माझी ह्या ब्लॉग वरची ऑक्टोबर २२ २०१३ची पोस्ट पहा.
अशोक शहाणे त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकात लिहतात: "...टिळकांनी तुरुंगात 'गीतारहस्य' लिहल. अन नेहमी ठाम बोलणार्या आगरकरांनी मात्र 'हॅम्लेट'चं रुपांतर केल. 'विकारविलसिताबद्दल मात्र महाराष्ट्र आगरकरांच्या ऋणात राहील… ".
'विकारविलसित' अथवा शेक्सपीअरकृत हॉम्लेट नाटकाचे भाषांतर ' १८८३ साली प्रसिद्ध झाले.
ह ना आपटे आगरकरांनी तो अनुवाद का केला या बद्दल सांगतात : "...त्याची
(शेक्सपीअरची) नाटके म्हणजे,
विकारविलसितकारांच्या मताप्रमाणे केवळ मनोरंजनार्थ
नाहीत, तर ती त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाचून
त्यांचा अभ्यास केला
असता आपणास जीर्णारण्याप्रमाणे
भासणार्या जगात उपयोगी
पडणारी वर्तणूक शिकवणारी
आहेत.…" ('निवडक हरि नारायण
आपटे', संपादक - विद्याधर
पुंडलीक)
त्याचे एक महत्वाचे कारण काय असावे याचा थोडा अंदाज मला एप्रिल २०२१ मध्ये एमा स्मिथ यांचे 'This Is Shakespeare' हे पुस्तक पाहताना आला : "... For the nineteenth century, Hamlet was identified as Shakespeare’s greatest tragedy, as clever, modishly alienated men saw themselves reflected in its cerebral and isolated protagonist. But as the twentieth century unleashed its mad cruelties at Passchendaele, Auschwitz and Hiroshima, King Lear insinuated itself in the cultural imagination instead...."
clever, modishly alienated men गोपाळ गणेश आगरकर (१८५६- १८९५) स्वतःला नक्कीच saw themselves reflected in its cerebral and isolated protagonist...
हे कारण असू शकते! त्यांचे १८८२ चे 'डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस' पुस्तक पहा .. आगरकर रुपी हॅम्लेट दिसतो तेथे!
कलाकार : Milton Glaser
No comments:
Post a Comment