मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Wednesday, August 02, 2017

'दी वायर'च्या इंग्लीश सारखे मराठी कुठे असेल?...Stoically Playful Banter In Tukaram, Ionesco, Beckett and The Wire

दिलीप पुरषोत्तम चित्रे, 'पुन्हा तुकाराम', १९९०/१९९५:
"... नामदेवांनंतर मराठी भाषेशी इतकी जवळीक साधणारा कोणीच कवी मराठीत झाला नाही... 

पण प्रचंड व्यवहारजन्य शब्दभांडार , बोलीच्या सहजतेतून छंदाच्या डौलदार तोलात विविधपणे चकित करणारे पद्यप्रभुत्व....

म्हाइंभटाचे सहज मराठी गद्य, ज्ञानेश्वरांच्या अभंगांमधील राजस शब्दकळा किंवा 'अमृतानुभवा'त मराठी भाषेला सहज प्राप्त झालेला सात्विकपणा , नामदेवांच्या रचनेचा डौलदार गोडवा , तुकोबांच्या अभंगांची सर्वंकष भाषा हे मूळ मराठीचे आदर्श आहेत... 

 त्यांचा परखडपणा आणि शिवराळपणा हिंसक किंवा विध्वंसक नाही, तर त्यांच्या कळवळ्याचा आणि तिडकीचाच  तो अविष्कार आहे. सात्विक, राजस आणि तामसी अशा तिन्ही रूपांत व्यक्त होणारी त्यांची शब्दसृष्टी ही मुळात सर्वसमावेशी आणि म्हणून तिन्ही गुणांपेक्षा व्यापक आहे...."


Samuel Beckett, 'Waiting for Godot', 1948-1953 :

"...POZZO: ( peremptory) . Who is Godot?

ESTRAGON: Godot?

POZZO: You took me for Godot.

VLADIMIR: Oh no, Sir, not for an instant, Sir.

POZZO: Who is he?

VLADIMIR:  Oh he's a . . . he's a kind of acquaintance.

ESTRAGON: Nothing of the kind, we hardly know him.

VLADIMIR: True . . . we don't know him very well . . . but all the same . . .

ESTRAGON: Personally, I wouldn't even know him if I saw him.

POZZO: You took me for him.

ESTRAGON: ( recoiling before Pozzo) . That's to say . . . you understand . . . the dusk . . . the strain . . . waiting . . . I confess . . . I imagined . . . for a second . . .

POZZO: Waiting? So you were waiting for him?..."

'दी वायर', २००२-२००८ (The Wire) ही टीव्हीच्या जगातील एक सर्वोत्तम मालिका आहे. मला ती पाहताना सर्वात कुठल्या गोष्टीचे अप्रूप वाटत असेल तर - त्यातील बोली भाषा.

कुठल्याही साहित्य, नाट्य, सिनेमा  किंवा टीव्ही कलाकृतीच्या यशामध्ये भाषेच अर्थातच मोठ योगदान असत पण वायर पहात असताना मला इंग्लीश भाषेच्या श्रीमंतीचे, लवचिकतेचे. विविधतेचे, सौन्दर्याचे  जरा जास्तच कौतुक वाटते... आणि ती भाषा का जगज्जेती झाली याचा अंदाज येतो.

मी फक्त एकच उदाहरण थोडक्यात सांगणार आहे.

सिझन १, एपिसोड १३ मध्ये जिमी मकनल्टी (Jimmy McNulty) हा आपली कलीग असलेली, अंडरकव्हर ऑपरेशन मध्ये मरता मरता वाचलेली किमा ग्रेगज (Kima Greggs)  ला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेलाय...घटनेच्या नंतर बऱ्याच दिवसांनी गेलाय... त्याआधी ना त्यान फुल पाठवलीयत, ना कार्ड....जिमी खूप भावुक झालेला आहे... एकीकडे अपराधी (guilty) वाटतय....दुसरीकडे तिची ही अवस्था बघून वाईट वाटतय... तो तीन एक मिनिटांचा प्रसंग यूट्यूब वर इथे पाहू शकाल....

सौजन्य : HBO

त्या प्रसंगामध्ये किमा खालील वाक्य बोलते:

"... Anyway, since I got you up in here acting like my bitch and shit with all your guilty-ass crying and whatnot maybe you can do something for me...."

वरील वाक्यातील हा भाग पहा : ...since I got you up in here acting like my bitch and shit with all your guilty-ass crying and whatnot ...

कस करणार याच भाषांतर? याला कोणतीच डिक्शनरी कामी येणार नाही....बिच (bitch) काय, शिट (shit) काय, आस (ass) काय (फक नाहीये पण तो आधीच्या वाक्यात येऊन गेलाय!)... पण ते शब्द इथे अपशब्द म्हणून, शिव्या म्हणून येतच नाहीत.... ते शब्द वेगवेगळे अर्थ घेवून आलेले आहेत... आपल्या भावना लपवायला त्यांचा खेळ चाललेला आहे...

मराठीत सोडा, याच 'नेटक्या' इंग्लीश मध्ये पण भाषांतर करता येणार नाही, पण ज्यांना ते समजल त्यांना हे  रडवून-हसवणार वाक्य आहे...मानवी व्यवहारात भाषा कोणत्या पातळीला जाऊ शकती, कसा सौन्दर्यानुभव देऊ शकते हे दाखवून देणार.

तत्वज्ञ जॉन ग्रे त्या भाषेबद्दल काय म्हणतात पहा:
"... From one point of view, The Wire is an exercise in realism. The reality it depicts is violent and profane. In “Old Cases,” an episode in the first series, McNulty and a colleague visit the site of the murder of a black college student. For nearly five minutes, while examining the crime scene and looking at photographs of the dead woman, the two detectives communicate with one another using only the word “fuck” and variations on it. The scene may have been a response by Simon and his co-writer to those who objected to the liberal use of expletives in the series: this is how detectives talk, the writers were saying. Repeating “fuck” while looking at photographs of the murdered woman testifies to the loss of affect that comes from too much contact with death and violence. The detectives are hard-pressed professionals, who are able to do the job only on condition that their normal human responses are in some degree suspended. Falling back on the profanity testifies to the difficulty of articulating any response to a situation in which random murder has become a normal part of life. At another level the repeated use of “fuck” and its derivatives composes a litany to meaninglessness, a succession of expletives that is as devoid of sense as the deaths that are being investigated. At this point the series plumbs deeper than Greek tragedy to approach the crueller genre of absurdist comedy. If the exchange between the detectives has dramatic precedents, it is in the stoically playful banter that is rehearsed in the plays of Ionesco and Beckett...."

ग्रे ज्याबद्दल बोलतात त्या एपिसोडच्या- In “Old Cases,” an episode in the first series- ट्रान्सक्रिप्टचा  भाग वाचा:



“...
Fuck.

Motherfucker.

Fucking fuck.

Fuck.
Fuck.
What the fuck? Fuck.
Fuck.
-No.
-Fuck.
Fuck it.
Fuck.
Motherfuck.
Fuck.
Fuckity, fuck, fuck.
Fuck.
Fuck.
Motherfucker.
Fuckin' A.
Fuck.
Check this.
Motherfucker.
Fuck me....”

तुकाराम:
"लाज ना विचार
बाजरी तू भांडखोर

ऐसे ज्याणे व्हावे
त्याची गाठ तुजसवे

फेडीसी लंगोटी
घेसी सकळांसी तुटी

तुका म्हणे चोरा
तुला आप ना दुसरा" (अभंग क्रमांक: १८१२, 'श्री तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा', १९५०/१९९१)

दिलीप चित्रे वर म्हणतात: "तुकारामांचा परखडपणा आणि शिवराळपणा हिंसक किंवा विध्वंसक नाही, तर त्यांच्या कळवळ्याचा आणि तिडकीचाच  तो अविष्कार आहे. सात्विक, राजस आणि तामसी अशा तिन्ही रूपांत व्यक्त होणारी त्यांची शब्दसृष्टी ही मुळात सर्वसमावेशी आणि म्हणून तिन्ही गुणांपेक्षा व्यापक आहे"... असेल पण मला वाटत की  तुकारामांचे विठ्ठलाबरोबर आयनेस्को आणि बेकेटच्या नाटकांसारखे stoically playful banter  चालू असायचे.

चित्र्यांच्या १७व्या वर्षी लिहलेल्या एका कवितेची सुरवात आहे: "तुकाराम वाण्या, भेंचोद, तू खेचलंस मला मराठी भाषेच्या दलदलीत."

आता इथे भेंचोद म्हणजे तरुण चित्र्यांच तुकारामांबरोबर चाललेल playful banter...
 
मी पोस्टची सुरवात कै चित्रेंच्या अवतरणांच्या 'कोलाज'न केली. त्यासंबंधात आणखी एक गोष्ट मला इथे मांडावीशी वाटते. 

मानवी जीवनातील अनेक मोठ्या गोष्टी माणसाच्या जन्मापासून (अजूनतरी) बदलल्या नाहीयेत पण  इतर अनेक बदलल्यात, उदा: विज्ञान, पर्यावरण, टेकनॉलॉजी, वस्त्रे , फॅशन, आयुमान, खाणपिण, शिक्षण, राजकारण, गुन्हे वगैरे. भूगोल सुद्धा गेल्या ३५०-४०० वर्षात थोडा बदलला! संतकवी माझी सतत साथ देणारे असले तरी त्यांच्या साहित्यात हा बदल कधीच येणार नाही. साहित्य अपडेट करता येत नसते! 

त्यामुळे मला माझे बाह्य जग कोणीतरी संतकवींच्या उत्कटतेने, योग्यतेने कलेतून सादर करावे असे वाटणे साहजिक आहे.  मला कुठेतरी आज लिहणारा तुकाराम अनुभवायचाय आणि म्हणून, जरी तुकारामाची बरोबरी नसली तरी, तसे करण्यात किंचित का होईना यशस्वी झालेले केशवसुत, बालकवी, मर्ढेकर, चित्रे, कोलटकर, सदानंद  रेगे, ढसाळ मला आवडतात कारण कुठेतरी ते मला दाखवत राहतात मराठीतील शब्दभांडार, पद्यप्रभुत्व,  सहजता, सात्विकपणा, गोडवा...तसेच परखडपणा आणि शिवराळपणा. 

हे झाल मराठी कवींपुरत पण इंग्लीश येत असेल तर आपल्या डोळ्यासमोर जागतिक साहित्य, नाट्य, सिनेमा, टीव्ही क्षेत्रातील अनेक तुकारामाच्या महानतेची आठवण करून देणाऱ्या गोष्टी येतात....त्यातील एक असते 'दी वायर' सारखी टीव्ही सिरीयल...