२०व्या शतकातील तीन मोठे भारतीय कलावंत (कमी आयुष्य लाभलेले) ह्या पोस्ट मध्ये एकत्र...
जी. ए. कुलकर्णी १९२३-१९८७, २८-१०-१९७८:
"...
आम्हाला मॅट्रिकला असता गडकऱ्यांची (एक) 'चिमुकलीच कविता' अभ्यासाला होती.
एका छोट्या मुलीवर लिहलेली ही एक मोठी कविता . त्या मुलीच्या एका गालावर
तीळ आहे. तर गडकरी सांगतात , की ती तीळ म्हणजे त्या मुलीचे भाग्य लिहिताना
विधीने दिलेले दशांश चिन्ह आहे! ते वाचताच (मला आजही आठवते) तो तास कसा
कापराप्रमाणे भर्रकन जळून गेला..."
(पृष्ठ ६५, 'जी.एं. ची निवडक पत्रे: खंड १', १९९५)
(प्रत्यक्षात कवितेत तीळ नाही तर गोंदण आहे.)
"...
तिलक गोजिरे गोंदवणाचे हिरव्या रंगाचे,
शुभ्र मुखावर तुषार कुठल्या दिव्य तरंगाचे !
निळ्या नभीं वर शुभ्र तारका जमवितात मेळ,
शुभ्रमुखनभीं इथें निळ्याशा तारांचा खेळ !
(इचा) उद्याचा धनी कोण , हें ठरवावें म्हणुनी,
पुण्याईचें गणित करित विधि दशांशचिन्हांनीं ! ..."
राम गणेश गडकरी १८८५- १९१९, "वाग्वैजयंती"
दीनानाथ दलाल यांच्या अप्रतिम चित्रात १९१६-१९७१ तीळ आणि गोंदण दोन्ही नाही पण छोट्या मुली आहेत
No comments:
Post a Comment