लीला चिटणीस:
"... बाबूरावांचीख्याती त्या वेळी होती महाराष्ट्राचा कॅसानोवा म्हणून. खर होते ते... ते एक उच्च दर्जाचे कलावंत होते.... " (पृष्ठ १११, 'चंदेरी दुनियेत', १९८१-१९९०) (Casanova : Any man noted for his amorous adventures)
विश्राम बेडेकर:
" "एकदा याने एक इंग्रजी कविता म्हटली. त्यात प्रेयसीच्या मांड्या संगमर्मरी दिसतात असे वर्णन होते. बाबूराव लगेच उसळून म्हणाले, "हा तुमचा कवी बायकांच्या मांड्यांना केळीचे खांब म्हणणाऱ्या संस्कृत कवीसारखाच गाढव आहे. बायकांच्या मांड्या कशा दिसतात माहीत आहे? " एका स्नेह्याने उत्तर दिले , "छे बुवा! आमचा तेवढा अभ्यास नाही! " पण बाबूराव आपल्याच जोशात. "मी सांगतो. भिजवलेला बदाम सोलला म्हणजे दिसतो तशा !"..." (पृष्ठ २१७-२१८, 'एक झाड आणि दोन पक्षी.....', १९८४-१९९६)
माझे अतिशय आवडते अभिनेते बाबूराव पेंढारकर (१८९६- १९६७) आज १२५ वर्षांचे झाले असते.
त्यांचे फक्त एक गाणे पहा: धुंद मधुमती रात रे... (किचकवध , १९५९)...
सौजन्य: "साधा माणूस", भालजी पेंढारकर , १९९३-२००८
No comments:
Post a Comment