दुर्गाबाईंनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना १ मार्च १९९६साली लिहलेले खालील पत्र वाचा.
मला ८६ वर्षाच्या दुर्गाबाईंनी संपूर्ण आयुष्य राजकारणात घालवलेल्या रावांना दिलेल्या 'विशुद्ध चारित्र्याचे' सर्टिफिकेट वाचून हसू आले. स्वतः श्री रावांना ते वाक्य वाचून नेमके काय वाटले असेल?
दुर्गाबाई खरतर मॅकियावेली (Niccolò Machiavelli) च्या अभ्यासक. बरेच भारतीय लोक मॅकियावेली यांना पाश्चिमात्यांचा कौटिल्य चाणक्य समजतात. दुर्गाबाईंनी त्या दोघांच्यातला नेमका फरक स्पष्ट केला आहे. "...मॅकिएवेलीत (माक्याव्हेल्ली) इतिहासाचे पूर्ण भान आहे. तसे अर्थशास्त्रात नाही..."
त्याबद्दल मी अधिक डिसेंबर ४ २०१३ रोजी याच ब्लॉगवर इथे लिहले होते.
A prince . . . must imitate the fox and the lion. For the lion cannot protect himself from traps, and the fox cannot defend himself from wolves. One must therefore be a fox to recognise traps, and a lion to frighten wolves. (Niccolò Machiavelli, The Prince, circa 1513 AD)...
रावांबद्दलची त्यांची पुस्तकातील काही विधाने पहा :
"P.V. Narasimha Rao was born a fixer. "
“Rao’s dual disposition enabled him to be at once principled, at once immoral. Personally honest, he was no stranger to political corruption. Though the courts acquitted him in the JMM bribery case, the evidence available to this author suggests he was in on the conspiracy. While Rao could be sensitive to those he loved, he could also be petty to subordinates, distant to family, instrumental with friends, and vicious to his enemies."
"Even Rao’s association with women reflected a certain opacity. He lived away from his wife for much of their marriage. He had a relationship with Lakshmi Kantamma for more than a decade. From around 1976 till his death, he had a close friendship with Kalyani Shankar. ‘He liked that people around him couldn’t quite figure out the exact nature of these connections,’ a friend of Rao says. ‘He liked the ambiguity.’”
माझा निष्कर्ष : ह्या सगळ्यात विशुद्ध चारित्र्याला वगैरे अजिबात स्थान नाही!.दुर्गाबाईंच 'सर्टिफिकेट' हा भाबडेपणा वाटतो. त्या अजूनही १९७७सालातच होत्या- ज्यावेळी जयप्रकाश नारायण, मधु दंडवते यांच्या सारखे लोक अजून राजकारणात होते- अस वाटत.