मागे फेसबुक वर लिहल्याप्रमाणे, वासुदेवशास्त्री खरे (१८५८-१९२४) यांच्यावरचा चिंतामणराव कोल्हटकरांचा लेख ('बहुरूपी', १९५७) हा जगातील मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखातला एक आहे. (त्र्यंबक शंकर शेजवलकरांनी लिहलेला मृत्युलेख सुद्धा उत्कृष्ट आहे.)
प्रत्येकवेळी वाचताना हसू येत, त्यांच्या ज्ञानाचा हेवा वाटतो आणि शेवटी डोळे किंचित ओलावतात. एक थोर इतिहासकाराला जो skepticism (शंकेखोरपणा) लागतो तो त्यांच्यात होता. Self deprecating humor होता. डोळसपणा होता. कवीत्व होत. प्रचंड साधेपणा होता. संपत्ती आणि प्रसिद्धी यांची हाव नव्हती. धर्माच- पूजापाठाच अवडंबर नव्हत. दांभिकपणा नव्हता. संसारी होते. शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले होते. छान गायचे. काबाड कष्ट करायचे.
ज्या गावात मी लहानाचा मोठा झाला, त्या मिरजेत असा माणूस होऊन गेला याचा मला अभिमान वाटतो. माझ्या आज्जी आजोबांचे लग्न होण्यापूर्वीच शास्त्रीबुवा वारले होते तरी मी त्यांच्याशी गप्पा मारू शकलो नाही (ते गप्पा मारायला येणाऱ्याला विन्मुख पाठवत नसत म्हणे) याचा मला विषाद वाटतो!
खरेंचे शिवसंभव (१९१९) नाटक लोकप्रिय झाले पण त्यावर वाद झाला होता. चिंतामणरावांनी जेंव्हा खरेंकडे ऐतिहासिक नाटकाची मागणी केली त्यावेळी त्यांचा संवाद जो झाला तो वाचण्यासारखा आहे.
यामध्ये, योगायोगाने, शाहू महाराजांचे अतिशय हृद्य असे व्यक्तिचित्रण झाले आहे. केवढ्या मोठ्या मनाचा, विनोद बुद्धी असलेला , रसिक असा तो राजा होता हे मला पुन्हा एकदा समजले.
सौजन्य : चिंतामणराव कोल्हटकरांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स
आता वाचा शास्त्रीबुवांनी कोल्हटकरांना दिलेला सल्ला, जो भारतातील सर्व कलावंतांनी वाचण्यासारखा आहे: <"सर्व प्रसंग , ऐतिहासिक असतील . पण तो अमुकच ठिकाणचा इतिहास आहे, असे तुम्हांला म्हणता येणार नाही".>
(p. s. शेवटी न चि केळ्करांना ['तोतयाचे बंड नाटकाचे लेखक] मारलेला टोला पहा... सदाशिव भाऊंच्या तोतया चा उपयोग नाटककार निर्माण करायला तरी किमान झाला! )
त्या नंतर खरेंनी कोल्हटकरांच्या बलवंत संगीत मंडळी साठी उग्रमंगल नाटक (१९२२) लिहले.... त्यातील एक पात्र होते 'राणी पद्मावती', जी भूमिका दीनानाथ मंगेशकर करत असत!
No comments:
Post a Comment