मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Sunday, May 28, 2017

जॉन केनेडींचा फोटो मिरजेला भारतभुवन मध्ये अजून लटकतोय का?...JFK@100

Tomorrow May 29 2017 is  birth centenary of John F. Kennedy

Gore Vidal: “The Kennedys were an eighteenth-century amoral couple, together for convenience…..Even now the photogenic charm of the couple at the center of so much corruption and incompetence still casts its spell."


Ramachandra Guha , ‘India After Gandhi: The History of the World's Largest Democracy‘, 2007:

“...In response to the Indian request, President Kennedy sanctioned the supply of a million rounds for machine guns, 40,000 land mines and 100,000 mortar rounds. This fell far short of the Grand Alliance that his ambassador was recommending; yet it was far in excess of what other Americans thought New Delhi deserved. A bitter opponent of arms supply to India was Senator Richard B. Russell of Georgia, the long-serving chairman of the Senate Armed Forces Committee. A crusty old reactionary – doughtily opposed to desegregation and the like – Russell had previously termed India an ‘unreliable friend’ and called Nehru a ‘demagogue and a hypocrite’. Now he told the Associated Press that he was ‘against giving India any of our modern weapons for the principal reason that we would be just giving them to the Chinese Communists’. The Indians, said the senator, had ‘put on a disgraceful exhibition in permitting themselves to be driven out of what should have been impregnable strongholds in the border mountains. They seem incapable of fighting and if we supply them with weapons they will just fall into the hands of the Communists’. While he was at present opposed to giving ‘one dime of weapons to India’, Russell said he might have a rethink if India’s old rulers, the British, were prepared to ‘take over the matter of re-organizing and re-training their militaryforces’...”
 

जॉन केनेडी आणि पंडित नेहरूंचा खालील  फोटो मिरजेला आमच्या घराजवळच्या 'हंसप्रभा' (नंतर 'बालगंधर्व') टॉकीजच्या समोर, लेखिका कै कमल देसाईंच्या घराच्या तळमजल्यावर, जगताप बंधूंच्या मालकीच्या  'भारतभुवन' नामक  छोट्या रेस्टॉरंटमध्ये टांगलेला होता.

लहानपणी (c१९६५- c१९७८) हा आणि केनडींचे आणखी काही फोटो इतक्या ठिकाणी (केशकर्तनालय, रसाची गुऱ्हाळ, दवाखाने, दुकान इ.), हिंदी-मराठी सिनेमात दाखवलेल्या भिंतींवरसुद्धा, पाहायला मिळायचे की असे वाटायचे केनेडी आपल्या खूप जवळचे आहेत.


 वॉशिंग्टन, नोव्हेंबर १९६१

अलीकडच्या काळात मला नेहमी वाटत आलय की "काँटों से खींच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधे पायल..." हे 'गाईड', १९६५ मधील हीट गाणे श्रीमती जॅकी केनेडी यांच्या १९६२च्या भारत भेटीने प्रभावित आहे. 

आनंद बंधू  (विजय आणि देव) एक देखणी स्त्री असलेला, राजस्थान मध्ये बऱ्याच प्रमाणात घडलेला इतका मोठा PR इव्हेंट विसरूच शकले नसतील. तसेच 'गाईड'चे एक व्हर्शन,  अमेरिकेत रिलीज साठी इंग्लिश मध्ये तयार होत होत. ('गाईड' आणि केनेडी कुटुंबावरची विवाहबाह्य संबंधांची गडद छाया हा एक १९६५ साली तरी फक्त योगायोग.)

'आज फिर जीने की तमन्ना है आज फिर मरने का इरादा है'
मार्च १९६२

प्रे. केनेडींच्या मृत्यूनंतर (१९१७- नोव्हेंबर १९६३) त्यांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलीन झाली आहे. आता त्यांचा उल्लेख, किमान अमेरिकन सिनेमा आणि टीव्ही सीरिअल्स मधून तरी,  त्यांच्या विवाहबाह्य संबंध आणि क्युबन मिसाईल क्रायसिस यासाठी जास्त होतो. त्यांची गणना अमेरिकेच्या 'थोर' प्रेसिडेंट्स मध्ये सहसा केली जात नाही.

का एवढा भाव केनेडीं दाम्पत्याला भारतात मिळाला असावा?

प्रमुख उत्तर: भारत चीन युद्ध (२०/१०/१९६२- २१/११/१९६२). त्या युद्धात भारताचा मानहानीकारक, अजून खोलवर सलणारा मोठा पराभव झाला. अमेरिकेने अपुरी मदत केली. तरीसुद्धा भारताने अमेरिकेच्या मदतीबद्दलची कृतज्ञता केनेडींच्या भारतभर पसरलेल्या लाखो फोटोतून पुढे कित्येक वर्षे जतन केली.

मी मिरजेला १९८५ नंतर गेलो नाहीये.  यापुढे कधी गेलो आणि, भारतभुवन अजून तिथ असेल, तर जावून पाहणार आहे की केनेडींचा फोटो अजुन तिथे लटकतोय का!

No comments: