मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Thursday, December 03, 2020

गर्ट , श्री के क्षीरसागर आणि रस्त्यावर उघडणारी खिडकी....The Large Window of Our Miraj House

Sabine Rewald, curator of “Rooms with a View: The Open Window in the 19th Century”, 2011: 

“…Most artists painted so few open window scenes that I had to go all over to find the ones that existed….” 

The picture enclosed is : 'Goethe at the Window of His Roman Apartment'.... 

John Armstrong, city-journal, Autumn 2013:
"... Consider, for example, Tischbein’s Goethe at the Window of His Roman Apartment. We see the great man from behind: a slipper falls casually from his foot as he leans out, and the dim coolness of the room and the bright sunshine of the street make a powerful contrast. Some might see in this work an attempt to preserve the lessons learned on holiday. Away from home and work, in the warm South, Goethe became (like most travelers) a slightly different—and, in some ways, better—version of himself. The drawing attempts to memorialize the good version of the self and make that more prominent and more readily accessible when one has returned to familiar surroundings. The point is not so much to recall that Rome was interesting as to encapsulate who one became there. Goethe could hardly take the Italian weather back to Weimar; what he could do was hold on to the insight into his nature and needs that he gained while away. Hence it is a pity if one is more likely to encounter such images on the walls of a pensione in Trastevere than in a subway station in a metropolis, where its meditative qualities are more needed.. ."

माझे वडील त्यांच्या एस पी कॉलेज, पुणे तील कॉलेज जीवनामधील १९५० च्या दशकातील एखादी आठवण अधून मधून सांगायचे. त्यांचे एक प्राध्यापक होते मराठी साहित्यिक आणि टीकाकार श्री के क्षीरसागर. 
 
वडील म्हणत श्रीकेक्षींना मराठीतील 'खिडकी' हा शब्द अगदी गद्य आणि रोमँटिक गोष्टींसाठी अगदी अयोग्य वाटत असे. 

मला त्याचे कारण कधीच समजले नाही... श्रीकेक्षींनी 'पडोसन', १९६८ हा सिनेमा कधी बघितला का मला माहित नाही... कारण ज्याला त्यातील 'मेरे सामने वाली खिड़की में' ह्या सुमधुर गाण्यातील किंवा एकूणच त्या अप्रतिम सिनेमातील खिडकीचे महत्व समजले असेल तो खिडकी या शब्दाला  श्रीकेक्षीं सारखा दोष आयुष्यात देणार नाही. 
 
चित्र पाहताना, मला आमची मिरजेची, माडीवरची रस्त्याच्या लगतची- एका माणसाला सहज बसता येईल अशी- मोठी खिडकी आठवली... ती खिडकी म्हणजे आमची घरातील सर्वात जास्त exciting वाटणारी गोष्ट होती (१९६१- १९८४)... 
 
तिची तुलना हिचकॉक यांच्या Rear Window, 1954 शी करता येईल... लग्नाच्या वरातींपासून प्रेतयात्रे पर्यंत.... सुंदर मुली पहाणे, हवाहवासा पाऊस , शेजाऱ्यांच्या घरात डोकावणे, कुटुंबातील व्यक्तींची वाट पहाणे सगळे सगळे तिथे बसून झाले आहे ...


'Goethe am Fenster seiner römischen Wohnung', 1787
 
Artist : Johann Heinrich Wilhelm Tischbein

याच प्रकारचे आणखी एक चित्र बघायला मिळाले :

 The Attic Room,  1946  by Louis Icart 1880- 1950

 

Tuesday, December 01, 2020

जेंव्हा बा सी मर्ढेकरांनी काढले प्रोपागांडा पोस्टर.....Forging The Keys of Fortune

#बासीमर्ढेकर१११
 
"दण् कट दंडस्नायू जैसे 
लोखंडाचे वळले नाग;
कभिन्न काळ्या मांड्या जैसा
पोलादाचा चिरला साग,
...
यंत्रयुगांतिल नवनृत्याचा
स्थाणुभाव हा प्रगटे येथें

मनोज्ञ मुद्रा शिल्पित एक
संगमरवरी मांसामध्यें,
 

 -अहा, कोळसेवाला काळा !
नव्या मनूंतिल गिरिधर-पुतळा !!"


[कविता क्रमांक ४६, पृष्ठ  ५८,  "कांही कविता",  "मर्ढेकरांची कविता", १९५९- १९७७]

 
मला बा सी मर्ढेकरांची "दणूकट दंडस्नायू जैसे..." ही कविता (४६, पृष्ठ: ५८) ऐकायला छान वाटते, ह्या ब्लॉगवर ती पूर्वी आली सुद्धा आहे पण ह्या कवितेचा वास्तवाशी फारसा संबंध नाही हे फार वर्षांपासून जाणवायच कारण मी स्वतः लोहारकाम (ज्यात कोळसा झोकणे आले) कित्येक वर्षे मिरजेला जवळून पहिले आहे... ते काम करणारी लोक (त्यात एक तरी स्त्री नेहमी असे) मर्ढेकरांच्या गिरिधर-पुतळ्याच्या ग्रहावर पण रहायची नाही अस वाटाव इतकी ती कविता कृत्रिम (पण सुंदर) वाटते.... शिवाय आम्ही कित्येक वर्षे घरात कोळशाची शेगडी आणि चूल वापरत असू. घरी कोळशाचे पोत कायम असे आणि ते द्यायला "कोळसेवाला काळा" येत असे.

दुर्गाबाईंनी "प्रस्थापित व्यवस्थतेचा निषेध" (सत्यकथा होळी वगैरे) करणारी एक बैठक पुण्यात १९६९ साली अटेंड केली... त्यावर आधारित लेख त्यांनी "नवी क्षितिजे" मध्ये लिहला . तो आता "विचारसंचित", सं: मीना वैशंपायन, २०१५ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.. त्यातील छोटा परिच्छेद... 


 (वरील परिच्छेदा बद्दल दुर्गाबाईंच्या कार्याच्या कॉपीराईट होल्डर्स चे अनेक आभार)

मराठी साहित्यात उपयुक्ततावाद, समाजवाद, बांधिलकी-कंमिटमेन्ट वगैरे, १९३०-४०च्या नाही तर पार आगरकरांच्या (जे एस मिल यांचे अनुकरण करत) वेळेपासून घुसून, प्रतिष्ठित झाले, वाङ्मयीन मूल्यांना वरचढ ठरू लागले, त्याला मर्ढेकर एखादेवेळी बळी कसे पडले त्याचे हे उदाहरण.....

"दणूकट दंडस्नायू जैसे" हि मला चक्क स्टालिनच्या रशियातील party propaganda चे पोस्टर वाटते!

"We are forging the keys of fortune". 1965

Friday, November 27, 2020

मॅराडोना , माझा मित्र परम आणि मंतरतेले २३ जून १९८६...Maradona and the Ravishingly Beautiful Game

#Maradona

#June221986

नोव्हेंबर १९८४ मध्ये मी ठाणे - वाशी रस्त्यावरील नोसील कंपनीत नोकरी करू लागलो आणि १९८५ मध्ये, केंव्हातरी, कंपनीने लीज केलेल्या ,ठाणे- नौपाडा येथील दमाणी इस्टेट नावाच्या सोसायटीत माझ्या दोन कलिग्ज बरोबर, दोन लागून असलेल्या फ्लॅट्स मध्ये राहायला गेलो. 

त्यातील एक होता कलकत्याचा आणि आयआयटी खरगपूरमधून नुकताच केमिकल इंजिनियर झालेला व्ही परमेस्वरन, आमच्या साठी परम. 

परमची  आणि माझी अगदी दाट मैत्री पुढे होणार होती. त्याला अनेक कारणे असणार होती. पण त्यातील एक कारण आमच्या प्रथम भेटीतच समोर आले- आम्हा दोघांचे अनेक खेळांवर असलेले प्रेम. 

१९८६ चा फुटबॉल वर्ल्ड कप जसा जवळ यायला लागला तसा परम अस्वस्थ व्हायला लागला कारण आमच्या दोन्ही फ्लॅट मध्ये टीव्ही नव्हता आणि नारायण (दुसरा कलीग) आणि मी तो घ्यायला इतके उत्सुक पण नव्हतो. शेवटी वैतागून परम एकट्याने ब्लॅक आणि व्हाईट टीव्ही विकत घेऊन आला!

 तेंव्हा परमच्या मनाच्या मोठेपणामुळे मला १९८६ चा वर्ल्ड कप बघता आला. त्यातील सर्वात भारी मॅच बहुदा भारतात २३ जून १९८६च्या सकाळी बघितली. अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड

प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू गॅरी लिनेकर त्या मॅच बद्दल आणि  मॅराडोना यांच्या बद्दल एप्रिल २००४ मध्ये लिहतात:

"...In my mind, Maradona should be remembered more for that sublime second goal. What sticks in my mind about that match was the pitch being just big lumps of turf. It was all but unplayable and when you tried to turn, the whole pitch seemed to turn with you.

But for a genius nothing was impossible and as I again stood in my customary position, I had a perfect view as he received the ball, controlled it with one touch, turned perfectly and accelerated past the first English player. The rest, as they say, is history but whatever people think about his handled goal, they ought to give him credit for the second one that day.

 It was a magnificent run and a magnificent finish. Sometimes, no matter how disappointed you feel as a player, you have to accept that a goal is simply brilliant and unstoppable, and give credit to the opposition. It was so unbelievable that I actually felt like applauding, though naturally I didn't. Not with Terry Butcher on the pitch...."

हा गोल झालेला मला काही सेकंद समजलाच नाही कारण त्याआधी काही क्षण मॅराडोना पडतो की काय असे वाटले होते आणि माझे मन अजून तेथेच घुटमळत होते. पण तो गोल पाहिल्यानंतर मॅराडोनाची महानता तर लक्षात आलीच आणि फुटबॉलचे अतीव सौन्दर्य ध्यानात आले. 

लिनेकर मॅराडोना बद्दल आणखी लिहतात:

"... Between around 1984 and 1990 he was an incredible performer, the best in the world, and it is no exaggeration to say that he was carrying the whole Argentine nation on his back.

No wonder so many of his countrymen held a vigil outside the clinic where he was being treated.

 He was a footballing genius and the best player of my lifetime. I know everyone talks about Pele and George Best but they came a bit early for me and of the players I watched, Maradona was head and shoulders above anything else I saw. He was a short, dumpy player who didn't even look like an athlete but he was electrifying on the park, as slippery as an eel and with great vision. Simply a breathtaking footballer.

 Let me tell you just one little story to demonstrate his unique ability. During my days at Barcelona, I was picked to play alongside him for a Rest of the World X1 against an English League team and as we warmed up in the centre circle he hoofed the ball into the night sky as high as he could. When it came down, he trapped it perfectly on his left foot.

 An interesting little party piece, you might think. But he did it again and again and again, perhaps 13 times in all, each time kicking it as high as he could. Believe me, that is near-impossible but I stood there watching with Michel Platini, who was a pretty special player himself. Yet even he was open-mouthed, in awe of the magnificence of what he was seeing.

 Most players would have been proud to have managed that feat three times and, if they had done so, would have been sprinting to reach the ball by the third attempt. Yet Maradona could not have moved five yards throughout his exhibition, which demonstrated that he could do almost anything with that left foot..."

माझ्यासाठी मॅराडोना ने  नुसती सकाळच मंतरली नाही तर एक मानवी इतिहासातील मोठी गोष्ट... त्याच्या आठवणी बरोबर निघते माझ्या 'परम' मित्राची आठवण... 

आणखी एक लक्षात आले: सोशल मीडिया आणि मोबाईल (आणि बऱ्याच ठिकाणी लँडलाईन) नसलेला तो काळ होता आणि त्या थरारक खेळा बद्दल आज लिहताना ह्या  कशाचीही आठवण ही शेवटची ओळ लिहीपर्यंत झाली नाही....