#SirWalterScott250
१९व्या आणि २०व्या मराठी कथा/ कादंबरी साहित्याला , प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, प्रेरणास्थान ठरलेले, सर वॉल्टर स्कॉट यांची आज १५ ऑगस्ट रोजी २५०वी जयंती आहे.
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे:
"... या हप्त्यांनीं येणाऱ्या कादंबर्यांत स्कॉट, डिकन्स, थॅकरे, बाल्झाक, ह्यूगो, डूमास , झोला, टाल्स्टॉय या वस्तादांच्या हातून उतरलेल्या कादंबऱ्यांच्या तोडीच्या कादंबऱ्या क्वचितच असतात..."
(पृष्ठ २९१, 'कादंबरी', 'राजवाडे लेखसंग्रह', संपादक : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, १९५८-१९९२)
ना. सी. फडके:
"... स्कॉटच्या कादंबऱ्या वाचूनच ऐतिहासिक कादंबरी लिहण्याची स्फूर्ति हरिभाऊंना (हरि नारायण आपटे) झाली..."
(पृष्ठ: १५७, 'परकीयांचा मराठी कादंबरीवर परिणाम !', 'ऐसीं अक्षरें रसिकें!: साहित्य -चर्चात्मक आणि रसग्रहणात्मक लेखांचा संग्रह', १९६७)
त्र्यंबक शंकर शेजवलकर:
"... सर वॉल्टर स्कॉटच्या स्वराष्ट्राच्या उत्कट, रोमरोमांत भिनलेल्या अभिमानानें ज्या कादंबऱ्या निर्माण झाल्या, त्यांचें अनुकरण बंगाल्यांत बंकिमचंद्र प्रभृतींनी व महाराष्ट्रांत हरिभाऊ आपटे सारख्यांनी केले..."
(पृष्ठ: ४२५, 'विभावरी-वाङ्मयाच्या निमित्ताने', मकरसंक्रांत १९४९, ' निवडक लेखसंग्रह', संग्राहक: हा. वि. मोटे , परिचय: गं. दे खानोलकर, १९७७)
Sarah Watling, Literary Review, June 2021:
"In August 1815, only weeks after the French defeat at Waterloo, the novelist Walter Scott set out to visit the battlefield. Standing on the spot from where Napoleon had supposedly watched the battle, Scott experienced ‘a deep and inexpressible feeling of awe’, before being besieged by hawkers. He came away with a number of mementos, including the skull of a Life Guardsman. Then he went home and wrote The Antiquary, a novel in which, Rosemary Hill observes, ‘the idea of a lived relationship between past and present, enacted through artefacts, emerges for the first time as a theme in literature’. It was also the ‘first self-portrait’ of an antiquary in British literature..."
No comments:
Post a Comment