(या पोस्टमधील काही मजकूर मी मेन्टेन करत असलेल्या दीनानाथ दलाल पेज वर येवून गेला आहे.)
इंग्लिश विकिपीडिया मध्ये मॅनस्प्रेडींग (manspreading) या विषयावर पेज आहे.
Artist: Joe Dator, The New Yorker (this cartoon has not been published in the print magazine.)
श्री. एस एस हवालदारांनीं बरीच चित्रे वाङ्मय शोभा साठी काढलेली दिसतात. मला त्यांचे खालील चित्र जास्त लक्षात राहिले, एक दोन कारणांसाठी.
रंग: अशी रंगसंगती अलीकडे बघायला मिळत नाही ... रहस्यमय निळेपणा ...आणि निळा काळा रंग....बाबुराव अर्नाळकर et al यांच्या रहस्यकथांच्या मुखपृष्ठांवर असणारे ....
वेणी घालणे हा एकेकाळी मध्यमवर्गीय घरांतून फार मोठा कार्यक्रम असे. एकमेकींची वेणी घालणे. लहान मुलींची वेणी घालणे... आणि ती वेणी घालताना हा एवढा albatross सारखा झालेला स्त्रीचा wingspan... हे 'womanspreading' वरील कार्टून मधल्यासारख कुरूप नाही! हवालदारांनी तर ते फार सुंदररीत्या पकडल आहे.
त्यातच तिची उंच मान पण दिसते.... बाहूंवर पसरलेल्या बांगड्या... नाकात चमकी... बाजूला नेकलेस ...
आणि आरसा समोर असून ती पाहतीय दुसरीकडेच... स्वप्नाळूपणे ...
मला स्वतःला वेणी घालताना बघणे हे काहीवेळा तरी खूप आकर्षक वाटायचे ...
[केशवसुतांनी दिवसेंदिवस खर्च करून काढलेली तिबेटी रांगोळी (sand mandala) घालताना पहिली नसेल. ती पहिली असती तर त्यांनी नक्कीच टोकाच्या सौन्दर्याच्या क्षणभंगुरतेबद्दल पण लिहले असते.]
केशवसुतांनी 'वेणी घालताना पाहून' कविता कशी लिहली नाही कुणास ठाऊक?
सौजन्य : श्री. हवालदारांच्या चित्रांचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा, जुलै १९५७, बुकगंगा.कॉम