ना. गो. कालेलकर , 'भाषा आणि संस्कृती', १९६२-१९८२, पृष्ठ ४७:
"... ख्रिस्ताच्या शेवटच्या भोजन प्रसंगी पाण्याचे मद्य झाले अशी कथा आहे..."
विकिपीडिया मधील लास्टसपर (शेवटच्या भोजन प्रसंगी) च्या वेळी अशी कथा असल्याचा उल्लेख नाही.
माझी एक पूर्वीची (जून १५, २०१०ची) पोस्ट पहा. कालेलकर सांगत आहेत ती कथा "Marriage at Cana" च्या वेळी घडली. येशूचा तो एक (पाण्याची वाईन करणे) सुरवातीचा चमत्कार होता.
The Wedding Feast at Cana (1562) by Paolo Veronese
ह्या चित्राची आजवरची कथा Plunder: Napoleon’s Theft of Veronese’s Feast by Cynthia Saltzman ह्या पुस्तकात सांगितली आहे. त्याचे परीक्षण मी मार्च २०२१ मध्ये The American Scholar मध्ये वाचले.