"... नामदेवांनंतर मराठी भाषेशी इतकी जवळीक साधणारा कोणीच कवी मराठीत झाला नाही...
पण प्रचंड व्यवहारजन्य शब्दभांडार , बोलीच्या सहजतेतून छंदाच्या डौलदार तोलात विविधपणे चकित करणारे पद्यप्रभुत्व....
म्हाइंभटाचे सहज मराठी गद्य, ज्ञानेश्वरांच्या अभंगांमधील राजस शब्दकळा किंवा 'अमृतानुभवा'त मराठी भाषेला सहज प्राप्त झालेला सात्विकपणा , नामदेवांच्या रचनेचा डौलदार गोडवा , तुकोबांच्या अभंगांची सर्वंकष भाषा हे मूळ मराठीचे आदर्श आहेत...
त्यांचा परखडपणा आणि शिवराळपणा हिंसक किंवा विध्वंसक नाही, तर त्यांच्या कळवळ्याचा आणि तिडकीचाच तो अविष्कार आहे. सात्विक, राजस आणि तामसी अशा तिन्ही रूपांत व्यक्त होणारी त्यांची शब्दसृष्टी ही मुळात सर्वसमावेशी आणि म्हणून तिन्ही गुणांपेक्षा व्यापक आहे...."
'दी वायर', २००२-२००८ (The Wire) ही टीव्हीच्या जगातील एक सर्वोत्तम मालिका आहे. मला ती पाहताना सर्वात कुठल्या गोष्टीचे अप्रूप वाटत असेल तर - त्यातील बोली भाषा.
कुठल्याही साहित्य, नाट्य, सिनेमा किंवा टीव्ही कलाकृतीच्या यशामध्ये भाषेच अर्थातच मोठ योगदान असत पण वायर पहात असताना मला इंग्लीश भाषेच्या श्रीमंतीचे, लवचिकतेचे. विविधतेचे, सौन्दर्याचे जरा जास्तच कौतुक वाटते... आणि ती भाषा का जगज्जेती झाली याचा अंदाज येतो.
मी फक्त एकच उदाहरण थोडक्यात सांगणार आहे.
सिझन १, एपिसोड १३ मध्ये जिमी मकनल्टी (Jimmy McNulty) हा आपली कलीग असलेली, अंडरकव्हर ऑपरेशन मध्ये मरता मरता वाचलेली किमा ग्रेगज (Kima Greggs) ला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेलाय...घटनेच्या नंतर बऱ्याच दिवसांनी गेलाय... त्याआधी ना त्यान फुल पाठवलीयत, ना कार्ड....जिमी खूप भावुक झालेला आहे... एकीकडे अपराधी (guilty) वाटतय....दुसरीकडे तिची ही अवस्था बघून वाईट वाटतय... तो तीन एक मिनिटांचा प्रसंग यूट्यूब वर इथे पाहू शकाल....
त्या प्रसंगामध्ये किमा खालील वाक्य बोलते:
वरील वाक्यातील हा भाग पहा : ...since I got you up in here acting like my bitch and shit with all your guilty-ass crying and whatnot ...
कस करणार याच भाषांतर? याला कोणतीच डिक्शनरी कामी येणार नाही....बिच (bitch) काय, शिट (shit) काय, आस (ass) काय (फक नाहीये पण तो आधीच्या वाक्यात येऊन गेलाय!)... पण ते शब्द इथे अपशब्द म्हणून, शिव्या म्हणून येतच नाहीत.... ते शब्द वेगवेगळे अर्थ घेवून आलेले आहेत... आपल्या भावना लपवायला त्यांचा खेळ चाललेला आहे...
मराठीत सोडा, याच 'नेटक्या' इंग्लीश मध्ये पण भाषांतर करता येणार नाही, पण ज्यांना ते समजल त्यांना हे रडवून-हसवणार वाक्य आहे...मानवी व्यवहारात भाषा कोणत्या पातळीला जाऊ शकती, कसा सौन्दर्यानुभव देऊ शकते हे दाखवून देणार.
ग्रे ज्याबद्दल बोलतात त्या एपिसोडच्या- In “Old Cases,” an episode in the first series- ट्रान्सक्रिप्टचा भाग वाचा:
"लाज ना विचार
बाजरी तू भांडखोर
ऐसे ज्याणे व्हावे
त्याची गाठ तुजसवे
फेडीसी लंगोटी
घेसी सकळांसी तुटी
तुका म्हणे चोरा
तुला आप ना दुसरा" (अभंग क्रमांक: १८१२, 'श्री तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा', १९५०/१९९१)
दिलीप चित्रे वर म्हणतात: "तुकारामांचा परखडपणा आणि शिवराळपणा हिंसक किंवा विध्वंसक नाही, तर त्यांच्या कळवळ्याचा आणि तिडकीचाच तो अविष्कार आहे. सात्विक, राजस आणि तामसी अशा तिन्ही रूपांत व्यक्त होणारी त्यांची शब्दसृष्टी ही मुळात सर्वसमावेशी आणि म्हणून तिन्ही गुणांपेक्षा व्यापक आहे"... असेल पण मला वाटत की तुकारामांचे विठ्ठलाबरोबर आयनेस्को आणि बेकेटच्या नाटकांसारखे stoically playful banter चालू असायचे.
चित्र्यांच्या १७व्या वर्षी लिहलेल्या एका कवितेची सुरवात आहे: "तुकाराम वाण्या, भेंचोद, तू खेचलंस मला मराठी भाषेच्या दलदलीत."
आता इथे भेंचोद म्हणजे तरुण चित्र्यांच तुकारामांबरोबर चाललेल playful banter...
मी पोस्टची सुरवात कै चित्रेंच्या अवतरणांच्या 'कोलाज'न केली. त्यासंबंधात आणखी एक गोष्ट मला इथे मांडावीशी वाटते.
मानवी जीवनातील अनेक मोठ्या गोष्टी माणसाच्या जन्मापासून (अजूनतरी) बदलल्या नाहीयेत पण इतर अनेक बदलल्यात, उदा: विज्ञान, पर्यावरण, टेकनॉलॉजी, वस्त्रे , फॅशन, आयुमान, खाणपिण, शिक्षण, राजकारण, गुन्हे वगैरे. भूगोल सुद्धा गेल्या ३५०-४०० वर्षात थोडा बदलला! संतकवी माझी सतत साथ देणारे असले तरी त्यांच्या साहित्यात हा बदल कधीच येणार नाही. साहित्य अपडेट करता येत नसते!
हे झाल मराठी कवींपुरत पण इंग्लीश येत असेल तर आपल्या डोळ्यासमोर जागतिक साहित्य, नाट्य, सिनेमा, टीव्ही क्षेत्रातील अनेक तुकारामाच्या महानतेची आठवण करून देणाऱ्या गोष्टी येतात....त्यातील एक असते 'दी वायर' सारखी टीव्ही सिरीयल...
2 comments:
" साहित्य अपडेट करता येत नसते! [...] त्यामुळे मला माझे बाह्य जग कोणीतरी संतकवींच्या उत्कटतेने, योग्यतेने कलेतून सादर करावे असे वाटणे साहजिक आहे.": ही अपेक्षा चांगली वाटली. पोस्टमधे पद्यासंंबंधीचीच नावं उदाहरणादाखल नोंदवली आहेत. गद्य-पद्य असा भेद करून कदाचित आणखीही काही बाजू मांडता येत असतील. खासकरून ज्या बदलांचा उल्लेख आहे, त्या संदर्भात भाषेचा वापर, आजूबाजूच्या घडामोडी, इत्यादी मुद्दे गद्यात कसे येतात नि पद्यात कसे येतात- हे या भेदातून तपासता येईल. पूर्ण तुकडा पाडणारा भेद नाही, पण तरी साधारण रचनेत वगैरे जो फरक असतो, त्या अर्थानं.
"ती भाषा का जगज्जेती झाली याचा अंदाज येतो": हे मात्र खटकलं. भाषेची तिचीतिची वैशिष्ट्यं सांगणं, त्यासंबंधीची स्तुती करणं, याबद्दल आक्षेप नाही. पण जगज्जेते होतात ते लोक- माणसं. शस्त्रं, सैन्य वगैरे वापरून जग जिंकतात. आता सैन्यबळासोबत ज्ञान-तंत्रज्ञान वगैरे गोष्टीही आल्या. अशा कमी-अधिक तीव्रतेनं जग जिंकणाऱ्यांची भाषा पसरणं, हा मुद्दा निराळा आहे. 'भाषा ही पायदळ आणि नौदलाचं पाठबळ असलेली बोलीच असते', (A language is a dialect with an army and navy) असं मॅक्स वाइनराइख यांचं एक अवतरण मध्यंतरी एका पुस्तकात वाचनात आलं. हे अवतरण जगज्जेती भाषा नि कुठल्यातरी कानाकोपऱ्यातल्या भाषा यांच्यातल्या उतरंडीच्या संदर्भातही लागू होऊ शकतं. भाषिक वैशिष्ट्यांची स्तुती आणि भाषा पसरणं/जगज्जेती होणं यांचा असा संबंध नसावा. 'जगज्जेतपणा'च्या बाबतीत हा संबंध जोडणं खटकतं. यात अर्थातच आणखीही काही बाजू असतील.
मला बर नाहीये म्हणून जरा त्रोटक प्रतिक्रिया.
.... बरोबर पण मला पद्या पुरत च लिहायच होत.
.... या विषयावर अर्थातच मतभेद होवू शकतात, पण ज्या पद्धतीने जगातील भाषा मरत आहेत. इंग्लिश वाढत आहे आणि त्याच्यात दर्जेदार वाङ्मय, नाट्य, समाज शास्त्रे , शास्त्रे , टेकनॉलॉजि करमणूक तयार होते आहे , मोघमपणे ते वाक्य म्हणायला हरकत नाही
Post a Comment