#MartinLutherKingJr. #पुलदेशपांडेजन्मशताब्दीवर्ष
मराठीत त्यांच्यावर एखादी सुंदर कविता किंवा लेख वाचल्याचे सुद्धा आठवत नाही.. .
१९५४साली श्री. किंग म्हणाले होते :
आता पु लंनी लिहलेला नाटकातील खालील संवाद वाचा:
काकाजी: पाहिलं नीट म्हणजे बराबर मझा दिसतो. इंदूर स्टेशनात एकदा एक भंगी दोन लंब्या झाडू घेऊन कचरा काढीत होता. उषा, अरे ऐश्या झाडू फिरवीत होता, की तुझ्या सतीशला बॅट देखील फिरवता येणार नाही तशी."
पहिली गोष्ट म्हणजे, महात्मा गांधी, विनोबा, आणि कालांतरानंतर बाबा आमटे यांना मानणाऱ्या पुलंना स्वच्छता कामगारांबद्दल आदर वाटणे, त्यांच्या कामाचे महत्व वाटणे, त्यांच्या सारख्या विकसित आणि प्रगल्भ सौन्दर्यदृष्टीला त्यातील सौन्दर्य दिसणे यात काहीच विशेष नाही.
दुसरी गोष्ट, भारतीय संस्कृतीत एखाद्याला कामात समाधान वाटणे, त्यात देव शोधणे हे सुद्धा काही संतांचे साहित्य वाचले असेल तर धक्का देणारे नाही. उदा:
संत जनाबाई:
"झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥"
पण आपल्या रोजच्या कामात कलानंद शोधणे? हे जपान सारख्या पौर्वात्य संस्कृतीत नवीन नसेल पण भारतीय संस्कृतीत नवीन आहे.
And I sit outside, working,
I am never bored.
With a chisel in hand
I can raise flowers from stones."
तेंव्हा किंगनी सांगितले आणि इंदूर स्टेशन वरील सफाई कामगारांनी ते जणू ऐकले आणि पुलंनी ते पहिले. म्हणून मला वाटते पुलंनी त्या संवादाची स्फूर्ती किंग यांच्या वक्तव्यातून घेतली असेल.
आणि याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही कारण पुलं चे कमी गाजलेले / खपलेले साहित्य वाचून आणि त्यांचे इतर उपक्रम पाहून अस वाटत की त्यांच वाचन चौफेर होत.
उदा: रवींद्रनाथ टागोराच्या महानतेची योग्य ओळख मराठी वाचकाला करून देतात, टी एस इलियट यांची कविता किती सहजपणे आणि किती योग्यठिकाणी ते quote करतात, जीएंना 'पिंगळावेळ' वाचून पत्र लिहतात, नवकवितेची प्रचंड हसवणारी विडंबन करतात (ज्यासाठी ती कविता पहिल्यांदा पचवायला लागते), 'त्याचे व्यवच्छेदक लक्षण' सारखा निबंध लिहतात, मर्ढेकरांची कविता सार्वजनिकपणे वाचून मर्ढेकर पुन्हा चर्चेत आणतात, जॉर्ज बर्नाड शॉ यांचे नाटक जणू त्यांनी मूळात मराठीत लिहल्यासारखे निर्मितात, हेमिंग्वे यांच्या कादंबरीचा (जरा कमअस्सल) अनुवाद करतात वगैरे....