"अरे, निर्बुद्ध, जड़ जगाविषयी बदलती रुपके करत राहण्यापेक्षा तुझ्या रुपकांप्रमाणे जर जग बदलत जाऊ लागले तर तुला तरी जास्त काय हवे सांग."
“What we professional liars hope to serve is truth. I’m afraid the pompous word for that is art. Picasso himself said it. Art, he said, is a lie, a lie that makes us realize the truth.” The alternative is grim. “Reality? It’s the toothbrush waiting at home for you in its glass, a bus ticket, a paycheck, and the grave.”..."
“...You're beginning to believe the illusions we're spinning here, you're beginning to believe that the tube is reality and your own lives are unreal. You do. Why, whatever the tube tells you: you dress like the tube, you eat like the tube, you raise your children like the tube, you even think like the tube. This is mass madness, you maniacs. In God's name, you people are the real thing, WE are the illusion...”
लोकसत्ता , जुलै २३ २०१६:
After reading the above and witnessing my son's pursuit of the Pokémon, I realized how GA's Don could be seeing a Pokemon as he lay dying!
"...डॉन सारखा खिडकीकडे पाहत आहे हे सँकोच्या ध्यानात आले. तेथून आत येणार वारा बंद करण्यासाठी तो उठला. सँको पुढे येताच वेडा झटकन झुडपाआड गेला. सँकोने खिडकी बंद करण्यासाठी हात पुढे करताच डॉन आवाज ओढत म्हणाला, "अरे, मला त्या वेड्याशी जरा बोलू दे. हे बघ माझे आता सगळे संपले. मी उद्याचे ऊन पाहीन अशीदेखील आता शाश्वती नाही. तेंव्हा जो थोडा वेळ आहे तेवढा मला राहू देत."
"वेडा, वेडा!", कपाळावर हात मारून घेत वैतागाने सँको म्हणाला. "म्हणजे अजून त्याने तुमची पाठ सोडली नाही तर ! पूर्वी तुम्हाला दिसायचा तोच हा, की नवा ताजा काढलात हा एक दुसराच? लाल ठिगळांचा लांब झगा घातलेलाच?"
"होय, तोच."
"डोक्यावर घुंगरू लावलेली उंच, टोकदार टोपी आहे, हातात घंटा लावलेली काठी आहे आणि बोटाने तो इंद्रधनुष्य काढतो तोच ना?"
"होय रे होय, तोच." डॉन समाधानाने म्हणाला... "
(जी ए कुलकर्णी, 'यात्रिक'/ऑगस्ट १९७५, 'पिंगळावेळ'/ १९७७)
लाल ठिगळांचा लांब झगा घातलेला... डोक्यावर घुंगरू लावलेली उंच, टोकदार टोपी आहे, हातात घंटा लावलेली काठी आहे आणि बोटाने तो इंद्रधनुष्य काढतो...