John Keay, 'India: A History', 1999:
शिवाजी महाराजांच्या शासनात कारभार कसा नसेल याचे एक उदाहरण त्यांच्या जयंती निमित्त, त्यांच्या जयंती संबंधातले....
आज फेब्रुवारी १९ २०१८ रोजी लोकसत्तात महाराजांना अभिवादन करणारी एक पूर्ण पान जाहिरात आहे . त्या जाहिरातीच्या तळास काही मान्यवरांचे आणि इतिहासकारांचे उद्गार दिले आहेत. मी ते नीट वाचले.
१> जपानचे बॅरन कादा कोण हे मला गुगल करून सुद्धा समजले नाही.
२> युरोपियन इतिहासकार अॅनाल्ड टायबर्न कोण? विकिपीडिया मध्ये Anold Tyburn नाहीत. बहुतेक हे Arnold J. Toynbee असावेत.
३> डॉ डेलॉन मलातरी सापडले नाहीत. पण असतील.
४> डच गव्हर्नर इब्राहीम-लि-फ्रेंडर सुद्धा मला सापडले नाहीत. पण असतील.
५> ग्रँट डफ अधिकारी असतील पण ते इतिहासकार सुद्धा होते म्हणून त्यांचे महत्व
६> व्हॉइसरॉय जनरल वॉरेन हेस्टिंग कोण? हे वॉरेन हेस्टिंग्स असावेत. वॉरेन हेस्टिंग्स भारताचे व्हॉइसरॉय केंव्हाही नव्हते. व्हॉइसरॉय हे पद १८५८साली अस्तित्वात आले (Following the adoption of the Act that transferred the government of India from the East India Company to the Crown in 1858, the Governor-General as representing the Crown became known as the Viceroy).
हेस्टिंग्स हे गव्हर्नर जनरल होते.
वरील क्रमांक १,३, ४ यांच्या कडे दुर्लक्ष करा. पण बाकीचा मला अत्यंत खेदजनक असा ढिसाळपणा वाटतो.
जाहिरात तयार करणारे, देणारे, आणि वर्तमानपत्रे हे सर्वजण या गोष्टीला जबाबदार आहेत.