'Bolshevik’, 1920, by Boris Mikhailovich Kustodiev
Isaiah Berlin, ‘A Message to the Twenty-First Century’, The New York Review of Books, November 25, 1994/ October 23 2014:
Simon Sebag Montefiore, ‘The Romanovs: 1613-1918’, 2016:
John Gray:
"Driven by ‘an amalgam of self-admiration and self-contempt’, intellectual and political leaders in Russia, China, India, Africa and the Islamic world responded to the incursions of imperialism by attempting to transform their societies along Western lines. Rejecting traditional elites and values, they imbibed Western ideologies, such as Marxism and Social Darwinism. By emulating the West, they hoped to defeat it. Instead, they have succumbed to the West’s pathologies and disorder"
Artist: Saul Steinberg (1914-1999), The New Yorker, February 25 1961
वरील इंग्रजी अवतरणातून रशियन क्रांतीने जगात काय घडवून आणले हे समजते. आणखी एक गोष्ट म्हणजे या आधीच्या अमेरिकन (१७६५-१७८३) आणि फ्रेंच (१७८९-१७९९) क्रांत्यांना जे जमल नाही ते या क्रांतीने केले: तीने महाराष्ट्राच्या (वाङ्मयीन) सांस्कृतिक जीवनात दीर्घ पल्ल्याची उलथापालथ नक्कीच घडवून आणली.
तिचे भयानक रक्तरंजित वास्तव आणि आर्थिक दिवाळखोरी साक्षर महाराष्ट्रात समजायला कित्येक दशके लागली. पण तो पर्यंत डझनाने मराठी साहित्यिक (उदा: साने गुरुजी, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, शं वा किर्लोस्कर, अनंत काणेकर, पु य देशपांडे, वि स खांडेकर, ग त्र्यं माडखोलकर, वि वा हडप ...) तिच्या (आणि पर्यायाने मार्क्सवादाच्या) प्रोपॅगांडाला कमी-जास्त प्रमाणात बळी पडले होते. लेखनात समाजवादी असण्याला मराठी साहित्य विश्वात मोठी प्रतिष्ठा मिळायला सुरवात झाली. समाजवाद आणि वास्तववाद याची गल्लत व्हायला सुरवात झाली. क्रांती हा शब्द मराठीत सहज वापरला जाऊ लागला. भांडवलदार, (मोठा) जमीनदार ह्या शिव्या बनल्या. साहित्य कृतीत चालेल पण पैशा बद्दल साहित्य विश्वात बोलायच नाही असा पायंडा पडत गेला. लेखकांमध्ये विज्ञानाच महत्व दिवसेंदिवस वाढत गेल आणि देवाच कमी होत गेल. नास्तिक असण्याला सुद्धा प्रतिष्ठा आली.
रशियन क्रांती- पहिल्या महायुद्ध काळात नावाजलेला धुरीण (समाजातील अल्पजन) वर्ग (ह ना आपटे, वि स खांडेकर, ना सी फडके, विश्राम बेडेकर ...), ज्यावर १९व्या आणि आधीच्या शतकातील ब्रिटिश कादंबरीचा मोठा प्रभाव होता, तो कथा, कादंबरी या वाङ्मय प्रकारासाठी वास्तववादाकडे जवळजवळ पूर्णपणे वळला होता. जसा बहुजन लेखक त्याकाळानंतर हळूहळू लिहता झाला तो अल्पजनांप्रमाणे वास्तववाद अंगीकारूनच. विलास सारंग म्हणतात: "...स्वातंत्र्यपूर्व धुरीण पिढीने कवटाळलेले ध्येयवाद, सुधारणावाद १९६० नंतरच्या बहुजन लेखकांनी सब-कॉन्शस अनुकरणप्रियतेने स्वीकारलेला दिसतो. काही नवीन वैचारिक मार्ग शोधण्याचा प्रयत्न क्वचितच आढळतो..." (पृष्ठ ६६, 'वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव', २०११)
माझ्या मते बहुजन साहित्यिकांना वेगळा, कधी पूरक- समांतर तर कधी काटकोनात (orthogonal) असा पंथ धरता आला असता. त्यांच्यावर शतकानुशतक झालेला अन्याय, त्यातून निर्माण झालेला आक्रोश किमान काही लेखकांना तरी विडंबन (satire) , अद्भुत (फँटसी), फार्स सारख्या साहित्य प्रकारातून (genre) अतिशय मनोरंजक आणि प्रभावी प्रकारे व्यक्त करता आला असता: उदा: जोनाथन स्विफ्ट यांची 'ए मॉडेस्ट प्रपोजल', १७२९ किंवा मिखाईल बल्गाकॉव्ह यांची 'दी मास्टर अँड मार्गारिटा', १९२८-१९४०.
महाराष्ट्रातले समाजसुधारक प्रखर वास्तव साध्या (ज्योतिराव फुले तर कधीतरी अतिशय लालित्यपूर्ण) मराठी भाषेत १९व्या शतकापासून मांडतच होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी विडंबनाची ताकत समर्थपणे दाखवून दिली होती. अण्णासाहेब किर्लोस्करांचा 'संगीत सौभद्र' नावाचा फार्स कमालीचा लोकप्रिय झाला होता. मराठीत केंव्हाच अनुवादित झालेल 'अरेबियन नाईट्स' सारख उत्तम दर्जाच फँटसी वाङ्मय उपलब्ध होत. प्रखर वास्तव, अतिवास्तव आणि फँटसी यांच्या सीमेवर संचार करणाऱ्या अस्सल देशी जातक कथा होत्या. शील-अश्लील असली दांभिकता धुडकारून देणार, बहुजनांच सामान्य जीवन तरलतेन मांडणार आणि सेलिब्रेट करणार जगातील एक महान पुस्तक 'गाथा सप्तशती' होत....
१९८९सालापर्यंत जरी या रशियन क्रांतीचा जगात इतर अनेक ठिकाणी मुडदा पडला असला तरी मराठी साहित्यावरील तीचा पगडा अजून बऱ्याच प्रमाणात कंटाळवाण्या, कल्पनाशून्य अशा ढोबळ वास्तववादाच्या (आणि ध्येयवाद , आदर्शवाद , परिवर्तनवाद) रूपात कायम आहे. लेखक आणि समाजसुधारक यातील फरक नष्ट झाला आहे...