posts with label दुर्गा भागवत. Show all posts
Showing posts with label दुर्गा भागवत. Show all posts

Thursday, June 26, 2025

शिवास्ते सन्तु पन्थानो मा च ते परिपन्थिनः...Karna, Kunti and Gaganendranath Tagore

 

"...महाभारतातले सर्वात सुंदर गाणे कुंती नवजात कर्णाला करंड्यात घालून अश्वनदीत सोडते त्या वेळच्या तिच्या उद्गारांचे आहे. 
 
शोक, कंप, कोमलता, ताटातूट सारे काही त्या गाण्यात नादमय शब्दांच्या आधारे व्यासाने साकारले आहे. 
 
त्यातल्या काही ओळी अशा:
 
"शिवास्ते सन्तु पन्थानो मा च ते परिपन्थिनः।
आगताश्च तथा पुत्र भवन्त्यद्रोहचेतसः ।।
पातु त्वां वरुणो राजा सलिले सलिलेश्वरः।
अन्तरिक्षेऽन्तरिक्षस्थः पवनः सर्वगस्तथा ।।
पिता त्वां पातु सर्वत्र तपनस्तपतांवरः।
येन दत्तोसि मे पुत्र दिव्येन विधिना किल ।।
आदित्या वसवो रुद्राः साध्या विश्वे च देवताः।
मरुतश्च सहेन्द्रेण दिशश्च सदिदीश्वराः ।।
रक्षन्तु त्वां सुराः सर्वे समेषु विषमेषु च।
वेत्स्यामि त्वांविदेशेपि कवचेनाभिसूचितम् ।।
धन्यस्ते पुत्र जनरको देवो भानुर्विभावसुः।
स्त्वां द्रक्ष्यति दिव्येन चक्षुषा वाहिनीगतम् ।।
धन्या सा प्रमदा या त्वां पुत्रत्वे कल्पयिष्यति।
यस्यास्त्वं तृषितः पुत्र स्तनं पास्यसि देवज ।।
कोनु स्वप्नस्तया दृष्टो या त्वामादित्यवर्चसम्।
दिव्यवर्मसमायुक्तं दिव्यकृण्डलभूषितम् ।।
पद्मायतविशालाक्षं पद्मताम्रदलोज्ज्वलम्।
सुललाटं सुकेशान्तं पुत्रत्वे कल्पयिष्यति ।।
धन्या द्रक्ष्यन्ति पुत्र त्वां भूमौ संसर्पमाणकम्।
अव्यक्तकलवाक्यानि वदन्तं रेणुगुण्ठितम् ।।..." 
 
 (पृष्ठ १८, प्रस्तावना, 'व्यासपर्व', दुर्गा भागवत, १९६२/ १९९२)
 
(महाभारतम्, तृतीयपर्व, आरण्यकपर्व-309)
 
मी गाणे Wikisource मधून घेतले आहे, पुस्तकातून नाही, त्यामुळे काही फरक आढळतील...
 
त्याचा इंग्लिश अनुवाद असा काहीसा :
 
"May all thy paths be auspicious! May no one obstruct thy way! And, O son, may all that come across thee have their hearts divested of hostility towards thee: And may that lord of waters, Varuna. protect thee in water! And may the deity that rangeth the skies completely protect thee in the sky. And may, O son, that best of those that impart heat, viz., Surya, thy father, and from whom I have obtained thee as ordained by Destiny, protect thee everywhere! And may the Adityas and the Vasus, the Rudras and the Sadhyas, the Viswadevas and the Maruts, and the cardinal points with the great Indra and the regents presiding over them, and, indeed, all the celestials, protect thee in every place! Even in foreign lands I shall be able to recognise thee by this mail of thine! Surely, thy sire, O son, the divine Surya possessed of the wealth of splendour, is blessed, for he will with his celestial sight behold thee going down the current! Blessed also is that lady who will, O thou that are begotten by a god, take thee for her son, and who will give thee suck when thou art thirsty! And what a lucky dream hath been dreamt by her that will adopt thee for her son, thee that is endued with solar splendour, and furnished with celestial mail, and adorned with celestial ear-rings, thee that hast expansive eyes resembling lotuses, a complexion bright as burnished copper or lotus leaves, a fair forehead, and hair ending in beautiful curls! O son, she that will behold thee crawl on the ground, begrimed with dust, and sweetly uttering inarticulate words, is surely blessed!"
 

 Karna-Kunti by Gaganendranath Tagore (1867-1938) (he was a painter and a cartoonist)
 
 

Saturday, October 15, 2022

...बगळे म्हणजे तृप्तीचे मूर्तिमंत प्रतीक...Durga Bhagwat and H. George Brandt


 दुर्गा भागवत, 'ऋतुचक्र' (१९५६- २००२), 'सोनेरी अश्विन', पृष्ठ ७३  

 


 House & Garden magazine cover illustrated by H. George Brandt. October 1917

Wednesday, September 28, 2022

इरावती कर्वे यांची दोन दर्शने : दुर्गाबाई आणि पुल....Irawati Karve - Two Perspectives by Durga Bhagwat, Pu La Deshpande

२०१८साली मला पुलंची खालील पुस्तके आवडतात: 
तुझे आहे तुजपाशी १९५७, नस्ती उठाठेव १९५२, रवींद्रनाथ : तीन व्याख्याने १९८० आणि गुण गाईन आवडी १९७५.

'गु. गा. आ.'  मधील काही लेख माझ्यासाठी मी कोणत्याही भाषेत वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी आहेत- उदा वसंत पवार, वसंतराव देशपांडें, कुमार गंधर्व यांच्या वरील लेख. वसंत पवारांना पुल काहीकाळासाठी अक्षरशः जिवंत करतात. महाराष्ट्राची संगीतातील श्रीमंती आपल्याला अशा लेखांतून जाणवते.

 पण मला त्यांचा इरावती कर्वेंवरचा लेख अजिबात आवडला नाही. अगदी उथळ वाटला.

आणि त्याच्या उलट इरावती कर्वेंवरचा दुर्गा भागवतांचा लेख. पुलंचा सामान्य लेख जिथे संपतो तिथे दुर्गाबाईंचा सुरु होतो. पुल जी उंची त्यांच्या वर उल्लेखिलेल्या चांगल्या लेखात गाठतात ती दुर्गाबाई ह्या लेखात गाठतात.

मला ह्या गोष्टीच वाईट वाटत आलय की गुणग्राहक पुलंनी दुर्गाबाईंच्या महानतेबद्दल विस्ताराने लिहल नाही. विलास सारंगांनी विस्ताराने केलेले दुर्गाबाईंचे कौतुक वाचल्यानंतर हे शल्य वाढलय.

 दुर्गाबाई ह्या माझ्यामते २०व्या शतकातील सर्वोत्तम मराठी लेखक (आणि जगातील सर्वोत्कृष्टांमध्ये एक) होत्या. त्यांचे गुणवर्णन करून आपण आपली उंची वाढवत असतो. 


डावीकडली पान : "आठवले तसे", १९९१ , कृतज्ञता : दुर्गाबाईंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स
उजवीकडील पान : गुण गाईन आवडी, कृतज्ञता: मौज प्रकाशन आणि पुलंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स

Saturday, June 26, 2021

बोंड कपाशीचे, साध्याभोळ्या लोकांचा प्रणय, गाथा सप्तशती, दुर्गा भागवत, स आ जोगळेकर...Love Poetry of the Commoners

""५५.

बोंड कपाशीचे फुटे,                                                  
उले वेचतांना ऊर;                                                     
आज होईल का गोड                                                 
माझ्या हाताची भाकर!                                          

भरे भुइमूग-दाणा,
उपटतां स्तन हाले;
 आज येतील का मोड
माझ्या वालांना चांगले!

वांगी झाली काळी-निळी,
काटा बोचे काढताना;
आज होतील का खुशी
माणसं गं जेवताना!"

(मर्ढेकरांची कविता, पृष्ठ  ६४, १९५९-१९७७)     

 गाथा सप्तशतीच्या उत्कृष्ट परिक्षणात दुर्गाबाई भागवत मे १९३७ मध्ये लिहतात: 

"... कपाशीची बोंडे तोडून शेतकरी त्यांचे ढीग करून ठेवीत होते. त्यापैकी स्वतःच्या पतीने गोळा केलेल्या बोंडावर वरचेवर हात फिरविताना एका मुलीच्या हातावर वारंवार रोमांच उभे राहत होते...." (पृष्ठ ९८, 'संस्कृतिसंचित', २०१५)

ही गाथा आहे ३५९ क्रमांकांची , 'बोण्ड ' नावाची, स आ जोगळेकर संपादित 'गाथा सप्तशती', १९५६ मध्ये. 

त्याचा अनुवाद जोगळेकर असा करतात : "घरधन्याच्या मुलांने कापसाचा पुंजका देंठावरून काढून घेतला होता. तरी वधू त्या देंठावरून उगाच हात  फिरवूं लागली. यामुळें  तिचा हात थरथरला आणि पुलकित व स्वेदयुक्त झाला.)  




'Village Bride' by Dijeshchander Dhar, Vishal Bharat Magazine 1940

Friday, May 28, 2021

शृंगारिक नागकेशर...Sensuous Cobra Saffron and Perhaps Clay of Karnataka

 दुर्गाबाई भागवतांचा 'फुलभेट' हा 'प्रासंगिका' १९७५-२००३ मधील लेख मला नुसता आवडतो नाही तर तो मला अतिशय शृंगारिक वाटतो. 

नागकेशराचे (Mesua ferrea) फुल मी काही फार वेळा पहिले नसेल. त्याचा वास सुद्धा मला आठवत नाहीये. त्या फुलावर हा लेख आहे. 

त्यात दुर्गाबाई  एका साठ  वर्षाहून जास्त वय असणाऱ्या बेळगावमधील सौ. तमण्णाचार्य, ज्यांच्या घरी त्यावेळी त्या गेल्या होत्या,  यांचे वर्णन थोडक्यात करतात :

"१९३६ चे वर्ष असावे ... तमण्णाचार्यांची पत्नी साठीपलीकडे पोचली असूनही अत्यंत सुंदर होती. केस फक्त पिकले होते. पण त्या रुपेरी केसांची शोभाही अपूर्व होती. रंग सतेज गुलाबी; चेहरा अतिशय रेखीव, बांधा सुडौल, बाई अत्यंत नीटनेटकी. लुगडे चापूनचोपून नेसलेली. दागिन्यांनी मढलेली. केसांत नेहमी गजरा. नाकात चमकी. आपल्या रूपाची जाणीव क्षणभरही न विसरणारी  व्यक्ती मला अजून दुसरी दिसलीच नाही..." (पृष्ठ ३३)

मला तर लहानपणचा 'चांदोबा' आणि त्यातील एकाहून एक सौष्ठवपूर्ण स्रीया आठवल्या. 


 लोक कबूल करोत अथवा नाही, चांदोबाच्या लोकप्रियतेचे ते एक महत्वाचे कारण होते. पुढे महाबली वेताळ आणि अमर चित्र कथांमध्ये सुद्धा हा अँगल होताच. 

आणखी एक गोष्ट. 

जी. ए. कुलकर्णी: "...मी मॅट्रिकला असताना एकदा शिरसी नावाच्या गावी गेलो होतो. तेथे माझ्या दुपटीहून थोडी जास्त वयाची स्त्री दिसली होती. ती सुंदर होती असे म्हणणे understatement होईल. ती देदीप्यमान होती. तिने लग्न मात्र एका काळ्या सामान्य माणसाशी केले. तो अत्यंत बुद्धिमान होता व विशेष म्हणजे त्याला sense of humour फार आकर्षक होता. तो कुठेही गेला, तर 'मी रमाचा नवरा' अशी ओळख करून देत असे व मग मोठ्याने हसून ''असे सांगितल्याने ओळख पटते. रमालाच ओळखणारे लोक जास्त!" हा प्रेमविवाह होता आणि तो विवाह दोघांनाही अतिशय सुखाचा झाला याचे लोकांना आश्चर्य वाटे... रमा नवऱ्याआधी वारली. नंतर त्याचे जीवन हबकल्यासारखेच  झाले. त्याने नोकरी सोडली. थोडा पैसा होता  खरा, पण तोही त्याने वापरला नाही. बंगळूरला त्याच्या भावाचा कसला तरी छोटा कारखाना होता.  तेथे तो दिवसभर बसून असे म्हणे. आज रमा नाही, की विष्णुदास (हे त्याचे नाव) नाही. पण इतक्या वर्षानंतर ती आठवण झाली, की मोसमाबाहेर जाईची वेल उमलल्यासारखी वाटते. 'रमा' हे नाव आकर्षक नसावेच, पण त्याबद्दलची ही आठवण मात्र ओलसर सुगंधी आहे... "
(पृष्ठ १८९-१९०, 'जी एं. ची निवडक पत्रे', खंड १, १९९५)

मराठीतील दोन आघाडीचे आणि महत्वाचे लेखक (एक स्त्री आणि एक पुरुष) दोन  भिन्न कर्नाटकातील स्त्रियांचे कसे उत्कट पणे  वर्णन करतात हे पाहण्यासारखे आहे!

 


 

Tuesday, May 04, 2021

वि स खांडेकर, ऑस्कर वाइल्ड , ला सालोमी आणि दुर्गा भागवत...Yayati of Khandekar Is Inspired By Oscar Wilde’s play Salome

SALOMÉ: “…All other men were hateful to me. But thou wert beautiful! Thy body was a column of ivory set upon feet of silver. It was a garden full of doves and lilies of silver. It was a tower of silver decked with shields of ivory. There was nothing in the world so white as thy body. There was nothing in the world so black as thy hair. In the whole world there was nothing so red as thy mouth. Thy voice was a censer that scattered strange perfumes, and when I looked on thee I heard a strange music. Ah! wherefore didst thou not look at me, Iokanaan? With the cloak of thine hands, and with the cloak of thy blasphemies thou didst hide thy face. Thou didst put upon thine eyes the covering of him who would see his God. Well, thou hast seen thy God, Iokanaan, but me, me, thou didst never see. If thou hadst seen me thou hadst loved me. I saw thee, and I loved thee. Oh, how I loved thee! I love thee yet, Iokanaan. I love only thee . . . . I am athirst for thy beauty; I am hungry for thy body; and neither wine nor apples can appease my desire. What shall I do now, Iokanaan? Neither the floods nor the great waters can quench my passion. I was a princess, and thou didst scorn me. I was a virgin, and thou didst take my virginity from me. I was chaste, and thou didst fill my veins with fire . . . . Ah! ah! wherefore didst thou not look at me? If thou hadst looked at me thou hadst loved me. Well I know that thou wouldst have loved me, and the mystery of Love is greater than the mystery of Death….”  (Oscar Wilde, 'Salome', 1891)


 कलाकार : कै दीनानाथ दलाल  (https://www.facebook.com/artistdinanathdalal)

वि स खांडेकर यांची  ज्ञानपीठ पुरस्कृत (१९७४) कादंबरी 'ययाति', १९५९ ही कादंबरी दुर्गाबाई भागवतांना आवडली नाही (मला सुद्धा ती कधीच जरासुद्धा १९७०-८० च्या दशकांत आवडली नाही.)... त्यांच्या परिक्षणाचा थोडा भाग सोबत पहा:


  ( पृष्ठ १७४, 'भावसंचित', २०१५, मूळ लेख 'अबकडइ', १९८४)

(अनेक गाजलेल्या मराठी कलाकृतींना पाश्चिमात्य देशांतील कलाकृतींमुळे प्रेरणा मिळाली आहे - उदा:राम गणेश गडकरी यांचे 'एकच प्याला' हे 'ऑथेल्लो' वरून सुचले असे प्रल्हाद केशव अत्रे त्यांच्या 'संपूर्ण गडकरी'च्या प्रदीर्घ प्रस्तावनेत पृष्ठ ४८ वर लिहतात, वि वा शिरवाडकरांचे 'नटसम्राट' 'किंग लिअर' च्या बळकट पायावर उभे आहे. वसंत कानेटकरांचे 'बेइमान' हे Jean Anouilh ह्यांच्या बेकेट, १९५९ वर आधारित आहे. 

दुर्गाबाई म्हणतात: "...व्हिक्टर ह्युगोचंच एक नाटक आहे 'लुई दि फोर्टिन्थ' म्हणून. या नाटकातील फ्रान्सचा हा राजा अत्यंत बदफ़ैली. तेव्हाच्या पद्धतीनुसार त्याच्या दरबारात एक विदुषक होता. त्याला एक मुलगी होती. अतिशय सुन्दऱ्र. ती लुई राजाच्या नजरेस पडू नये म्हणून तो सतत खबरदारी घ्यायचा. पण एकदा लुई तिला बघतो आणि तिच्यावर बलात्कार करतो. हे कथानक तेंडुलकरांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाच मूळ. १४ वा  लुई आणि त्याच्या विदुषकाऐवजी नाना फडणीस आणि घाशीराम वर त्यांनी नाटक रचलं...", पृष्ठ १३६, ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी, १९९८. अर्थात ह्युगो यांनी 'लुई दि फोर्टिन्थ' हे नाटक लिहले नसून Le roi s'amuse, १८३२ नावाचे नाटक लिहले आहे. दुर्गाबाईंना  ते नाटक म्हणायचे असणार. त्यात लुई  नसून फ्रान्सिस आहे...)

वाईल्डच्या 'ला सालोमी' साठी Aubrey Beardsley (August 21, 1872–March 16, 1898) यांनी अति  उत्कृष्ट चित्रे काढली आहेत. 

Maria Popova: “…And yet Beardsley’s images are very much a sacrificial offering to tension, to the contradictory forces by which the human heart is pulled asunder — loneliness and longing, dread and desire, sadness and sensual delight. His stark black-and-white aesthetic — like his life, like all life — is one of violent and vitalizing contrasts, nowhere more so than in his drawings for Oscar Wilde’s play Salome…”


 "... In February of 1893, a British magazine commissioned Beardsley to create a single drawing based on the original French publication of Salomé. But the gorgeously grotesque piece he submitted — Salomé reveling in the severed head of John the Baptist — was too daring and the magazine rejected it. In April, a new art publication included the drawing in its inaugural issue and it made its way to Wilde, who was so taken with it that he offered Beardsley a contract for ten full-page illustrations and a cover design for the English edition. Beardsley was twenty-one and Wilde, whom he had met three years earlier at an artist’s studio, thirty-eight.."