"मी पोरबपो सगळीकडे वापरलं नाही आणि काही डाग तसेच ठेवले कारण मला तुला तू किती ढिला आहेस याची सतत जाणीव करून द्यायची आहे."
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Tuesday, December 19, 2017
मी पोरबपो सगळीकडे वापरलं नाही आणि काही डाग तसेच ठेवले...Using Po Rub Po Selectively!
"मी पोरबपो सगळीकडे वापरलं नाही आणि काही डाग तसेच ठेवले कारण मला तुला तू किती ढिला आहेस याची सतत जाणीव करून द्यायची आहे."
Saturday, December 16, 2017
अलेक्झांडर-द- ग्रेट, तुम्ही पुन्हा जन्माला या....Alexander the great and Cleopatra
असे म्हणतात की महाराष्ट्रा वर सातवाहनांनी इतके चांगले राज्य केले की त्यांची आठवण लोक सातवाहन सत्ता नष्ट झाल्यानंतर जवळजवळ १००० वर्षे- म्हणजे साधारण सन १२०० पर्यंत- काढत असत.
२१व्या शतकात महाराष्ट्रातले सर्व राजकीय नेते शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर करत असतातच पण सामान्य माणसाला तर शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर आहे की जगात काय, स्वर्गात सुद्धा त्यांच्या इतका चांगला मनुष्य, राजा नसेल अस त्याला वाटत आणि म्हणूनच महाराष्ट्रात राहणाऱ्या , मराठी येणाऱ्या, माणसाने आजपर्यंत एकदा तरी हे आवाहन नक्कीच वाचले आहे: "राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या."
२०१७च्या सप्टेंबर मध्ये, महाराज वारले त्याला ३३७ वर्षे झाली.
कुरुक्षेत्र केंव्हा झाले याचे अंदाज ख्रिस्त पूर्व ५५६१ पासून ख्रिस्त पूर्व ९५० पर्यंतचे आहेत. ट्रॉय चा पाडाव ११९४-११८४ ख्रिस्त पूर्व वर्षात झाला. अलेक्झांडर द ग्रेट ३२३ ख्रिस्त पूर्व वर्षात वारले. क्लिओपात्रा ख्रिस्त पूर्व ५१साली सत्तेवर आल्या, ११३८ आणि २७२ वर्ष त्या दोन घटनांनंतर.
जसे शिवाजी महाराज आणि महाभारत आपल्या जीवनाचा आजही भाग आहेत तसेच ट्रॉय चा पाडाव ही घटना आणि अलेक्झांडर-द-ग्रेट क्लिओपात्रांच्या जीवनाचा होते.
खालील दोन परिच्छेद वाचा.
क्लिओपात्रांच्या काळात घोड्यांच्या रथांच्या मागे कदाचित लिहले जात असेल: "अलेक्झांडर-द- ग्रेट, तुम्ही पुन्हा जन्माला या"....
courtesy: Wikipedia
Thursday, December 14, 2017
जपानी जोडे- ठाणे ते उटी....Raj Kapoor@93
Rishi Kapoor, ‘Khullam Khulla: Rishi Kapoor Uncensored’, 2017:
मी कै. कपूर यांना खालील कारणांसाठी मोठे मानतो :
१. जागते रहो
२. श्री ४२०
३. २/३ मेरा नाम जोकर
४. आवारा
५. बूट पॉलिश
६. तीसरी कसम
७. बॉबी
यातील पहिल्या दोन सिनेमातील तर प्रत्येक क्षण बघण्यासारखा आहे. 'श्री ४२०' चा शेवट सुद्धा लक्षात राहण्यासारखा आहे कारण तो बनवण्यामागची सौन्दर्य दृष्टी, अपार कष्ट... जे वरील अवतरणात शब्दबद्ध झाले आहेत.
Monday, December 11, 2017
मोहोरणाऱ्या आनंदाऐवजी, ठसठसणाऱ्या वेदनेऐवजी...जी. ए, बालकवी, कोलेरीज...30 Years of GA's Absence
#GAKulkarni30thDeathAnniversary
Today December 11 2017 is 30th death anniversary of G A Kulkarni
जी. ए. कुलकर्णी, ऑगस्ट २८, १९६३:
"....पण त्यांचे (बालकवींचे) दुःख आपले मन निबर, संवेदनाहीन होत चालले आहे, मोहोरणाऱ्या आनंदाऐवजी, ठसठसणाऱ्या वेदनेऐवजी आवळू निर्माण झाले आहे अशी जाणीव त्यांना होऊ लागली असवी. पूर्वीचा उत्कट अनुभव व आताचे मनाचे शिलामय स्वरूप हा विरोध त्यांना डाचू लागला. Coleridge ची 'Ode to Dejection' नावाची कविता आहे; तिच्यात बालकवींचे आत्मचरित्र आहे. त्यांची भाषा विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयोगी, मन एकाच तऱ्हेच्या कल्पनांच्या आवर्तात सापडलेले. जीवनाचे भीषण स्वरूप व ते पाहण्याला भाषेची, मनाची असमर्थता यांत कुठे तरी त्यांच्या औदासीन्याचे मूळ आहे."
('जी. एंची निवडक पत्रे: खंड २', १९९८)
What a wonderful analysis in just a few sentences of a particular phase in the life of one of Marathi's great poets of 20th century...This is GA at his best...GA laughs off any suggestion that Balkavi's frustration had anything to do with a lady called Ramai (रमाई) and comes up with this explanation.
('रमाई' या विषयावर कै म वा धोंडांचा 'बालकवी, रमाई आणि सोनाळकर' हे मूळचे १९६३-१९६६ दरम्यानचे , पण 'जाळ्यातील चंद्र', १९९४/१९९८ मध्ये पुन्हा एकत्र प्रसिद्ध झालेले लेख जरूर वाचा.)
'Dejection: An Ode' is a poem written by Samuel Taylor Coleridge in 1802.
Thursday, December 07, 2017
आसन्नमरण राणी...Spectacular Evidence of an Age of Artistic Eloquence at Ajanta Verul
John Keay, ‘India: A History’:
नोव्हेंबर २०१७ मी अजंठा आणि वेरूळ पहिल्यांदा पहिली... त्या दोन्ही ठिकाणांवर इतके लिहल गेलय की मला लिह्ण्यापेक्षा वाचावस जास्त वाटत. तरी दोन-चार गोष्टी आत्ता लिहतो....
१> इतक जरी लिहल गेल असल तरी त्यांच्या इतिहासाबद्दल बरीच अनिश्चीत्तता. किती खर्च आला (अमाप), तो पैसा कशा पद्धतीने उभा केला गेला? नक्की माहित नाही. एकाही कलाकाराचे नाव खात्रीने माहित नाही. आत्ताच्या सेलिब्रिटी एज ला अगदी विसंगत आणि त्यातच भारतीय संस्कृतीची खुबी. कोणी केल यापेक्षा काय केलं, कशासाठी केल, किती टिकल याला जास्त महत्व.
आणखी एक प्रश्न पडतो: माझ्या सारख्या किती सामान्य लोकांनी अजंठा पाहिल असेल इ. स पू २०० पासून इ स ५०० पर्यंत? किंवा त्यानंतर सुद्धा १९वे शतक सुरु होईपर्यंत? कारण तिथे जाणे सुद्धा इतके अवघड होते. (खाली वाचा.)
२> ही लेणी तयार कशी झाली हे वाचल की ती अधिक थरारक सुंदर वाटायला लागतात. सायमन विंचेस्टर , न्यूयॉर्क टाइम्स च्या नोव्हेंबर ५ २००६च्या लेखात लिहतात:
३> इतकी लेणी पहिली पण आत्तापर्यंत केंव्हाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (Archeological Survey of India अर्थात ASI) तांत्रिक शाखेतील कोणाची भेट झाली नव्हती. ती २८ नोव्हेंबर ला अजंठाच्या गुहा क्रमांक २६ मध्ये झाली. श्री. वसंत पगारे Restoration वरती ठिकठिकाणी काम करतात. उदा: खालील चित्रातील लवंडलेल्या बुद्धावरती, पंढरपुरातील विठ्ठलमूर्तीवर त्यांनी पुष्कळ काम केले आहे. ते त्या गुहेत काम करत होते. त्यांना मी प्रश्न विचारल्यावर मोठ्या आनंदानी आणि उत्साहानी माहिती सांगितली.
त्यांचे नाव बहुतेकांना ठावूक नसेल पण वसंत पगारे महाराष्ट्राला मिळालेल्या हजारो वर्षांच्या शिल्पी परंपरेचा भाग आहेत. कदाचित प्राकृत -मराठी बोलणारे पगारेंचे आणि, काय सांगावे, माझे पूर्वज सुद्धा अजंठाच्या, वेरूळच्या निर्मितीत कुठेतरी सहभागी असतील.
मी त्यांना कै द ग गोडसेंची 'शिल्पी महाराष्ट्र'ची कल्पना सांगितली, ती त्यांना अतिशय पटली.
४> जपानी पर्यटक मोठ्या संख्येने अजंठाला भेट देतात हे ऐकले होते. आणि त्यांचे स्वागतच आहे. पण त्या दिवशी त्यांनी बराच वेळ, मध्यभागी प्रार्थनेला बसून, गुहा २६ जवळजवळ अडवूनच टाकली होती. शिवाय प्रार्थनेचा आवाज मोठा होता. मला हे जरा खटकले. माझ्या मुलावर तर, तो मध्ये येतोय म्हणत, त्यांच्यातील एकजण थोडा खेकसलाच. मला जपानी लोकांकडून हे अपेक्षित नव्हते.
५> 'आसन्नमरण काळी राणी' या नावाचा मूळ दिवाळी १९६४चा लेख (आता 'पैस', १९७०-१९८८ मध्ये समाविष्ट) आम्हाला higher मराठीला १९७४-७७ या काळात एकदा धडा म्हणून होता.
ते नाव मेंदूला जे चिकटल ते कायमच. १४-१६ वर्षाच्या मुलाला खर म्हणजे तो लेख जड आहे. मला तो त्यावेळी फार समजलाच नव्हता. कसला संसार आणि कसला त्याग समजतोय त्या वयात. मुली मात्र सुंदर दिसायला लागल्या होत्या.... खायला तर आवडायचेच....
अजंठात पाय ठेवल्या क्षणी 'आसन्नमरण काळी राणी आठवली'... आता अजंठ्याला फार कमी चित्र स्पष्ट दिसतात आणि कल्पनाशक्ती वापरायला लागते... पण दुर्गाबाईंच्या मदतीने दिसेल तसे ते चित्र पहिले आणि परत आल्यावर पुन्हा एकदा लेख वाचला आणि दुर्गाबाई किती original विचार करणाऱ्या होत्या हे पुन्हा एकदा समजले.... यशोधरा आणि आ का रा या दोघींमधला फरक त्यांनी केवढ्या कोमलपणे पण स्पष्ट शब्दात दाखवलाय...'पैस' मधला एकएक लेख अजंठाच्या चित्रांसारखा आहे...No wonder जीं ए 'पैस ' च्या प्रेमात पडले....विलास सारंग दुर्गाबाईंच्या संपूर्ण लेखनाच्या प्रेमात पडले....








