मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Sunday, January 14, 2018

स्वातंत्र्यानंतर र धों कर्वे...अजुनसुद्धा दुर्लक्षित .... R D Karve@136

#RDKarve136
आज १४ जानेवारी २०१८, र धों कर्वेंची १३६वी जयंती 

Joseph Lelyveld, 'Great Soul: Mahatma Gandhi and His Struggle With India', 2011:
"...His (Mahatma Gandhi’s) answers to conspicuous issues of rural mass poverty, underemployment, and chronic indebtedness may have been incomplete and untested. Not only did he reject birth control and recommend abstinence as a means of limiting population, but he had no scheme that addressed glaring inequities in land ownership and distribution beyond a wishful, woolly theory of “trusteeship” that basically relied on the benevolence of the wealthy..."


र धों कर्वेंकडे (१८८२-१९५३)  मी संतती नियमनाचे समाज सुधारक एवढ्या मर्यादित दृष्टीने पहात नाही. ह्या ब्लॉग वरील त्यांच्या वरच्या अनेक पोस्ट मंधून त्याचा उहापोह झालेला आहे.

पण ह्या पोस्ट मध्ये कर्वेंचे स्वतंत्र भारतात, १९४७पासून आजवर, काय चीज झाले ह्याबद्दल थोडेसे. माझी माहिती कोठून आली ते प्रत्येक ठिकाणी लिहिले आहे.

१> रामचंद्र गुहा हे महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांचे आवडते इतिहासकार. त्यांचे 'India After Gandhi: The History of the World's Largest Democracy', २००७ पुस्तक गाजलेले, मराठीत अनुवाद झालेले. त्यातील 'Autumn of the Matriarch' ह्या प्रकरणात खालील माहिती आहे:

"...The debates on India’s population size dated from the earliest days of Independence. Social workers had set up a Family Planning Association of India in 1949. The Planning Commission had spoken of the importance of family planning since its inception in 1950–1. However, culture and economics worked in favour of large families. The biases in educational development meant that girls were still valued more as child-bearers than as wage-earners. The continuing dependence on agriculture placed a premium on children. Indian Muslims and Catholics were enjoined by their clergy to abjure family planning...."

ज्या  माणसाने आपले सर्वस्व त्याकारणी लावल होत त्या  कर्वेंचा उल्लेख संपूर्ण पुस्तकात कोठेही नाही! (गुहांच्या 'Makers of Modern India', २०१० या पुस्तकात सुद्धा र. धों चा उल्लेख कोठेही नाही.)


२> अतिडाव्या विचारसरणीच्या  'Economic and Political Weekly' च्या नोव्हेंबर २०१७मधील एका अंकात आलेल्या लेखाचे नाव आहे : 'Garibi Hatao or Garib Hatao?: India's Journey through FamilyPlanning and Poverty 'Removal''. 

त्यालेखावर आधारित timeline मध्ये कर्वेंचा उल्लेख कोठेही नाही! (लेखात कदाचित असेल.)

सौजन्य : EPW
(१९४०ची वरच्या graphic मधील नोंद पहा. हिटलरला प्रखर विरोध करणारे भारतीय  Eugenics चे कसे पुरस्कर्ते होते ते पहा. )
३> आता वळतो माझ्या सर्वात भरवशाच्या source कडे- य दि फडके लिखित पुस्तक 'र.धों. कर्वे', १९८१

ह्या पुस्तकातील दोन छोटे परिच्छेद वाचा. 




 भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री श्रीमती राजकुमारी अमृता कौर (Amrit Kaur)  ह्या ख्रिस्ती होत्या, महात्मा गांधींच्या कट्टर अनुयायी होत्या - त्यांच्या आश्रमात राहिल्या होत्या आणि त्या संतती नियमनाची साधने वापरायच्या विरुद्ध होत्या. त्या गांधीजींप्रमाणेच आणि ख्रिस्ती धर्माच्या कलानुसार आत्मसंयमनाच्या (abstinence) पुरस्कर्त्या होत्या. (ख्रिश्चन धर्माच्या संतती नियमनाबद्दलच्या दृष्टिकोनांबद्दल हे वाचा.)

पंडित नेहरूंचा कुटुंबनियोजनाला किमान १९५२पर्यंत गुळमुळीत पाठिंबा होता. त्यांना ती गोष्ट १९५२पर्यंत महत्वाची वाटतच नव्हती. शिवाय, वर श्री. गुहा म्हणतात त्याप्रमाणे, बहुसंख्य मुसलमान आणि ख्रिस्ती लोक (केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसकट!) त्यांच्या धर्मामुळे कुटुंबनियोजन नाकारत होतेच.

१९५०साली भारत सरकारने कर्वेंना संततिनियमनासाठी लागणाऱ्या रबरी टोप्या आयात करू दिल्या नाहीत.  

यदिंच्या पुस्तकातील या महत्वाच्या गोष्टींचे उल्लेख गुहांच्या पुस्तकात नाहीत.  

थोडक्यात म्हणजे कर्वेंना आर्थिक किंवा नैतिक - कुठलाही पाठिंबा स्वतंत्र, निधर्मी भारताच्या पुरोगामी  पंतप्रधानाच्या कॅबिनेटने जवळजवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत दिला नाही. १९५८साली त्यांच्या वडिलांना भारतरत्न देण्यात आले, रधोंना मात्र कुठलाही पुरस्कार मिळाला नाही.