"... .मी या ठिकाणी तासभर एक होडी घेतली. होडीवाले साधारणपणे फार बोलतात, पण मला मिळाला तो मुका वाटावा इतका अबोल..."
(पृष्ठ १४१, 'प्रिय जी.ए. : स. न. वि. वि.', १९९४)
* ('या ठिकाणी' = प्रयाग संगम)
जी. ए. कुलकर्णी:
"मावळायला आलेल्या सूर्याच्या सोन्याने भरलेल्या नदीच्या संथ पाण्यातून मागे पंखाप्रमाणे रेषा उमटवत नाव किनाऱ्याला लागली व नाविकाने वल्हे वाळूत रुतवून ती थांबवली. बाणासारखा ताठ , उंच नाविक नावेचाच एक जिवंत भाग असल्याप्रमाणे नाव सहज हलवत होता, व त्याच्या हालचालीतील ताबेदार सामर्थ्याकडे पाहात असता प्रवाशाला फार कौतुक वाटत होते. ..."
(पृष्ठ २, 'प्रवासी', 'रमलखुणा', १९७५/१९८८)
'The Silent Fisherman', १९०७, आर्टिस्ट: N C Wyeth