मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Wednesday, August 26, 2020

Susan Harrison@82

#SusanHarrison82

Today August 26 2020 is 82nd birth anniversary of Susan Harrison (1938-2019)


 With Tony Curtis on left in 'Sweet Smell of Success', 1957

I really liked her small role in this and I wish I could see her in more movies.

courtesy: United Artists

Friday, August 21, 2020

Leon Trotsky Died 80 Years Ago

#LeonTrotsky

कै गो पु देशपांडे: 
"...पण स्तालिनसंबंधी मी काय चुकीचे बोललो? त्याच्या आमदनीत रशियात रक्त सांडलं हे नाकारण्यात काय मतलब आहे? रक्त सांडून का होईना गोगलगाय होऊन गेलेल्या रशियात वाघाची अवलाद त्यानं निर्माण केली पंचवीस वर्षात… " 
"...माओ काय म्हणतो माहिती आहे ना ? क्रांती करणे  म्हणजे पंचपात्र आणि पितांबर घेऊन जेवायला जाण नव्हे --"
"...काही चळवळी आज या देशात नोकरशाह्या होऊन बसलेल्या आहेत. विशेषतः डाव्या चळवळी. कदाचित सगळीकडेच. नाहीतर माओने सांस्कृतिक क्रांतीचा एवढा मोठा प्रपंच मांडला नसता…"
 
('उध्वस्त धर्मशाळा', १९७४)

I liked what Clive James has written about Trotsky:
"...Pablo Neruda was instrumental in smoothing the assassin’s path but never wrote a poem on the subject: something to remember when reading the thousands of ecstatic love poems he did write. They are full of wine and roses but no ice axe is ever mentioned. Admirers of Neruda don’t seem to mind. The same capacity for tacit endorsement is shown by Trotsky’s admirers, who even today persist in seeing him as some sort of liberal democrat; or, if not as that, then as a true champion of the working class; or anyway, and at the very worst, as one of those large-hearted Old Bolsheviks who might have made the Soviet Union some kind of successfully egalitarian society had they prevailed. But when it became clear that the campaign for the collectivization of agriculture would involve a massacre of the peasantry, Trotsky’s only objection was that the campaign was not sufficiently ‘militarized.’ He meant that the peasants weren’t being massacred fast enough...."
('Cultural Amnesia: Necessary Memories From History and the Arts',  2007)

वर उद्धृत केल्याप्रमाणे स्टालिन आणि माओचे प्रचंड कौतुक असणारे, पाब्लो नेरुडा सारखे वागायची तयारी असणारे, भारतातील कित्येक left liberal अथवा  पुरोगाम्यांना, त्यांच्या स्वतः सारख्या नसणाऱ्या लोकांबद्दल ट्रॉटस्की सारखे वाटते. ते छुपे ट्रॉटस्कीच आहेत. 

वरील चित्रातील Leon Trotsky ओळखा!
 
Both pictures: 'Animal Farm' is a 1954 British-American animated drama film directed by John Halas and Joy Batchelor. It was produced by Halas and Batchelor, based on the 1945 novel of the same name by George Orwell. 
 

Monday, August 17, 2020

Dirty Dancing@33...This is Definitely a Queer Film in the Current Sense

#DirtyDancing

'Dirty Dancing' was released on August 17 1987.


by  alix.dessine | Instagram

Esther Newton, ‘Dirty Dancing Belongs in the Lesbian Rom-Com Canon’: 

“....OK, so Johnny’s a man. But we gays have had to project ourselves into heterosexual narratives. Working-class Johnny can’t believe that this doctor’s daughter wants him, and his attitude is not one of conquest; it is always of gratitude and tenderness. They don’t slurp open-mouthed kisses and hump in offbeat locations and positions, as in today’s conventional representations of heterosexual lust. Their masculine-feminine attraction is played out in partnered dancing and in tempo, in gestures, her hand running over his ass, the electric moment before they kiss. As Grey plays her, Baby matches Johnny’s sexy masculinity with her powerful femininity. This is definitely a queer film in the current sense, disrupting normative gender roles and heterosexuality....”

(‘Literary Hub’, November 2018)
 


I tremendously like this song and never tire of watching it. The chemistry between each of them is bewitching.

Saturday, August 15, 2020

"पिपांत मेले" कविता "मी एक मुंगी" पेक्षा श्रेष्ठ कविता आहे....Two Poems of Mardhekar

मे २१ २०१८ला मी तयार केलेल्या बा सी मर्ढेकरांच्या पेजवर खालील मजकूर टाकला होता:

"परवा लिहल तस मर्ढेकरांच्या मला समजलेल्या किंवा आवडलेल्या कवितांकडे मी स्वतः माझ्या जीवनाच्या सापेक्ष बघायचा प्रयत्न केलाय, जीवन बदलतंय तस आकलन बदलतय...

आता ह्या ओळी पहा:
"... ह्या मुंग्यांतील एकेकीला
बनेल खाउनि राजा कोण...."

".... हा मुंग्यांचा लोंढा आला ! खोला, फाटक खोला !-"
(१६, पृष्ठ ८९, 'मर्ढेकरांची कविता', १९५९/ १९७७)

आपल्याला माहित आहे मर्ढेकरांच्या कवितात उंदीर, मुंग्या म्हणजे माणसेच... पण मी तसा विचार नेहमी केला नाहीय...

लहानपणी जॉर्ज ओरवेल यांची ऍनिमल फार्म (माझ्या वडिलांनी केलेला त्याचा मराठी अनुवाद) ही मी कित्येक वेळा पंचतंत्र किवा इसापनीती सारखी वाचलीय (आणि बॉक्सरच्या मृत्यूनंतर प्रत्येकवेळा थोडा रडलोय).

मुंग्या आणि मुंगळे  हे माझ्या बालजीवनातील अत्यंत महत्वाचे प्राणी होते (त्याशिवाय बेडूक, उंदीर, सरडा, गांडूळ, पाल, कोंबडा-कोंबड्या, म्हैस, गाय-बैल, शेळी, बोकड, गाढव, कुत्री, मांजर, साप  वगैरे). सगळीकडे मुंग्या असत,. विशेषतः उन्हाळ्यात. माझे कित्येक तास त्यांना पाहण्यात गेले आहेत. मुंगळे सगळ्या झाडांच्या पारावर असत - वड, पिंपळ... पेरूचं झाड तर भरलं असायच त्यांनी....त्यांनी घेतलेले चावे अजून आठवतात...
मुंग्या ह्या इतक्या ubiquitous होत्या की त्या माझ्या अत्यंत आवडत्या साखरांब्याच्या (मुरांबा), आईने अत्यंत घट्ट, कापड लावून बंद केलेल्या बाटलीत हमखास पोचत.

म्हणजे शाळेत मी Francesco Redi (https://en.wikipedia.org/wiki/Francesco_Redi He was the first person to challenge the theory of spontaneous generation by demonstrating that maggots come from eggs of flies) यांचा सिद्धांत अभ्यासत होतो पण आमच्या घरी मुंग्या त्या सिद्धांताला मानायला तयार नव्हत्या!

त्यानंतर काही वर्षांतच मर्ढेकरांची 'मुंगी' कविता वाचली , फार आवडली आणि अजून बरीच पाठ आहे .. पण त्यातील एक-दोन गोष्टी नोंद करण्या सारख्या:
"हा मुंग्यांचा लोंढा आला ! खोला, फाटक खोला !".... मुंग्यांसाठी तुम्हाला फाटक खोलायला लागत नाही, त्या फाटक तोडून आत येत असतात!....

दुसरी गोष्ट, वर म्हटल्याप्रमाणे साखरांब्याबरोबरीने काही मुंग्या पोटात गेल्या आहेत... त्यामुळे राजा बनणे तर नशिबी आहेच... अर्थात हे मर्ढेकरांच्या कितीतरी आधी आईने समजावणीच्या सुरात सांगितले होते..."

नंतर आणखी एक गोष्ट लक्षात आली - ऍनिमल फार्म, पंचतंत्र किवा इसापनीती मध्ये लेखकांना कधीही सांगायला लागत नाही की हे प्राणी म्हणजे माणसांचे रूपक आहे म्हणून. मग मर्ढेकरांना हे ९व्या, १०व्या, १३व्या  कडव्यात का ठोकून सांगायला लागतंय? शिवाय कवितेची सुरवात "मी एक मुंगी" अशी आहे. मग पुन्हा पुन्हा "ह्या नच मुंग्या : हींच माणसे :" हे कशाला बजावायला पाहिजे. आम्हाला पहिल्या ओळीतच समजल.

"पिपांत मेले...." (२१, ४१, तत्रैव) मध्ये ते तस सांगत नाहीत.

त्या कारणासाठी, माझ्यासाठी,  "पिपांत मेले" कविता  "मी एक मुंगी" पेक्षा श्रेष्ठ कविता आहे

Tuesday, August 11, 2020

Eating The Shrub of Delusion



Fernando Pessoa: 
 “...Only if you don’t know what flowers, stones, and rivers are

Can you talk about their feelings.

To talk about the soul of flowers, stones, and rivers,

Is to talk about yourself, about your delusions.

Thank God stones are just stones,

And rivers just rivers,

And flowers just flowers...”

"What do we possess? What do we really possess?

Our own sensations, at least? Isn’t love at least a means of possessing ourselves through our sensations? Isn’t it at least a way of dreaming vividly, and therefore more gloriously, the dream that we exist? And once the sensation has vanished, doesn’t the memory at least stay with us always, so that we really possess…

Let’s cast off even this delusion. We don’t even possess our own sensations. Don’t speak. Memory is no more than our sensation of the past. And every sensation is an illusion…"

Artist: John McNamee, the New Yorker,  11 Sept 2017

Sunday, August 09, 2020

वाल्मिकी, चिं वि वैद्य आणि दुर्गाबाई- निसर्ग आणि पर्यावरण...Valmiki, C V Vaidya and Durgabai

दुर्गाबाई ह्या भारतीय अभिजात लेखकांच्या परंपरेतील एक महत्वाचे नाव आहे.

आपण जाणतो की निसर्ग हा त्यांच्या किती जिव्हाळ्याचा विषय होता- आणि साहजिकच तो त्यांच्या लेखनात वारंवार येतो.

रामायणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यातील निसर्ग/ पर्यावरण वर्णने.

भारताचार्य चिं वि वैद्य यांनी "रामायण कथासार", १९११ हे एक पुस्तक लिहले. त्याचे मला वाटलेले वैशिष्ट्य म्हणजे वैद्यांनी निसर्गवर्णनांकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. आपण जी बहुतेक मराठी-हिंदीतील रामायणे (त्यात चांदोबा, अमर चित्र कथा, दूरदर्शन आले) वाचतो किंवा (आश्चर्य म्हणजे) टिव्ही किंवा सिनेमात पाहतो ती कथेवर फोकस असतात.

सोबतचा थोडा मोठा परिच्छेद, अरण्यकांडातील (पृष्ठ १११-११२) पहा.

निसर्ग नुसता ओसंडून वाहतोय: हिवाळा, धान्य, गवत, सूर्य, कुंकू न लावलेली स्त्री, दक्षिणोत्तर, चंद्र, हिम, तुषार, हत्ती आणि त्यांच्या सोंडा , हंस, कारण्डव, शिपाई, युद्ध, सारस, डोंगर, डोंगरमाथा , सरोवर, कमळ, पाने, जीर्णत्व , गोदावरी, शरयू, नदीस्नान...

(राम, सीता , लक्ष्मण आताच्या नाशिकमध्ये [पंचवटी] राहायला आल्यावरचे ते वर्णन आहे. मी स्वत: नाशिकला दोन वर्षे राहिलो आहे आणि माझे वडील १९७४ पासून आणि नंतर आई १९८५ पासून त्या दोघांच्या मृत्यपर्यंत नाशिकमध्येच होते. हिवाळ्यातील नाशिक ची थंडी आणि ऊन मी ओळखतो. दुर्दैवाने २०२० साली पर्यावरणाबद्दल जास्त बोलू नये हे बरे पण १९८७-८९ मध्ये मी वाल्मिकींचे नाशिक किंचित चाखले आहे!)

  सोबतचा परिच्छेद संपताच तिथे शूर्पणखा येते!

 कृतज्ञता: चिं वि वैद्य यांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स आणि वरदा प्रकाशन, पुणे

Saturday, August 08, 2020

Wednesday, August 05, 2020

Saturday, August 01, 2020

टिळक अंत्ययात्रा... महात्मा गांधी गुदमरले .....Lokmanya Tilak, 100th Death Anniversary

#LokmanyaTilak100thDeathAnniversary #लोकमान्यटिळक१००वीपुण्यतिथी  

दिवंगत  श्री. पुंडलिकजी कातगडे लिहतात 'लोकमान्यांचे अखेरचे क्षण'::




सौजन्य : वाङ्मय शोभा, ऑगस्ट १९६०, बुकगंगा.कॉम

वरील वर्णन अगदी लक्षपूर्वक वाचण्यासारखे आहे.

मुसलमान युवकाने चितेत उडी मारली आणि त्याचे निघालेले वेगवेगळे पडसाद, लाला लजपतराय यांनी केलेले अंत्यदर्शन, महात्मा गांधीनी खांदा दिला होता पण ते गुदमरल्यामुळे त्यांना बाजूला करावे लागले... विचार करा आजचा मीडिया त्याकाळी असता तर!

आणखी एक नमूद करायची खाजगी गोष्ट म्हणजे माझ्या आज्जीने (आईच्या आईने) ही अंत्ययात्रा पहिली होती...

कलाकार: दीनानाथ दलाल

वाङ्मय शोभा, ऑगस्ट १९४५

सौजन्य: वरील सर्व आणि बुकगंगा.कॉम.  सर्वाधिकार: कलाकारांकडे