मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Wednesday, February 05, 2025

नानासाहेब परुळेकर, मार्क झुकरबर्ग ...A Squirrel Dying in Front of Your House: Superbloom

माझे वडील आम्हाला 'सकाळ' वर्तमानपत्राच्या संस्थापक-संपादक नानासाहेब परुळेकर (१८९७-१९७३) यांच्या बाबत एक  गोष्ट संगत असत , ती कदाचित खरी नसेल सुद्धा , पण मला आवडली. 

परुळेकर म्हणत : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर मरून पडलेला बैल आपल्या वाचकांसाठी जगातील अनेक घटनांपेक्षा जास्त महत्वाचा असू शकतो... 

आम्ही सकाळ क्वचितच विकात  घेत असू  , पण किमान विसाव्या शतकात तरी पुण्यातील लहान सहान बातम्या सकाळ उत्तम कव्हर करत असे ह्यात वाद नाही ...

हे का आठवले ?

Philip Ball has reviewed Nicholas Carr's latest book “Superbloom: How Technologies of Connection Tear Us Apart” on Jan 28 2025. 

Ball says: "...The central problem, however, is that an onslaught of information—of everything, all at once—flattens all sense of proportion. When Zuckerberg said to his staff that “a squirrel dying in front of your house may be more relevant to your interests right now than people dying in Africa,” it’s not that his tone-deaf observation was untrue but that, as Carr says, he was making a category error, equating two things that cannot be compared. Yet “social media renders category errors obsolete because it renders categories obsolete. All information belongs to a single category—it’s all ‘content.’” And very often, the content that matters is decided in the currency of commerce: content is “bad” when it harms profits...."


 

Tuesday, February 04, 2025

Thursday, January 30, 2025

अन् इसवी सन कवायतीचा कदम उचलुनी पुढें सरकला...Everything Went Well, Just As it had the Previous Year

जानेवारी ३० १९४८ ला पौष महिना सुरु होता...

पण त्यानंतर नेहमीप्रमाणे माघ सुरु होणार...त्यावर मर्ढेकर पौष-मघाची हितगुज, इंग्रजांचा इसवी सन-आणि आपल्या कॅलेंडर सारखा किंचित सुद्धा नागमोडी नाही म्हणून- कवायतीचा ... असे किती सुंदर असे भाष्य करतात ...

बा सी मर्ढेकर:
"
___वदला पौष
जातां जातां या माघाला;
अन् इसवी सन कवायतीचा
कदम उचलुनी पुढें सरकला.

__अशीचं जावीं कांही वर्षें,
आणि महात्मा यावा पुढचा;
अम्हांस आम्ही पुन्हा पहावें
काढुनि चष्मा डोळ्यांवरचा !"

(पृष्ठ ७९, ७, ''"फुटेल (होती वेढी आशा)', मर्ढेकरांची कविता, १९५९-१९७७)

माझी आई सुद्धा २००६ साली पौषात गेली... त्यादिवशी मला एका क्षणी चेकॉव्ह यांचे खालील लेखन आठवले ..

"It was noisy in the main marketplace; there were swings going up and down, barred organs playing, an accordion wheezing away, and drunken voices calling out. And then pony-rides began on the main street in the afternoon- it was all great fun, in a word; everything went well, just as it had the previous year, and as it probably would the following one." ('The Bishop', 1902 )..
.
थोडक्यात, अन् इसवी सन कवायतीचा कदम उचलुनी पुढें सरकला...

दुर्गाबाईंनी गांधींवर आयुष्यभर खूप प्रेम केले... म्हणून त्यांच्या पेजवर पौषाची आणखी एक पोस्ट

सोबतचे चित्र महान चित्रकार नंदलाल बोस यांनी आपल्या घटनेच्या पुस्तकरूपासाठी काढलेले


 

Monday, January 27, 2025

चांदोबातील गोष्ट? ...Why Hasn't Sangit Manapman Been Captured On Screen As It Is?

माझी संगीत मानापमान या विषयावरची जानेवारी २०११ मधली पहिली पोस्ट इथे पहा ... 

अलीकडच्या मानापमान सिनेमाबद्दल भावे साहेब एका मुलाखतीत म्हणाले की मी एक चांदोबातील कालातीत गोष्ट काढली आहे ...मला ऐकून वाटले मग सिनेमाचे नाव पण 'चांदोबातील गोष्ट' असेच द्यायचे ... 

भावे म्हणतात की त्यांना  पौराणिक विषयावरच्या नाटकावर सिनेमा बेतायचा नवहता , पण ते तर खाडिलकरांनाच नको होते (पहा: 'गंधर्वयुग', लेखक गंगाधर गाडगीळ, २००५, पृष्ठ ४२), त्यांनी अत्यंत यशस्वी पौराणिक पण गद्य नाटक (किचकवध) लिहले होते, म्हणून  ते एक हलकं , फुलकं , गोडवा असलेले (पण महान संगीत सौभद्र सारखे पौराणिक नव्हे) संगीत नाटक त्यांनी लिहले , मग आता अजून पुढे जाऊन चांदोबाची गोष्ट कसली?

अधुनिक मराठी  रंगभूमीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी नाटक जसेच्या तसे मराठी सिनेमा म्हणून का काढता येत नाही, हे मला कधी समजणार नाही...

शेक्सपियर ची अनेक नाटके सिनेमात आली आहेत , अगदी हिंदी भाषेत सुद्धा , जसे मकबूल , जे मला फार आवडले .. असे म्हणतात की राम गणेश गडकरींचे 'एकच प्याला', १९१७ हे सुद्धा ऑथेल्लो वर आधारित आहे असे प्रल्हाद केशव अत्रे म्हणतात... 


'बहुरूपी', चिंतामण गणेश कोल्हटकर, पृष्ठ ८४, १९५७-१९९८

Tuesday, January 21, 2025

१९४५ साली मर्ढेकरांच्या पांगलेल्या गाई आणि त्यांचे आजचे भक्षक...B S Mardhekar's Poem Showing His Uncanny Vision

बा. सी. मर्ढेकर यांची एक कविता  आहे:

"सुखदुःखांचे गळे कापुनी
मळे पिकविले वर्षांनी तरि,
रवंथ काढी कुढ़या मनाची
जुनाच भाकड़-कडबा हा वरि.

कुड़ीकुड़ींतिल भाव लाळला;
आचळ धरिती पातळ आशा;
अधू मनाची दुडकी कुठवर-
जमेल तर ही जिथवर भाषा,

-अणि पांगल्या गाई जगभर
गोमूत्रानें पावन अंबर!"

(३४, पृष्ठ ५१, मर्ढेकरांची कविता, १९५९-१९७७)   

म वा धोंड यांच्या मते मर्ढेकर इथे  San Francisco Conference, ज्याचे पुढे UN झाली त्याची निराशेपोटी थट्टा करत आहेत. (Sir Arcot Ramaswamy Mudaliar ह्यात भारताचे प्रतिनिधी होते.) . ज्या भारतीयांनी दोन महायुद्धे पहिली त्यांच्या मनोवस्थेची आज आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. 

कवितेतील गाई म्हणजे San Francisco Conference (एप्रिल ते जून १९४५) मध्ये भाग घेतलेले देश आणि गाय का तर त्या Conference ला येण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी वापरलेले विमान : ज्याचे नाव होते Sacred Cow.  

सुरवातीला रवंथ आहे त्या ठिकाणच्या चर्चांची निरर्थकता दाखवण्यासाठी. शिवाय The League of Nations ला  दुसरे महायुद्ध टाळण्यात आलेले अपयश.

(President Harry S. Truman used the Douglas VC-54C aircraft, nicknamed the "Sacred Cow", to travel to the San Francisco Conference in 1945). 

WSJ ने जानेवारी १७ २०२५ ला एक लेख छापला आहे : "In a New Age of Empire, Great Powers Aim to Carve Up the Planet :After World War II, nations pledged to create a more equal and law-abiding world. Now Russia, China and the U.S. are returning to an older model in which powerful countries impose their will."

"In 1945, the victorious Allied powers gathered in San Francisco to draft a charter for the United Nations, the foundation of a new global order that would make another world war impossible. The charter proclaimed that all countries had equal rights and would no longer resort to “the threat or use of force against the territorial integrity or political independence of any state.” President Harry Truman told the assembled delegates that “the responsibility of the great states is to serve, and not to dominate, the peoples of the world,”

Today, these lofty principles look quaint, if not outright irrelevant, as the world returns to what was presumed to be the natural law of statecraft since the dawn of history: The strong do as they please and the weak suffer as they must..." 


 
William Pitt the Younger, British Prime Minister, left, and Napoleon of France carving up the globe. 

by James Gillray (1756-1815) titled The Plumb-Pudding in Danger, 1805

 


 artist: Kyle Ellingson, WSJ, Jan 17 2025

Saturday, January 18, 2025

ही वाट दूर जाते...Monet's Path in the Wheat Fields at Pourville, 1882


शांता शेळके : 
 
"ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?

जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळया ढगांनी रंगीन साज ल्यावा

घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी
लागून ओढ वेडी खग येती कोटरासी
एकेक चांदणीने नभदीप पाजळावा

स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा"
 
अशीच एक "वाट" पहा:
 

Claude Monet, Path in the Wheat Fields at Pourville (Chemin dans les blés à Pourville), 1882
 
Angelica Daneo, Chief curator and curator of European art before 1900, Denver Art Museum wrote in 2021:

"The Path in the Wheat Fields at Pourville is one of my favorite paintings by the artist in the Denver Art Museum collection. We recognize the site of Pourville thanks to the distinctive white cliffs to the left, and yet a simple path dominates the scene. It takes over almost the entire lower half of the painting, accentuating with its gentle curve the intersecting lines of the beach, sea, and ground, resulting in a picture that is simple in details and highly sophisticated in composition. What I find remarkable in this work is Monet’s ability to integrate every element to create a scene of balanced, timeless harmony and convey all the spontaneity of a captured moment in time."

Wednesday, January 15, 2025

आशियाई हत्ती का अफ्रिकी? ...Asian Elephants or African?

काही अफ्रिकी हत्ती इतके महाकाय दिसतात की मला वाटायचे त्यांची आणि आशियाई हत्ती यांची झुंझ लागली तर ती एकतर्फी ठरेल.... 

मे २०२४ मध्ये मी ट्विटर वर पोस्ट पहिली की Battle of Rafah, 217 BC ह्या लढाईत वरील मुकाबला म्हणे पहिल्यांदा झाला होता .... 

आणि असे ही म्हणतात की त्यात आशियाई हत्तींचा विजय झाला होता... 


 

Friday, January 10, 2025

Three-Striped Palm Squirrels of IIT, Madras... आय आय टी मद्रास मधील खारी आणि माझा पातळ पोह्याचा चिवडा

 "The lively three-striped palm squirrels can often be seen scampering along green patches, pathways and hostels at @iitmadras. Enjoy a pleasant walk with them!"

 

Photo Credit: IIT Madras Heritage Centre

फोटोत हे लिहले नाहीये की ह्या खारी किती विध्वंसक असू शकायच्या

1982 साली मी मिरजेहून माझ्या ब्रह्मपुत्रा होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत परतलो होतो. सोबत माझ्या आईने करून दिलेला माझा त्याकाळातील अतिप्रिय पातळ पोह्यांचा चिवडा होता. तो मी भिंतीतील कप्प्यात सर्वात वरती ठेवला होता. चिवडा त्यावेळी मिळणाऱ्या सर्फच्या मोठया पेट बरणीत होता. मी त्या चिवड्याकडे एखाद्या मांजरासारखे पहात असे. मला तो जमेल तेवढा पुरवून खायचा होता...

आणि एक दिवस घात झाला. मी खोलीचे मागचे दार बंद करायला विसरलो- पहिल्यांदाच आणि एकदाच. त्यातून  खार आत आली. तिने बरणीचे वरचे जाड आणि टणक झाकण कुरतडले आणि सर्व चिवडा खाऊन पसार झाली....

मी परत आल्यावर ते पाहून रडकुंडीला आलो होतो, आजही इतक्या वर्षांनंतर त्याची चुटपुट आहे... 

"दाणे दाणे" पें लिखा है खानेवाले का नाम...  (आईच्या चिवड्यात खूप तळून घातलेले दाणे असत)