माझे पुण्यातील एक नातेवाईक महापुरात मुठा नदीत लकडीपुलावरून उडी मारून ओंकारेश्वर ला बाहेर निघत .. आणि अशा तत्सम अनेक गोष्टी मी पुण्यातील पुराबद्दल ऐकल्या आणि वाचलेल्या आहेत ..
एकेकाळी पुण्यात खडकवासला सुद्धा नव्हते किंवा ते एकटेच होते ... त्यामुळे पुण्यात पुराची खूप सवय लोकांना असणार ...
कै महादेवशास्त्री जोशी हे '||आत्मपुराण||' ह्या, प्रथम १९८५ साली प्रसिद्ध झालेल्या, आत्मचरित्रातील 'सांगली बहु चांगली ' ह्या नवव्या प्रकरणात, त्यांच्या सांगलीच्या कृष्णा नदीला आलेल्या साधारण १९२५ च्या सुमारास आलेल्या महापुरात, बापट नावाच्या मित्रामुळे त्यांनी उडी कशी मारली, आणि त्याचे पुढे काय झाले याचे रोमहर्षक वर्णन करतात ... ते सोबतच्या चित्रात ...
युद्धस्य कथा रम्या तसाच काहीसा प्रकार आहे, आपण पाण्यात नाही याचे बराच काळ बरे वाटत राहते ...
मी अवघ्या दहा किलोमीटर वर मिरजेत लहानपणी ओळीने वीस वर्षे राहून सांगलीत असे घडत असते किंवा सांगलीचे वेगवेगळे घाट याबद्दल मला हे पुस्तक वाचे पर्यंत माहित नव्हते!


