२०२१ सालच्या एप्रिल महिन्यात कित्येक वर्षांनी धों वि देशपांडे यांचे "जी.एं.च्या कथा : एक अन्वयार्थ", १९९० हे पुस्तक हातात घेतले.
त्यात तीन मोठ्या मर्यादा आज जाणवल्या.
१. यांत्रिक कथेमध्ये तत्वज्ञानाच्या चर्चेत लुक्रीशस नाही.
लुक्रीशस (१५ ऑक्टोबर इ. स पू ९९- इ. स पू ५५) यांचे 'ऑन दी नेचर ऑफ थिंग्ज' हे पुस्तक जी. एं.ना खूप आवडत होत.
ते म्हणतात: "...स्वच्छ, जळजळीत दृष्टीने Lucretius ने केलेला देव, देवता, भाबड्या कल्पना यांचा विध्वंस मला आवडला होता...".
त्यांना लुक्रीशसच्या पुस्तकाचा अनुवाद करायचा होता. तो ते बहुदा करू शकले नाहीत कारण जीए स्वतःच १९८७ डिसेंबर, वरील पत्रानंतर ९-१० महिन्यात वारले. जी ए त्या अनुवादाच्या प्रोजेक्ट मधील अडचणी पण सांगतायत : आपल्याकडे goddess of love नाही वगैरे....
२. कवठे कथेवरील चर्चेत अगदी जवळ येऊन सुद्धा जॉर्ज ओरवेल यांच्या १९८४ चा उल्लेख नाही.
In the old days, he thought, a man looked at a girl's body and saw that it was desirable, and that was the end of the story. But you could not have pure love or pure lust nowadays. No emotion was pure, because everything was mixed up with fear and hatred. Their embrace had been a battle, the climax a victory. It was a blow struck against the Party. It was a political act...."
पेरवाच्या बागेत, दुपारी संभोग करून, तसाच ठोसा लागावतात, जी. ए. कुलकर्णींच्या 'कवठे', १९७४ या कथेतील, समाजाने वेडसर ठरवलेला हरकाम्या दामू आणि कष्टकरी कमळी.
खर म्हणजे दामू अजिबात हिंसक नाहीय पण त्याने संभोगानंतर त्यांना हटकणाऱ्या रखवालदाराचा नुकताच गळा दाबून जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. कमळीमुळे तो रखवालदार वाचलाय. दामू समाधानाने कमळी ला सांगतोय की बाग छान होती. त्याला कमळी ठसक्यात उत्तर देतीये:
"… बाग छान नव्हती. आम्ही छान होतो. आम्हाला काय बागच पाहिजे, होय रे आडदांडा ? आयुष्यभर बागेतच पेरवे खात हिंडायला आम्ही काय खुळचट पोर आहोत की बडबड पोपट आहोत ? आम्ही जिथ बसू त्या ठिकाणी आमची बाग. ती बाग म्हणजे काही सगळ जग नव्हे. अरे, एवढ्या मोठ्या मातीत मरायला चार वाव जागा कशीही मिळते, मग चार वाव जागा जगायला मिळणार नाही होय?"
ती जणू समाज व्यवस्थेला सांगतीय: आम्हाला तुमचा गळा दाबायची गरज नाही, कुठल्याच हिंसेची गरज नाही कारण आमचा पेरवाच्या बागेतला संभोग हेच आमच त्या व्यवस्थेच्या विरुद्धच बंड होत.... It was a political act... Not merely the love of one person, but the animal instinct, the simple undifferentiated desire: that was the force that would tear the Party to pieces. ... Our embrace had been a battle, the climax a victory...
तुम्ही कदाचित आम्हाला तुमच्या व्यवस्थेच्या परिघावरती कायम ठेवाल, आम्हाला बावळट ठरवाल, हसाल, पण तुम्ही आमचा आनंद कधीच हिसकावून घेवू शकणार नाही...
He knelt down before her and
took her hands in his'
ऑरवेल यांची दामू व कमळी आणि आजूबाजूला आहे पेरवाची बाग
कलाकार : जोनाथन बर्टन
३. देशपांडे 'विदूषक' चे २७ पानी परीक्षण लिहतात! कथा आहे ३६पानाची. मला त्यांनी ते परीक्षण एवढे दीर्घ का केले आहे समजले नाही.
त्या
कथेचा गाभा आहे - "सत्तेचे स्वरूप"...ज्याबद्दल आपल्याला चाणक्याकडे न
वळता मॅक्यियावेली वळायला लागते आणि The Prince हे पुस्तक वाचायला किंवा
चाळायला तरी लागते.
सुदैवाने देशपांडे त्या पुस्तकाचा परीक्षणात सातव्या पानावर मॅक्यियावेलीचा उल्लेख करतात आणि तरी पुढे १९-२० पाने लिहतात.
देशपांडे
चाणक्य सुद्धा त्याच पानावर आणतात म्हणतात- चाणक्य म्हणजे कुटीलता +
अर्थशास्त्र! दुर्गाबाईंची चाणक्याच्या मर्यादेवरची टिप्पणी जास्त यौग्य
वाटते - त्याला इतिहासाचे मॅक्यियावेली सारखे भान नाही...
माझ्यामते 'विदूषक' कथा म्हणजे जी. एं, नी मॅक्यियावेली ला- the father of modern politics- दिलेली दाद आहे.
जीएंचे
द्रष्टेपण सिद्ध करणारी, काहीतरी शिल्लक बराच काळासाठी सोडून जाणारी ,
भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा मिलाफ बेमालूम पणे करणारी , न बदलणारे
माणसाचे स्वरूप पुन्हा एकदा दाखवून देणारी ही आणखी एक कथा.
"Here a
question arises: whether it is better to be loved than feared, or the
reverse. The answer is, of course, that it would be best to be both
loved and feared. But since the two rarely come together, anyone
compelled to choose will find greater security in being feared than in
being loved. . . . Love endures by a bond which men, being scoundrels,
may break whenever it serves their advantage to do so; but fear is
supported by the dread of pain, which is ever present."
― Niccolò Machiavelli, The Prince