मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Wednesday, October 19, 2016

मराठीत लिहलेल्या जागतिक इतिहासासाठी मानदंड कोणता? 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'...Books on Hitler


Richard J. Evans:
“...But the number of broad, general, large-scale histories of Nazi Germany that have been written for a general audience can be counted on the fingers of one hand. The first of these, and by far the most successful, was William L. Shirer’s The Rise and Fall of the Third Reich, published in 1960. Shirer’s book has probably sold millions of copies in the four decades or more since its appearance. It has never gone out of print and remains the first port of call for many people who want a readable general history of Nazi Germany. There are good reasons for the book’s success. Shirer was an American journalist who reported from Nazi Germany until the United States entered the war in December, 1941, and he had a journalist’s eye for the telling detail and the illuminating incident. His book is full of human interest, with many arresting quotations from the actors in the drama, and it is written with all the flair and style of a seasoned reporter’s despatches from the front. Yet it was universally panned by professional historians. The emigré German scholar Klaus Epstein spoke for many when he pointed out that Shirer’s book presented an ‘unbelievably crude’ account of German history, making it all seem to lead up inevitably to the Nazi seizure of power. It had ’glaring gaps’ in its coverage. It concentrated far too much on high politics, foreign policy and military events, and even in 1960 it was ‘in no way abreast of current scholarship dealing with the Nazi period’. Getting on for half a century later, this comment is even more justified than it was in Epstein’s day. For all its virtues, therefore, Shirer’s book cannot really deliver a history of Nazi Germany that meets the demands of the early twenty-first-century reader...”

(‘The Coming of the Third Reich’, 2003)

माधव रा. कंटक:
 "...' विश्वशांतीची समस्या', संजीवनी', 'कल्पांत' यांसारखे आधुनिक काळातील जागतिक समस्यांवरील लेख लिहले ते फक्त शेजवलकरांनीच... " ('पानिपत १९६१', ले: त्र्यं. शं. शेजवलकर, १९६१/१९९८)

मराठी लेखक वि ग कानिटकर ऑगस्ट २०१६ मध्ये वारले.

मी त्यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही आणि विकतही घेतलेले नाही (विकत घेतलेली नेहमी वाचतोच असे नाही!). पण लहानपणा पासून मी त्यांचे नाव वाचत आलो आहे - 'माणूस' मधून, त्यांच्या पुस्तकांच्या केलेल्या जाहिरातींमधून...

त्यांचे एकच पुस्तक,  ते गेले त्यादिवशी मला आठवले: "नाझी भस्मासुराचा उदयास्त", १९६६...हे पुस्तक (या पुढे 'नाभउ') अनुवादित नाही...'दी हिंदू'च्या मते  श्री. विल्यम शिरर (William L. Shirer) यांच्या 'दी राईज अँड फॉल दी थर्ड राई', १९६० ('The Rise and Fall of the Third Reich') वर ते 'मॉडेल' केल आहे. सध्या 'नाभउ'ची २६वी आवृत्ती बाजारात आहे. दी हिंदू च्या मते ते ४५वेळा पुनर्मुद्रित केल गेल आहे.

लोकसत्ताने त्यांच्यावर मृत्युलेख लिहला.

या संबंधी मनात आलेले काही विचार खाली व्यक्त करत आहे.

एडॉल्फ हिटलर ही मानवी इतिहासातील महत्वाची व्यक्ती होती/ आहे. जगातील सर्व लिखित भाषेत त्यांच्यावर लेखन झाले असेल. त्यांच्यावरील पुस्तकांची संख्या हजारो (लाखो?) आहे.

श्री. व्होल्कर उलरिश (Volker Ullrich) हे हिटलरचे चरित्र जर्मनमध्ये लिहीत आहेत. 'Hitler: Ascent, 1889-1939' या नावाने पहिला खंड २०१३ साली प्रसिद्ध झाला आणि खूप गाजला.

उलरिश आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत (जमल्यास ती संपूर्ण प्रस्तावना मुळातून वाचा) आतापर्यंत हिटलरवर लिहल्या गेलेल्या पुस्तकांबद्दल काय म्हणतात ते पहा:

"... Parallel to but largely independent of the entertainment market, academic historians around the world have pressed forward with investigations concerning nearly every aspect of Hitler and National Socialism. No historical topic has been more thoroughly researched in all its nooks and crannies—today the literature on the subject fills whole libraries. And yet academic interest in this “murky figure” never wanes. The riddles surrounding Hitler—the questions of how and why he could come to power and hang on to it for more than a decade—demand ever-new explanations. There has been no shortage of biographical approaches to these questions, but only four have stood the test of time: Konrad Heiden’s two-volume Hitler: A Biography, written in the mid-1930s from Swiss exile; Alan Bullock’s canonical Hitler: A Study in Tyranny from the early 1950s; Joachim Fest’s sweeping portrait Hitler: A Biography, first published in 1973; and Ian Kershaw’s standard-setting Hitler 1889–1936: Hubris and Hitler 1936–1945: Nemesis from 1998 and 2000..."


 सौजन्य: संबंधित लेखक, मुखपृष्ठ कलाकार, प्रकाशक 

उलरिश प्रस्तावनेत पुढे म्हणतात: "... Yet despite all these objections, Fest landed a real coup. In one review, historian Klaus Hildebrand predicted that Fest’s pioneering work would represent “the definitive book on Adolf Hitler for quite some time.” That held true for twenty-five years until another British historian, Ian Kershaw, took up the challenge of a major Hitler biography. Kershaw had access to sources not available to Fest, most significantly the diaries of Joseph Goebbels from his years as Gauleiter of Berlin and then propaganda minister...."

कै. कानिटकरांचे पुस्तक- 'नाभउ'- वर उद्धृत केलेल्या पहिल्या दोन पुस्तकांनंतर आले आणि श्री. फेस्ट व श्री. केरशॉ यांच्या पुस्तकांआधी.

 कानिटकर सकाळ ला २०१४ साली दिलेल्या मुलाखतीत सांगतात:
"...हे पुस्तक मी लिहिलं त्याला पन्नास वर्षे झाली. अनेक वाचकांची आजही पत्रं येतात. हिटलरवर मी जेव्हा लिहिलं तेव्हा त्याची ज्यूवरील अत्याचाराची बाजू समोर आलेली नव्हती. ज्यूंबद्दल केवळ हिटलरलाच द्वेष होता असं नाही, संपूर्ण युरोपातच ज्यूंबद्दल द्वेषाचं वातावरण होतं,..."
 
म्हणजे कानिटकरांनी त्यांचे पुस्तक मोठ्या प्रमाणात अद्यावत (update) केलेच नाही? आणि समजा त्यांनी ते केले असले तरी, त्यांच्या पुस्तकाने, उलरिश नी उद्धृत केलेल्या चार आणि स्वतः उलरिशांचे पुस्तक यांची उंची कधी गाठली का?

सरकारी नोकरी सांभाळत लेखन करणाऱ्या, कै. कानिटकरांकडे असे काय वेगळे कौशल्य होते, हिटलर किंवा तत्कालीन युरप संबंधातील अशी काय माहिती होती, असा  काय वेगळा दृष्टिकोन होता की, ज्याला इंग्लिश वाचता येते अशा मराठी वाचकाने, त्या पाच जगदविख्यात पुस्तकांव्यतिरिक्त त्यांचे पुस्तक वाचावे? ते केवळ मराठीत आहे म्हणून?

आणि जास्त महत्वाचा प्रश्न असा की: मराठीत ती वरील पाच पुस्तके- जशी आहेत तशी- का अनुवादित झाली नाहीत, होत नाहीत? मराठी वाचक अशा जागतिक दर्जाच्या ज्ञानापासून  किती वर्षे वंचित राहणार आणि मराठीतील चर्चा सुद्धा मराठीत छापल्या गेलेल्या ज्ञानापुरत्याच  मर्यादित राहणार का? ज्यावेळी लोकसत्ता म्हणते की 'सरळ सोप्या मराठीत, कंटाळवाणी प्राध्यापकी पंडिती शैली टाळून' म्हणजे 'मराठीत' एवढाच त्याचा अर्थ आहे का? का लोकसत्ताच्या मते त्या पाच पुस्तकांची शैली 'कंटाळवाणी प्राध्यापकी पंडिती' आहे? आणि 'कंटाळवाणी प्राध्यापकी पंडिती' शैली टाळून लिहलेला इतिहास खूप कमअस्सल असेल तर? एक इतिहास म्हणून 'नाभउ'च्या दर्जाबद्दल लिहले गेले आहे का? का 'लोकसत्ता', कै. श्री .ग. माजगावक आणि 'माणूस' यांच्या बद्दलचा आदर आणि 'नाभउ'ची लोकप्रियता यामुळे असे कोणतेही प्रश्न विचारायला इच्छुक नाही?


“It looks bad, but it’ll be all right in the end" 1941

Artists: Kukryniksy (M. W. Kupriyanov, P. N. Krylov and Nikolai A. Sokolov)
  
© Kukryniksy/akg-images
त्र्यंबक शंकर शेजवलकर (१८९५-१९६३) वारल्यानंतर जागतिक इतिहासावर दर्जेदार लेखन मराठीत किती झाले हा अभ्यासाचा विषय होईल.  भारतीय आणि महाराष्ट्रीय समाज केंद्रस्थानी ठेवत लिहलेले शेजवलकरांचे निबंध  तत्कालीन जागतिक, सामाजिक  स्थितीवर नेहमीच, कशाचीही तमा न बाळगता, कसलाही अजेन्डा न ठेवत, अभ्यासपूर्ण, कल्पक आणि प्रखर झोत टाकत असत.

'सकाळ'ला वर दिलेल्या कानिटकरांच्या मुलाखतीत मला खालील भाग जास्त रोचक वाटला:

"...1870 ते 1920 या पन्नास वर्षांच्या कालखंडात अनेक कर्तबगार मंडळी होऊन गेली. साहित्यिक हरिभाऊ आपटे, रावसाहेब कानिटकर, सर्कसवाले छत्रे, भास्करबुवा बखले या नामवंत मंडळींच्या आयुष्यातील काही प्रसंगावरून मी या कथा लिहिल्या. उदाहरणच द्यायचं झालं तर हरिभाऊ आपटे आणि रावसाहेब कानिटकर यांच्यात "गीतांजली'च्या अनुवादावरून जे मतभेद झाले व त्यांचे संबंध दुरावले, त्याबद्दल मी माझ्या कल्पनाशक्‍तीने लिहिले; मात्र सत्याचा अपलाप न करता लिहिले. मराठी साहित्यात हा वेगळा प्रकार होता. त्याची जेवढी दखल घेतली जायला हवी होती, तेवढी घेतली गेली नाही...."

हे कानिटकर मला वाचावेसे वाटतात. आपल्या जवळच्या इतिहासाकडे कल्पकतेने पाहणारे. दुर्बीण नाही तर भिंग घेऊन बसलेले!

5 comments:

marathimusalman said...

"नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त" आपल्या मिरजेच्या बायसिंगर लायब्ररीत बारावी सायन्सला असताना वाचले होते. माझ्या वाचनात आलेले ते दुसऱ्या महायुद्धावरचे हे पहिले पुस्तक. त्यानंतर चर्चिलचे 'दुसरे महायुद्ध'(मराठी अनुवाद) वाचायला घेतले पण आवाका आणि तपशीलाच्या डोंगरामुळे 'दुसऱ्या महायुद्धा'तून माघार घेतली. पण ही माघार 'डंकर्कच्या यशस्वी माघार' प्रमाणे यशस्वी ठरली नाही. मराठीमध्ये लिहिलेल्या युद्धकथा आणि हेरकथा यांच्या 'ब्लीटस क्रीग'ने माझा पाडाव केला आणि बारावी सायन्सचे महायुद्ध हरलो. एकुणात काय तर मराठी वाचकाला जास्त तपशील आणि सामरिक विवेचन असलेल्या लिखाणापेक्षा सुरस, रंजक युद्धकथाच जास्त भुरळ पडतात.

Aniruddha G. Kulkarni said...

Thanks......I agree....Thanks for mentioning Bysinger...I learned so much and could spend so many hours only because of 'her'...I remain grateful to the donors who created it...

marathimusalman said...

खरंय... सेम टू सेम पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीत माझ्या बाबतीत घडले... :)

mannab said...

आपण क्वचितच मराठीतून या अनुदिनीमध्ये लिहिता, तसे आज लिहिले आहे आणि तेसुद्धा वि ग यांच्या शैलीवर अत्यंत परिणामकारकपणे लिहिले आहे. त्यांचे आत्मचरित्र "स्वाक्षरी" मी नुकतीच वाचले होते जेव्हा वि ग हयात होते. आपण हे वाचले नसेल तर अजून मिळवून ते वाचावे.
मंगेश नाबर

Aniruddha G. Kulkarni said...

Thanks Mangesh...I will try to acquire it, along with his book on Apte/Kanitkar...best