मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Friday, September 08, 2017

मराठीने बव्हंशी दुर्लक्षिलेल्या तीन महान इंग्लिश स्त्री लेखिका...Austen, Eliot, Brontë


W. H. Auden, 'Letter to Lord Byron', 1936: "...
You could not shock her more than she shocks me;
Beside her Joyce seems innocent as grass.
It makes me most uncomfortable to see
An English spinster of the middle-class
Describe the amorous effects of ‘brass’,
Reveal so frankly and with such sobriety
The economic basis of society

…"
Howard Jacobson: “Jane Austen's vision is a fraction from being a despairing one, her final chapters are dispensations of kindness, like the fifth acts of Shakespeare's comedies, in which we are spared bleakness by a hair's breadth, though we feel its presence all around. George Eliot's best novels simmer with a sometimes murderous frustration, no matter that her thwarted heroines can finally be said to make things a little less "ill for you and me than they might have been". If such dying falls allow us to sink for a while into a contemplative wistfulness, our nerves go on feeling frayed long after. No good writer ever merely cheered us up. But there's an unblinking stare into the darkness of things we have to go elsewhere to find. Jane Austen was made of strong stuff.”

Brooke Allen: “For no filmed version of an Austen novel is really satisfactory: Of all 19th-century novelists, she dwells the least on the physical surfaces that are the essence of the cinematic art.” 

[ही पोस्ट ह्या विषयाची सुरवात समजावी. ह्यात जेन ऑस्टेन यांच्यावर focus आहे.

Disclaimer: माझे या  लेखकांविषयीच ज्ञान हे इंग्लिश सिनेमा, टीव्ही सिरियल्स आणि डॉक्युमेंटरी तसेच त्यांच्या वर लिहलेली पुस्तके आणि लेख यांवर जास्त आधारित आहे. त्यांच्या पुस्तकांचे  वाचन मी चाळत केल आहे.]

सध्या १९व्या शतकातील तीन इंग्लिश स्त्रीलेखिका प्रचंड लोकप्रिय आणि टीकाकार-प्रिय झालेल्या आहेत. 
जेन ऑस्टेन Jane Austen (१७७५-१८१७) , जॉर्ज इलियट George Eliot (१८१९-१८८०), शार्लट ब्रॉन्टी  Charlotte Brontë (१८१६-१८५५).  त्या तिघींचे एकही पुस्तक  पहिल्यांदा छापल्या नंतर अजून आऊट ऑफ प्रिंट झाल नाहीय. (दुर्गा भागवतांची अनेक पुस्तके कित्येक वर्षे आऊट-ऑफ-प्रिंट होऊन परत आलीयत.  मी स्वतः पॉप्युलर प्रकाशनाशी 'ऋतुचक्र', १९५६ पुन्हा छापण्याबद्दल पत्र/ई-मेल व्यवहार केला होता. माझी याविषयावरची पूर्वीची पोस्ट इथे वाचा.)

जेन ऑस्टेन तर १०पौंडाच्या नोटेवर पण विराजमान झाल्यात. इलियट यांची 'मिडलमार्च' नेहमी जगातील सर्वोत्तम कादंबऱ्यात समाविष्ट केली जाती. ब्रॉन्टी यांच्या कादंबऱ्या classics मानल्या जातात. ऑरवेल म्हणतात त्याप्रमाणे शेकडो वर्षे टिकून राहिलेली लोकप्रियता हा शेवटी महानतेचा सर्वात महत्वाचा निकष असतो.  त्यांच्या मृत्यनंतर आज शेकडो वर्षे मराठी संतकवी लोकप्रिय आहेत आणि हे त्यांच्या महानतेचे प्रमुख लक्षण आहे. 

ऑस्टेन यांची २००वी पुण्यतिथी नुकतीच पार पडली, ब्रॉन्टी यांची व्दिजन्मशताब्दी मागच्या वर्षी झाली आणि  इलियट यांची व्दिजन्मशताब्दी अजून दोन वर्षानंतर आहे.

त्या तिघींच्या कोणत्या पुस्तकांचे अनुवाद मराठीत झाले आहेत याची, ऑस्टेन सोडल तर, मला कल्पना नाही. 

ऑस्टेन यांच्या 'Pride and Prejudice', १८१३ च्या मराठीत १९१३मध्ये झालेल्या अनुवादाबद्दल -  'Aajpasoon Pannas Varshannee !' ("आजपासून पन्नास वर्षांनी !") by Krushnaji Keshav Gokhale (कृष्णाजी केशव गोखले)- मी इथे ऑक्टोबर २०१३ ला लिहले होते.  

प्रो. वामनराव जोशी म्हणाले होते:  "ज्याने समाजाचे कल्याण होत नाही, जे नीतीला पोषक नाही असे सत्यच आम्हाला नको." साधारणपणे गोपाळ गणेश आगरकरांच्या नंतर महाराष्ट्रात बोकाळलेल्या उपयुक्ततावादानुसार  (utilitarianism) श्री. गोखले सुद्धा त्या कादंबरीची उपयुक्तता शोधतात आणि त्यानुसार  तिचे नाव सुद्धा बदलतात! नाहीतर काय संबंध आहे 'Pride and  Prejudice' चा 'Fifty Years From Now!' शी?  

हे सगळ समजल्यावर  ऑस्टेन यांनी हसून कपाळावर हात मारला असता. ऑस्टेन यांनी पुस्तके लोकांच्या मनोरंजनासाठी लिहली. आणि सभोवताली जे दिसल त्याबद्दल अत्यंत प्रामाणिकपणे, sincerely आणि विनोदी अंगाने आयुष्याकडे पहात लिहल. 


  श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्यांच्या ह ना आपटे यांच्या 'पण लक्षात कोण घेतो?", १८९० कादंबरीच्या परीक्षणात अस लिहल होत:  "रा. आपट्यांनी स्त्रियांच्या दुःखाची कहाणी सांगितली आहे तशी मागासलेल्या जातीच्या दुःखाची सांगितल्यास ती मिसेस स्टौच्या 'टॉम काकाची कोठडी' या कादंबरीच्या खालोखाल क्रांतिकारक होईल अशी खात्री वाटते. "

मला हा सल्ला एकेकाळी खूप 'स्मार्ट' वाटला होता पण तो मला आता तसा वाटत नाही कारण कोल्हटकरांनी हा सल्ला कदाचित ऑस्टेन यांना पण दिला असता कारण ऑस्टेन इंग्लंड मधील 'working class' बद्दल त्यांच्या लेखनात लिहीत नव्हत्या. माझ्या मते कादंबरी कोणाबद्दल लिहली आहे हे कमी महत्वाचे असून ती कोणत्या दर्जाची आहे हे महत्वाचे आहे. सुख, दुःख कोणाचीही असोत ती किती प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोचतात त्यावर लेखनाचा दर्जा ठरतो. (मराठी भाषेत मात्र गेली कित्येक दशके कथा-कादंबरी-कविता-सिनेस्क्रीप्ट कोणाबद्दल लिहली आहे आणि लिहणाऱ्याची विचारधारा काय हे जास्त महत्वाचे मानले जाते. )  

वि का राजवाडे यांच्या मते महान कादंबरी : "लहान मुलांना पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात युक्ति व साहस ह्यांचे बीजारोपण करील ;स्त्रीजनांना संसारसुखाची गुरुकिल्ली पटवील; तरुणांना राष्ट्रीय महत्वाकांक्षेचे रहस्य कळवील; आणि वृद्धांना आयुष्याच्या इतिकर्तव्यतेचे दिग्दर्शन करील; आणि इतकेहि करून ते कसे व केंव्हां केले हें कोणाला समजून देणार नाही. अशी ह्या मयासुराची करणी आहे. युधिष्ठिराप्रमाणे ती ज्या लोकांना लाभली ते लोक धन्य होत!"

(left)  'Mansfield Park',  Artist: Not known to me
'Pride and Prejudice' (right)
Artist: Not known to me



































जे दिलीप पुरुषोत्तम चित्रे २०व्या शतकातील कुठल्याच मराठी ललित लेखकाला महान म्हणत नाहीत, ते ऑस्टेन यांच्याबद्दल म्हणतात: "...मराठ्यांचा पाडाव होऊन ईस्ट इंडिया कंपनीचा प्रभाव भारतभर पसरण्यापूर्वीच जेन ऑस्टेनसारखी महान स्त्री कादंबरीकार इंग्लंडमध्ये होऊन गेली होती..."
('पुन्हा  तुकाराम ', पॉप्युलर प्रकाशन, १९९०/१९९५)

वि का राजवाडे त्यांच्या 'कादंबरी' या  लेखात ऑस्टेन आणि इलियट यांचा उल्लेख गौरवाने करतात पण त्यांच्यामते कोणीच इंग्लिश कादंबरीकार झोला, ह्यूगो आणि टॉल्स्टॉय यांच्या जवळपास सुद्धा येत नाही. मी ज्यांना बारकाईने वाचतो त्या जी ए कुलकर्णी, विलास सारंग, दुर्गा भागवत, म वा धोंड, सदानंद रेगे, भालचंद्र नेमाडे, द ग गोडसे या कोणाच्याच लेखनात या तीन स्त्री लेखकांची स्तुती मी तरी वाचली नाहीये, कदाचित उल्लेख सुद्धा नाही. पण वरती ऑडेन बघा ऑस्टेन यांच्या बद्दल काय म्हणतायत : Beside her Joyce seems innocent as grass... 

मी वाचत असलेल्या या मराठी समीक्षकांनी ऑस्टेन यांना दुर्लक्षिले याबद्दल जास्त आश्चर्य वाटते हे खालील वाचून:
"...It is the subcontinent, however, that has embraced her books most enthusiastically, with Austen societies established in both India and Pakistan. The Pakistani group hosts inventively named sessions for “Jovial Janeites” such as “Austentatious tea parties” and “chai and chatter”. Big-screen adaptations have fused Regency drama with Bollywood verve. “Bride and Prejudice” (2004), set in Amritsar, substituted Lalita Bakshi for Elizabeth Bennet and Indian weddings for country dances. “Kandukondain Kandukondain” (2000), a Tamil romance film, and “Kumkum Bhagya” (2014), an Indian soap opera, are both based on “Sense and Sensibility”; “Aisha” (2010) is an adaptation of “Emma” set amid Delhi’s upper class.

The economic and social position of women, their reputation and eligibility are all themes that are easy to adapt to different cultural contexts, but there are specifics that resonate in Indian and Pakistani society, too, such as the importance of familial bonds, the preference given to male inheritance, the dowry system and the “marrying off” of young women by overzealous mothers and aunts..."
(The Economist, July 13 2017)

मी अलीकडेच 'Pride and Prejudice', २००५ पहिला आणि तो पहात असताना मी माझ्या  बालपणी (१९६०-१९८१) मिरजेत पाहिलेल्या, स्त्रियांना मिळत असलेल्या वागणूकीची, भले 'Ball (dance)' होत नसतील, आठवण होत राहिली.





                                                                  
                                                             कलावंत : वसंत सरवटे
 

मुलीचे लग्न जुळवण्याची धडपड तर सतत पहायचो पण अगदी P&P मधल्या dialogue सारखे अनेक 'spinster in the making' सुद्धा मी पहिल्या आहेत. माझ्या बरोबरच्या 'बऱ्या' दिसणाऱ्या जवळजवळ सर्व  मुलींची लग्ने त्या २०-२१वर्षाच्या असताना  किंवा त्याच्या आतच जुळवली गेली.  १०वी झाल्यानंतर त्यांचे लग्न केंव्हाही ठरू शके. मी ग्रॅजुएट होईपर्यंत त्यातला  अनेक जणी आई झाल्या होत्या किंवा होणार होत्या. ही सगळी धांदल बघून मला त्याही काळात आश्चर्य वाटल्याच आठवतय: काय घाई होती मुलींची लग्न इतक्या लवकर लावून द्यायची?

 आज बऱ्याच गोष्टी बदलल्या सारख्या वाटतात पण खरच किती बदलल्यात हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्राच स्त्री / पुरुष प्रमाण, जे सध्या ९२५ आहे, भारताच्या प्रमाणापेक्षा, ९४०, ते खाली गेलेय. हे कदाचित माझ्या जन्मानंतर पहिल्यांदा झालय. आंतरजातीय विवाहाचे प्रमाण नगण्य आहे. हुंडापद्धत कमी झाली असेल पण विवाह बऱ्याच वेळा वधूपिता 'थाटामाटात' लावून देतात. 

स्त्रियांचे आर्थिक पारतंत्र्य , जे शतकानुशतके चालू आहे, अजून कायम आहे. माझ्यामते जो पर्यंत स्त्रीया पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत, त्यांच्या नावावर ५०% financial  assets होत नाहीत, तो पर्यंत त्या sub-optimal असेच निर्णय स्वतःच्या सुखाबाबत घेत राहणार, त्यांची प्रतिभा पूर्णपणे फुलणार नाही. 

हे सगळ कमी जास्त प्रमाणात ऑस्टेन-बाईंच्या लेखनात येत मग माझ्या लहानपणच्या समाजात त्या (किंवा त्यांची रुपांतरे) माझ्या सारख्या वाचकाच्या, श्रोत्याच्या पुढ  सारख्या का यायच्या नाहीत? त्यांना वाचून, रंगमंचावर-सिनेमात पाहून मराठी स्त्रीयांना  कदाचित थोड बर वाटल असत. किमान पुरुषांना पोटभर हसल्यातरी असत्या त्या... लिझी बेनेट सारख्या.

Keira Knightley as Elizabeth Benett in 'Pride and Prejudice',2005

सौजन्य : HBO

Tuesday, September 05, 2017

निळा रंग कधीच निघून जात नाही...मुंबईचे चंडरव ....The Blue Jackals and The Blue Dogs

 #चंडरवकुत्रा #TheBlueDogsofMumbai #Panchtantra


"निळा रंग कधीच निघून जात नाही. म्हणतातच की, वज्रलेप, मूर्ख लोक, स्त्रिया, खेकडा, मासा, निळा रंग आणि दारुड्या यांनी एकदा पकडलेले की , किंवा त्यांचा ग्रह झाला म्हणजे तो धक्काच ! त्यात बदल होत  नाही."


\                                                  Artist: Mehlli Gobhai

पंचतंत्रात निळ्या कोल्ह्याची गोष्ट 'चंडरव कोल्हा' या नावाने येते. संदर्भ : पृष्ठ ७०-७५, 'संपूर्ण पंचतंत्र : प्रामाणिक मराठी भाषांतर' अ:  ह. अ. भावे, प्रस्तावना : रा चिं  ढेरे १९७७/२००३

"One evening when it was dark, a hungry jackal went in search of food in a large village close to his home in the jungle. The local dogs didn't like Jackals and chased him away so that they could make their owners proud by killing a beastly jackal. The jackal ran as fast as he could, and not looking where he was going fell into a bucket of indigo dye outside the home of the cloth dyer. The dogs ran further and the jackal climbed out of the bucket, wet but unharmed.
The jackal continued into the jungle and saw the lion, King of the Jungle. The Lion asked him who he was and the jackal seeing that he had now turned blue declared himself as Chandru - protector of all the animals in the jungle. Chandru told the lion that he would only continue to protect the jungle if all the animals would give him food and shelter.
Soon Chandru was sought for advice from animals from other jungles and animals sat at his feet and brought him the best of food. But as happens every year in India, the Monsoon came, and slowly but surely, the blue dye had run off Chandru's coat and he was just a mangy jackal again. The animals realised this and chased the jackal far into the jungle, where he was never seen again."

FT reported on August 29 2017 in a story called 'Blue dogs of Mumbai expose poor pollution controls':
"Roaming packs of stray dogs are an established part of the landscape of Taloja, an industrial district to the north-east of Mumbai. But when a group of them turned blue this month, environmental activists sounded the alarm at this vivid evidence of industrial failure to adhere to proper standards of pollution control.

“There is pollution in every industrial zone, and the government keeps neglecting it,” said Arati Chauhan, an activist who posted photographs of the blue dogs that went viral on social media. “God has used the blue dogs to draw our attention to the problem.”..."

courtesy: Deepak Gharat and FT


Monday, September 04, 2017

If We Double The Minimum Wage....

#LaborDayUS 

Today September 4 2017 is Labor Day in the United States



Yuval Noah Harari, from his books:
"Egyptians built Lake Fayum and the pyramids not thanks to extraterrestrial help, but thanks to superb organisational skills. Relying on thousands of literate bureaucrats, pharaoh recruited tens of thousands of labourers and enough food to maintain them for years on end. When tens of thousands of labourers cooperate for several decades, they can build an artificial lake or a pyramid even with stone tools.

Like the elite of ancient Egypt, most people in most cultures dedicate their lives to building pyramids. Only the names, shapes and sizes of these pyramids change from one culture to the other. They may take the form, for example, of a suburban cottage with a swimming pool and an evergreen lawn, or a gleaming penthouse with an enviable view. Few question the myths that cause us to desire the pyramid in the first place."
 


Artist: David Sipress, The New Yorker, October 2013

Friday, September 01, 2017

युद्धकाळात आम्ही कसे जगलो?...कॅप्टन लक्ष्मी सहगल लग्न कोणाशी करणार..Who Will Captain Lakshmi Sahgal Marry?

७८ वर्षांपूर्वी १ सप्टेंबर १९३९ रोजी दुसरे महायुद्ध सुरु झाले

गोविंदराव टेंबे (१८८१-१९५५)... महायुध्दांचा  जीवनावर झालेल्या परिणामाबाबत लिहतात:

"…पण  तसे पाहिले असता, गेल्या पाच  सहा वर्षापूर्वीचे सर्वच जीवन पुसून गेलेले आहे; मग हस्तलिखित पुसून गेल्याचा विषाद कशाला वाटायचा? भावना, श्रद्धा, संस्कृती, भीती, कला, धर्म इत्यादी, समाजाला स्थिरता मधुरता देणारी तत्वे नामशेष झाली आहेत..."
 ('माझा जीवनविहार', १९४८)

John Gray, New Statesman, July 1 2017:

“...The Second World War was not just another event – it changed everything.” Even more than the Great War of 1914-18, Keith Lowe argues, the Second World War altered human experience fundamentally. In one way or another it affected more human beings than any other violent conflict in history. Over a hundred million men and women were mobilised, and yet the number of civilians killed was greater than the number of soldiers by tens of millions. Four times as many people were killed as during the First World War. But the effects ranged far beyond the numbers of dead. For everyone who died, dozens of others found their lives changed irrevocably. Whether as refugees and exiles in the great displacement of people that followed the war, or else as factory workers, slave labourers or targets for the protagonists in the conflict, uncountable human beings were caught up in the devastation wreaked by this unprecedented upheaval...” 

वरील दोन अवतरणांची मला जाणीव करून देणार, दुसऱ्या महायुद्धाचा (१९३९-१९४५) महाराष्ट्रातील सामान्य जीवनावर नेमका काय आणि कसा परिणाम झाला सांगणार, मराठी किंवा इंग्लिश पुस्तक मला अजून मिळालेले नाही.
तुम्हाला कोणते पुस्तक माहित असेल तर जरूर सांगा.

पण वाङ्मय शोभेचे पूर्वीचे अंक चाळताना, हे वाचायला मिळाले.

मासिकाचे तत्कालीन संपादक कै मनोहर महादेव केळकर यांचा तीन पानी लेख 'युद्धकाळात आम्ही कसे जगलो !!' मे १९४६च्या अंकात पाहायला मिळतो.

त्याचे शेवटचे पान खाली पहा:



त्यातले हे वाक्य वाचून तर फार मजा वाटली:

 "... कॅप्टन लक्ष्मी हिंदी स्त्रियांना यापुढे कोणत्या तऱ्हेचे मार्गदर्शन करणार आहे या कुतुहलांपेक्षा ती लग्न कोणाशी करणार आहे याच्या चांभारचौकशा करण्याचीच प्रवृत्ति जास्त प्रमाणांत दिसून येते..."

या लेखाकडे काही दिवसांनी मी पुन्हा कदाचित वळणार आहे, इतका तो मला महत्वाचा वाटतो.

सध्या वर लिहलेले आणि या वाक्याच्या खाली लिहलेले यातील विरोध  पहा!

courtesy: History TV channel and its FB page

"Lakshmi Sahgal was a revolutionary of the Indian independence movement, an officer of the Indian National Army, and the Minister of Women's Affairs in the Azad Hind government. In 1940, she left for Singapore. During her stay at Singapore, she met some members of Subhas Chandra Bose's Indian National Army. She established a clinic for the poor, most of whom were migrant labourers from India. It was at this time that she began to play an active role in the India Independence League. In 1942, during the surrender of Singapore by the British to the Japanese, Sahgal aided wounded prisoners of war. She was one of the founding members of All India Democratic Women's Association in 1981 and led many of its activities and campaigns. She led a medical team to Bhopal after the gas tragedy in December 1984, worked towards restoring peace in Kanpur following the anti-Sikh riots of 1984 and was arrested for her participation in a campaign against the Miss World competition in Bangalore in 1996. She was still seeing patients regularly at her clinic in Kanpur in 2006, at the age of 92.On 19 July 2012, Sehgal suffered a cardiac arrest and died on 23 July 2012 at the age of 97 at Kanpur. Captain Lakshmi Sehgal International Airport is proposed at Kanpur Dehat district."