"...क्रौंचवध पाहून ज्याचा शोक श्लोकत्व पावला, त्या वाल्मिकीला फुलपाखरू दिसले नाही, मग इतरांना तरी कसे दिसावे?...आणि व्यासाचे उच्छिष्ट खाणारे आम्ही? व्यासाची प्रज्ञा तर घालवून बसलोच, पण आमची प्रतिभाही आटली… मानवी अंतरंग असो किंवा बाह्य सृष्टी असो, प्रकृतीचे आकलन, व तेही सूक्ष्म असल्याशिवाय, कल्पना उंचावत नाहीत, भावना संयत होत नाहीत. विभूषित होत नाहीत. आणि म्हणूनच फुलपाखरांचा अभाव हा भारतीय साहित्याच्या अनेक अभांवाचा प्रातिनिधिक अभाव आहे असे मला वाटते… "
(“पिवळीच मी पाकोळी की”/ निसर्गोत्सव, १९९६)
दुर्गाबाईंच्या वरील उद्गाराबद्दल मी या ब्लॉगवर पूर्वी बऱ्याच वेळा लिहले आहे. पण डिसेंबर २०१९ मध्ये मला हे अतुलनीय असे चित्र बघायला मिळाले:
'Brahminy Starling with Two Anteraea Moths, Caterpillar and Cocoon in Indian Jujube Tree’, १७८० ,
© Minneapolis Institute of Art
कलाकार: Shaikh Zain ud-Din हे बंगाली होते...सांगायची गोष्ट तुम्ही दोन पाकोळ्या चित्रात पाहू शकता! -
१७८० सालचे हे चित्र आहे. मग ह्या इसवी सनाच्या सुरवातीपासूनच्या परंपरेचे काय झाले?
No comments:
Post a Comment