"...
घेउं दे आघात तीतें
इंद्रिय-द्वारां जगाचे;
पोळुं दे आंतून तीतें
गा अतींद्रियार्थं आंचें.
..."
(#१, 'आणखी कांही कविता', १९५९/१९७७)
कै. जी ए कुलकर्णींचा पत्र व्यवहार वाचल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात रहाते ती म्हणजे त्यांनी अनुभवलेले अतिशय जवळच्या लोकांचे अनेक अकाली मृत्यू. जी एंच 'भाग्य' म्हणजे त्यांना त्यांच्या पत्नी वा मुलांचा मृत्यू पाहावा लागला नाही कारण ते जन्मभर अविवाहित राहिले. पण ज्या साहित्यिकांनी संसार केले त्यांचे काय? खालील पोस्ट मध्ये तीन उदाहरण आहेत: दोन देशी, एक विदेशी.
२०१७साली 'चिं.वि.: साहित्यातले अन् आठवणीतले' हे २०१३ साली प्रकाशित झालेले पुस्तक वाचायला सुरवात केली.
चिं.विंचे (C V Joshi) स्वतःचे लेख सोडून इतर बरेच लेख ('चिं.वि.: साहित्यातले') सामान्य दर्जाचे आहेत, जयंत नारळीकरांची (Jayant Narlikar) प्रस्तावना बरी आहे पण चिं.विंच्या नातेवाईकांनी लिहलेले लेख ('चिं.वि.: आठवणीतले') आयुष्याबद्दल खूप काही सांगून जातात आणि म्हणून ते लेख व दोन कृष्णधवल फोटो मला आवडले.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे - चिं. विं (१८९२-१९६३) आणि त्यांच्या पत्नींच्या (सरस्वती) (१९००- १९६६) जीवनावर पडलेली अपत्य मृत्यूंची गडद छाया. पुस्तक वाचून असे कळते कि त्यांना (बहुदा) एकूण तीन मुली आणि चार मुलगे झाले. त्यातील एक मुलगी आणि चारी मुलगे वारले. ही सगळी मुलं जन्मताच मृत्यू न पडता थोडी थोडी मोठी होऊन गेली. एक मुलगा- परशुराम- तर मॅट्रिक होऊन वयाच्या (बहुदा) पंधराव्या वर्षी, मे ४ १९४० रोजी, टायफॉइडने वारला. सगळ्यांनी आठवणींचे मोठे संचीत आईवडिलांसाठी तयार केले.
त्याकाळी मध्यमवर्गीय घरांतून मृत्यूचे थैमान होते हे खरे पण त्यांचे आर्थिंक आणि सामाजिक स्थान पाहता चिं विंचे कुटुंब खूप यात इतरांपेक्षा कितीतरी जास्त होरपळून निघाले.
पण विशेष म्हणजे या दोन्ही महान लेखकांची प्रतिभा वा बहुप्रसवता या टायफॉइडच्या उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या धक्क्याने आटल्याचे दिसत नाही. नारायण यांची सर्वोत्तम पुस्तके त्यानंतर आली. चिं. विंच्या लेखनाचा दर्जा सुद्धा किंचितही कमी झाल्याच जाणवत नाही. दोघांच्या लेखनावर आधारित लोकप्रिय चित्रपट निघाले, लोकप्रिय टीव्ही सीरिअल निघाल्या, दोघांची जवळ जवळ सर्व पुस्तके आज २०१७साली बाजारात मिळतात.
परशुराम चिं जोशीने वडिलांना शय्येवरून दोनदा सांगितले होते की त्याने गोविंद आपटेकडून (मित्र?) हॉकी स्टिक विकत घेण्यासाठी सहा आणे उधार घेतले आहेत आणि त्याचे ते पैसे परत द्यावेत. नोव्हेंबर २४ १९५८ रोजी चिं.विंनी ते पैसे परत केले. त्यासाठी त्यांनी जे (उत्कृष्ट हस्ताक्षरात) पत्र लिहले ते हे :
चिं.विंना त्या विषयाला पूर्णविराम द्यायचाय. परशुरामला दिलेला शब्द ठेवायचाय. परशुराम तर आयुष्यातून जाणारच नाहीये पण गोविंद आपटेंनी पैसे घेऊन टाकले तर किमान परशुरामची ती 'मेंदू बदडणारी' हॉकी स्टीक तरी जायची आशा आहे.
त्यांच्या पत्नी अपत्य शोकाबद्दल काय म्हणायच्या ते पहा: "... अग, दिवस इतरांचा असतो त्यांच्या समोर काय आपण आपले दुःख सांगत बसायचे, रात्र तर माझी असते, तेव्हा रोज रात्री मी माझ्या मुलांची आठवण काढते..."
डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार चिं.विंवर झाले. त्यात सर्वात महत्वाचे नाव म्हणजे : मार्क ट्वेन (१८३५-१९१०) कारण ट्वेनयांचा प्रभाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांवरांकडून सुद्धा चिं.विं पर्यंत पोचला असणार.
ट्वेनयांच्या जीवनातील शोक पहा... ते लिहतात:
Susy, Clara, Jean- ट्वेनयांच्या मुली.
सुझी (१८७२-१८९६)- स्पायनल मेनन्जायटिसने वारल्या - चिं. विंच्या सगळ्यात धाकट्या मुलीला - विद्युल्लता - हाच रोग झाला होता. ती वाचली पण मेंदूवर आयुष्यभर परिणाम झाला.
जीन (१८८०-१९०९)- फेफरे (seizure) येऊन घरातील बाथटब मध्ये बुडून वारल्या.
No comments:
Post a Comment