आज १४ जानेवारी २०१८, र धों कर्वेंची १३६वी जयंती
Joseph Lelyveld, 'Great Soul: Mahatma Gandhi and His Struggle With India', 2011:
र धों कर्वेंकडे (१८८२-१९५३) मी संतती नियमनाचे समाज सुधारक एवढ्या मर्यादित दृष्टीने पहात नाही. ह्या ब्लॉग वरील त्यांच्या वरच्या अनेक पोस्ट मंधून त्याचा उहापोह झालेला आहे.
पण ह्या पोस्ट मध्ये कर्वेंचे स्वतंत्र भारतात, १९४७पासून आजवर, काय चीज झाले ह्याबद्दल थोडेसे. माझी माहिती कोठून आली ते प्रत्येक ठिकाणी लिहिले आहे.
१> रामचंद्र गुहा हे महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांचे आवडते इतिहासकार. त्यांचे 'India After Gandhi: The History of the World's Largest Democracy', २००७ पुस्तक गाजलेले, मराठीत अनुवाद झालेले. त्यातील 'Autumn of the Matriarch' ह्या प्रकरणात खालील माहिती आहे:
"...The debates on India’s population size dated from the earliest days of Independence. Social workers had set up a Family Planning Association of India in 1949. The Planning Commission had spoken of the importance of family planning since its inception in 1950–1. However, culture and economics worked in favour of large families. The biases in educational development meant that girls were still valued more as child-bearers than as wage-earners. The continuing dependence on agriculture placed a premium on children. Indian Muslims and Catholics were enjoined by their clergy to abjure family planning...."
ज्या माणसाने आपले सर्वस्व त्याकारणी लावल होत त्या कर्वेंचा उल्लेख संपूर्ण पुस्तकात कोठेही नाही! (गुहांच्या 'Makers of Modern India', २०१० या पुस्तकात सुद्धा र. धों चा उल्लेख कोठेही नाही.)
भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री श्रीमती राजकुमारी अमृता कौर (Amrit Kaur) ह्या ख्रिस्ती होत्या, महात्मा गांधींच्या कट्टर अनुयायी होत्या - त्यांच्या आश्रमात राहिल्या होत्या आणि त्या संतती नियमनाची साधने वापरायच्या विरुद्ध होत्या. त्या गांधीजींप्रमाणेच आणि ख्रिस्ती धर्माच्या कलानुसार आत्मसंयमनाच्या (abstinence) पुरस्कर्त्या होत्या. (ख्रिश्चन धर्माच्या संतती नियमनाबद्दलच्या दृष्टिकोनांबद्दल हे वाचा.)
पंडित नेहरूंचा कुटुंबनियोजनाला किमान १९५२पर्यंत गुळमुळीत पाठिंबा होता. त्यांना ती गोष्ट १९५२पर्यंत महत्वाची वाटतच नव्हती. शिवाय, वर श्री. गुहा म्हणतात त्याप्रमाणे, बहुसंख्य मुसलमान आणि ख्रिस्ती लोक (केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसकट!) त्यांच्या धर्मामुळे कुटुंबनियोजन नाकारत होतेच.
१९५०साली भारत सरकारने कर्वेंना संततिनियमनासाठी लागणाऱ्या रबरी टोप्या आयात करू दिल्या नाहीत.
यदिंच्या पुस्तकातील या महत्वाच्या गोष्टींचे उल्लेख गुहांच्या पुस्तकात नाहीत.
थोडक्यात म्हणजे कर्वेंना आर्थिक किंवा नैतिक - कुठलाही पाठिंबा स्वतंत्र, निधर्मी भारताच्या पुरोगामी पंतप्रधानाच्या कॅबिनेटने जवळजवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत दिला नाही. १९५८साली त्यांच्या वडिलांना भारतरत्न देण्यात आले, रधोंना मात्र कुठलाही पुरस्कार मिळाला नाही.
No comments:
Post a Comment