Anton Chekhov:
गृहकलहांनी मोठमोठ्या सम्राटांपासून माहात्म्यांपर्यंत सर्वांना नमवल आहे.
वाङ्मय शोभाचे संपादक केळकर आणि चिं वि जोशी या दोघांचे अभिनंदन यासाठी की त्यांनी हे पत्र वाङ्मय शोभाच्या जानेवारी १९५५च्या अंकात मोठ्या दिमागाने छापले आहे.
पत्र वाचून वाईट वाटले. पत्रानंतर शास्त्रीबुवा ४वर्षे सुद्धा जगले नाहीत. अवघ्या ३१व्या वर्षी ते वारले.
पण मी विष्णुशास्त्रींची इंग्लीश भाषा वाचून फार खूष झालो. १४० वर्षानंतर सुद्धा त्यांची भाषा जुनाट वाटत नाहीये. खरच वाघिणीचे दूध शास्त्रीबुवांनी पचवले होते.
त्यातील हे वाक्य पहा:
"... I could beard defiantly a thousand Kuntes and Chatfields before I could safely reply by one harsh word in a torrent of household invective..."
एवढ मन मोठ करण किती २७वर्षांच्या उच्च शिक्षित तरुणांना १९व्या शतकात जमत असेल, आज जमत?
सौजन्य : चिं वि जोशींच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा, बुकगंगा.कॉम