मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Monday, June 23, 2025

पिपात मेला एकच (पण सुंदर) उंदीर...But where, oh where is the compassion?

 Two books on rats were published and reviewed in 2024. I read only reviews and found them very intriguing.

Elizabeth Kolbert, The New Yorker:

"...Two new books take up the subject of Calhoun and his rats. The authors of the first, “Rat City: Overcrowding and Urban Derangement in the Rodent Universes of John B. Calhoun” (Melville House), are a pair of British researchers, Edmund Ramsden and Jon Adams, who for a time both taught at the London School of Economics. The second, “Dr. Calhoun’s Mousery: The Strange Tale of a Celebrated Scientist, a Rodent Dystopia, and the Future of Humanity” (University of Chicago), is by Lee Alan Dugatkin, a historian of science at the University of Louisville. Both books cast Calhoun as a visionary. Both also portray him as eccentric to the point of crankdom...."

Simon Ings write in The Spectator, UK: 

"...Among rodents, a rising population induces stress, and stress reduces the birth rate. But push the overcrowding too far (further than would be likely to happen in nature) and stress starts to trigger all manner of weird and frightening effects. The rodents start to pack together, abandoning all sense of personal space. Violence and homosexuality skyrocket; females cease to nurture and suckle their young; abandoned, these offspring become food for any passing male. The only way out of this hell is complete voluntary isolation. A generation of ‘beautiful ones’ arises, that knows only to groom itself and avoid social contact. Without sex, the population collapses. The few Methuselahs who remain have no social skills to speak of. They’re not aggressive. They’re not anything. They barely exist...

...But whether we behave exactly like rats in conditions of overcrowding and/or social isolation is not the point. The point is that, given the sheer commonality between mammal species, something might happen to humans in like conditions; and it behoves us to find out what that something might be before we foist any more hopeful urban planning on the proletariat. Calhoun, who got us to think seriously about how we design our cities, is Rat City’s visionary hero, to the point where I started to hear him. Observing some gormless waifs staring into their smartphones at the bottom of the escalator, I recalled his prediction that ‘we might one day see the human equivalent’ of his mice, pathologically crammed together in ‘a sort of withdrawal – in which they would behave as if they were not aware of each other’..."

 

Artist: Tomi Um, The New Yorker

Saturday, June 21, 2025

When Tree Applauds Your Vrkshasana (Tree Pose, वृक्षासन)

 Tree pose is a classic standing yoga pose that helps improve your strength, balance and focus. It replicates the graceful, steady stance of a tree and helps you feel grounded and centered. In Sanskrit, the ancient language of yoga it is known as Vrksasana (Vrak-sa-sana) or Vrkshasana (VRik-shah-SUN-aa).

Artist; Harry Bliss
 

Tuesday, June 17, 2025

ती भयाण रात्र !...माझें हृदय आणि शरीर आतां चालूं शकत नाहींत ...75th Death Anniversary of Sane Guruji

 साने गुरुजींना जाऊन जून ११ २०२५ रोजी ७५ वर्षे झाली ... 

त्यांनी लिहलेली शेवटची चिंतानिका दीपावली अंकाच्या १९५० च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती... ती माझ्या पाहण्यात आली ... ती मोठी हृदयद्रावक आहे ... 


 

 

कलाकार : दीनानाथ दलाल, दलाल आर्ट स्टुडिओ
 
सौजन्य आणि आभार :
महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, चित्रकार दीनानाथ दलाल मेमोरियल समिती, दलाल परिवार
 
त्यातील दोन परिच्छेद वानगी दाखल देत आहे ... 
 

 

 


Saturday, June 14, 2025

सगळीच मांजरे अंधारात काळीच असतात...Black Cat by Hishida Shunso

 जी. ए. कुलकर्णी, 'यात्रिक', सत्यकथा, ऑगस्ट १९७५, सध्या पृष्ठ २४२, "पिंगळावेळ", १९७७:

 "... सगळीच मांजरे अंधारात काळीच असतात. कसे म्हणतोस, सॅन्को ?... "


 "Black cat", 1910 by Hishida Shunso

 

Wednesday, June 11, 2025

Terrible 1970s

 

१९७१ वर्षी भारताने क्रिकेटमध्ये दोन ऐतिहासिक विजय मिळवले ... त्या नंतर त्या दशकात फारसे काही चांगले झाले नाही ... 
 
दशकाच्या सुरवातीलाच पाकिस्तान बरोबर युद्ध झाले , पूर्व बंगालातून आधी आणि नंतर लोंढेच्या लोंढे भारतात आले, त्यासाठी टपाल दराची वाढ करण्यात आली , शरणार्थी कर...
 
बांगलादेश स्वतंत्र झाला, त्याचे २०२४ साली काय झाले पाहतोच आहोत... माझे पक्के काँग्रेसी वडील म्हणाले होते - हा नवीन देश एक दिवस भारताला पाकिस्तान पेक्षा जास्त त्रासदायक होईल ... थोडक्यात १९७१ चा माझा आनंद आता विरला आहे ....
 
भारतीय शहरातील महागाई , बजबजपुरी प्रचंड वाढली होती ... किती बांगलादेशी त्या आधीच्या वर्षांत आणि नंतर भारतात आले कुणास ठाऊक?
 
आमच्या कडे स्वैपाकाचा गॅस नव्हता: एक चूल , एक शेगडी, एक वातीचा स्टोव्ह, एक आवाजाचा स्टोव्ह होता, बंब नव्हता ... आईची खूप तारांबळ होत असे ... आणि त्यात एक दिवशी सरकारने सांगितले कोळसा घरच्या वापरासाठी मिळणार नाही...केरोसीन चे प्रचंड शॉर्टेज असे, ते जवळ जवळ मिळेनासे झाले ... आम्ही त्याच्या शोधात वणवण फिरत असू ...
 
सगळे लोक रेशन वर अवलंबून होते कारण खुल्या बाजारातील किमती प्रचंड होत्या...कपडे सुद्धा प्रचंड महाग होते, अनेक लोक तोच ड्रेस कित्येक दिवस घालत असत...आजूबाजूला गरिबी इतकी होती की ती मुले दिवाळीच्या पणतीचे गोडेतेल स्वैपाकासाठी पळवून घेऊन जात असत , दिवसातून दोन वेळा जेवण तरी मिळत होते का हा प्रश्न आहे...
 
१९७२ साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला , जवळच्या गावातले काही लहान शेतकरी, त्यांच्या स्त्रिया भीक मागत आमच्या दारावर येत ... चोऱ्यामाऱ्या प्रचंड वाढल्या ... रात्री लोक झोपली असताना घरात घुसून चोरी होत असे ... एकदा चोराचे जखमेतून गळणारे रक्त झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर आढळले... '
मिरजेत ह्या दशकातील पहिल्या काही वर्षांत सगळीकडे हागीनदारी असे, आमच्या शाळेच्या ग्राऊंडचा वापर सुद्धा त्यासाठी होऊ लागला होता, आमच्या जवळपासच्या बहुतेक लोकांना शौचालयासाठी साधारण अर्धा किलोमीटर हातात तपेली घेऊन जायला लागत असे...
 
मला सुद्धा प्राथमिक शाळेत जाताना पावसाळ्यात काही ठिकाणी पाय जपून ठेवावा लागत असे ...आमचे संडास त्या दशकातील काही वर्षे टोपलीचे होते...
 
१९७४ साली रेल्वे चा मोठा देशव्यापी संप झाला, त्या वर्षी कर्नाटकातून महाराष्ट्रात सामान्य माणसाला एक किलो सुद्धा तांदूळ उघडपणे आणता येत नसे, आम्ही तो लपवून आणला होता म्हणून हे मला माहित आहे, १९७५ साली आणीबाणी आली ...
 
माझी शाळा १९७१ पर्यंत एक उत्कृष्ट शाळा होती, ती संस्थेकडून काढून घेऊन नगरपालिकेला देण्यात आली, एक-दोन वर्षांत तिची संपूर्ण वाट लागली, माझ्या दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम सुद्धा १९७४-७५ साली शिकवण्यात आला नाही, हुषार मुलांचा सुद्धा तेजोभंग झाला, त्यांचे पुढचे आयुष्य त्याने झाकोळून गेले...
 
बेकारी, प्रचंड महागाई, भ्रष्टाचार, जातीयता, आणीबाणी ह्या सगळ्यामुळे समाजाचे कंबरडे मोडले गेले ..
बँकेतील क्लार्क चा जॉब हा भारतात सगळ्यात चांगला जॉब, असे त्या दशकात समजण्यात येई, माझ्या बरोबरीच्या अनेक मुलींनी कारकूनांशी लग्ने मोठया आनंदाने केली....
 
मेरे अपने , १९७१ हा सिनेमा त्या दशकातील भारत बऱ्यापैकी प्रामाणिक पणे दाखवतो...
रोटी , कपडा और मकान हा १९७४ सालचा सिनेमा गाणी सोडता भिकार आहे पण त्यातील झीनत चे पात्र मला आवडते, ते (साधारण) म्हणते: मी कंटाळली आहे, ती जणू माझेच शब्द बोलत होती ...
 

 

Sunday, June 08, 2025

Awful Sixties in India...समाजवाद शिगेला पोचला होता

 
... मिरजेच्या भारत भूषण शाळेत तिसरी मध्ये (१९६७-६८) फाऊंटन पेन (त्यावेळी बॉलपेन म्हणजे काय आम्हाला माहीतच नव्हते) वापरायला आम्हाला सांगण्यात आले. बोरू अभ्यासक्रमातून काढूनच टाकला गेला (तरी तिसरी, चौथीत आम्हाला बोरूलेखनासाठी पुस्तक घ्यायला लागले, ते वाया गेले)... 
 
शाई भरणे हा मोठा कार्यक्रम असे, आई भरून द्यायची पण कधी दुकानातून सुद्धा भरून घ्यायचो, ते महाग पडत असे, unbranded शाया काही दुकानात असत , फाऊंटनची निबे सारखी मोडत असत, ती बदलून पहिल्यांदा दुकानातूनच घ्यायचो, निबे कधी चांगली असत, कधी अगदी वाईट.... 
 
फाऊंटन पेने इतकी वाईट असत की त्याच्या मानेतून थोडी शाई सारखी बाहेत येत राही त्यामुळे अंगठा आणि त्याच्या जवळचे बोट कायम निळे-ओले असे , ज्याला ती बोटे लागत तिकडे शाई लागत असे ... मला त्या ओलीची जाणीव आजही आहे ... ते मला अजिबात आवडत नसे... शिसपेन्सिली सुद्धा वाईट असत ... 
 
ही भारताची अवस्था १९६०च्या दशकात होती ... समाजवाद शिगेला पोचला होता... 
 
पुढे केंव्हातरी कॅम्लिन ची शाई , कंपास , पेन सगळे आले , नटराज च्या शिसपेन्सिली आल्या, गोष्टी खूप सुधारल्या... आजच्या मुलांना मी काय म्हणतो आहे हे शिवकालीन वाटेल, ते अवघ्या पन्नास-साठ वर्षांपूर्वी घडत होते...