मिश्किल जीए ... आणि तसे ते अनेकदा होतात!
जी. ए. कुलकर्णी अनंतराव कुलकर्णींना २.२.८१ रोजी लिहतात:
"...
काही विशिष्ट मूल्ये स्वीकारून धारदारपणे जीवन जगण्याची त्यांची (श्री.
म. माटे उर्फ माटे मास्तर १८८६- १९५७) ईर्षा आम्हाला फार दुर्मिळ आणि
आदरणीय वाटे. काही वेळा घरातील वडीलधाऱ्या माणसाची थट्टा करावी,
त्याप्रमाणे आम्ही आपापसात अगर पत्रात त्यांची थोडी थट्टा देखील करत असू,
उदा. 'सावित्री मुक्यानेच मेली' हे एखाद्या कथेचे नाव आहे की, एखाद्या टूथ
पेस्टची जाहिरात आहे?..."
(पृष्ठ १८६, 'जी.एं. ची, निवडक पत्रे: खंड ३', २००६/२०१२)
काय प्रचंड हसलोय मी हे वाचून!
सोबतची जाहिरात प्रसिद्ध झाली होती , माटे आणि जी.ए. या दोघांनी अनेक लेखन केलेल्या 'वाङ्मय शोभा', नोव्हेंबर १९४३ च्या अंकात.